विभाग तेरावा : घ - जलपैगुरी

, अ क्ष र  वि का स - या वर्णाला आजच्या स्थितीला पोंचण्यास मुख्य पांच अवस्थांतून जावें लागलें. पहिली अवस्था अशोक याच्या  इ.स.
पू.३-या शतकांतील गिरनार लेखांत; दुसरी इसवी स.२ -या शतकांतला क्षञप राज जो रूद्रदामा त्याच्या गिरनार  येथील लेखांत तिसरी इ.स.८३७ तल्या प्रतिहार बाउ- कच्या जोधपूर लेखांत चवथी ११ व्या शतकांतील परमार  राज जो उदयादित्य त्याच्या उदेपूर येथील लेखांत; व पांचवी त्याच शतकांतील उज्जनीच्या शिलालेखांत द्दष्टीस  पडते. दुस-या अवस्थेतींल “घ”  मोडी “प” च्या सारखा  दिसतो. या “घ” ला शेवटच्या अवस्थेला पोंचण्यास  उजवीकडून डावीकडे थोडें वर्तुळाकार फिरावें लागलें व या  काळांत त्याला काना फुटत चालला होता असें अनुमान  निघतें. आजचा “घ” इसवी स. १२०८ मधील परमारराजा  धारावर्ष याच्या वेळच्या ओरिआ लेखांत स्पष्ट ओळखूं येतो.