केतकरांच्या ज्ञानकोशांतील भाषा व व्याकरण
१९१६ ते १९२८ ह्या काळात तयार झालेल्या केतकरांच्या ज्ञानकोशात त्या काळातील भाषा व व्याकरण असणार हे ओघानेच आलं. ह्या संकेतस्थळाची निर्मिती करताना मूळ ज्ञानकोशातील भाषा व व्याकरणाला जरा देखील धक्का न लावण्याची काळजी घेतली आहे. क्वचित प्रसंगी ज्ञानकोशात शब्दांतील काही त्रुटी वा मुद्रितशोधनातील चुका दिसून आल्या. पण त्याही जशाच्या तशा संकेतस्थळावर येऊ दिल्या आहेत. केतकरांचे खंड आज दुर्मिळ आहेत. कित्येक वाचनालयांमध्येही ते उपलब्ध नाहीत. मात्र पहिला मराठी ज्ञानकोश म्हणून विद्यार्थी, वाचक, संशोधक, लेखक, अभ्यासक, जिज्ञासू अशा सर्वांनाच ते हवे असतात. यासाठी केतकरांचे ज्ञानकोश जसे आहेत तसे इंटरनेटवर ठेवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. आपणास यात काही त्रुटी वा दोष आढळल्यास कृपया ते