अक्षरानुक्रमानुसार संदर्भ पाहण्याची पद्धत

समजा तुम्हाला 'चिंतामणि' हा शब्द पहायचा आहे. त्यासाठी तुम्ही अक्षरानुक्रमाने शोधण्याची पद्धतही अवलंबू शकता. संकेतस्थळाच्या पानावर सर्वांत वर मध्यभागी खालील आकृतीत दाखविल्याप्रमाणे मराठीतील सर्व अद्याक्षरे आहेत. 'चिंतामणि' साठी तुम्ही 'च' अक्षरावर क्लीक करा. तेथे क्लीक करताच खालील बाजूस 'च' ची बाराखडी दिसू लागेल. त्यातील 'चि' वर क्लीक करा. 'चि' ने सुरू होणाऱ्या सर्व लेखनोंदी तुमच्यासमोर येतील.


वर दाखविल्यानुसार 'चि' वर क्लीक करताच खालील यादी स्क्रीनवर दिसत आहे. त्यात 'चिंतामणि' ही लेखनोंद आहे. खालील आकृती पहाः


चिंतामणी ही लेखनोंद वरीलप्रमाणे दिसत आहे.