संकेतस्थळाच्या मांडणी मागील विचार

केतकरांचे ज्ञानकोश पाहण्याचा वाचकाचा दृष्टीकोन खालील तीन प्रकारचा असू शकतोः

१) सर्व खंडांवर फक्त जिज्ञासेपोटी नजर टाकणे. कोणत्याही संदर्भाचा विचार मनात नसताना केवळ एखादा विशिष्ट वा सर्वच खंड चाळणे.
२) एखाद्या शब्दाचा संदर्भ शोधणे. उदाहरणार्थ, शिवाजी, अफझलखान, दिल्ली, पानिपत, शेक्सपियर, न्युटन वगैरे.
३) एखाद्या विषयाच्या सर्वांगीण माहितीसाठी ज्ञानकोश (विशेषतः प्रस्तावना खंड) चाळणे.

वाचकाचे वरील तिन्ही उद्देश संकेतस्थळाने सहजपणे साध्य करून द्यावेत, व संकेतस्थळाची वाचकाशी सहजपणे मैत्री व्हावी अशी मांडणी करण्याचा प्रयत्न करण्यांत आला आहे. त्याचा अधिक तपशील खाली देत आहोत. वाचकांना त्याचा उपयोग होईल अशी आशा आहे. खाली आकृत्या दाखवून विवेचनही केले आहे. आकृतीमधील मजकूर व विवेचनातील मजकूर यात गल्लत होऊ नये यासाठी विवेचनाचा मजकूर इटालिक टाईप मध्ये दिला आहे. इटालिक टाईपमधील मजकूर म्हणजे आकृतीविषयीचे स्पष्टीकरण आहे याची कृपया नोंद घ्यावी.

  Search व्यवस्था

संकेतस्थळाच्या होम पेज वर डावीकडे सर्वात वर संदर्भशोधाची व्यवस्था केली आहे. खालील चित्रात महाराष्ट्र हा शब्द शोधताना दिसत आहेः

शब्द टाईप करण्यासाठी युनिकोड फाँटचा वापर करणे आवश्यक आहे. अशा प्रकारे शोध घेतल्यास सर्व २३ खंडांचा धांडोळा घेतला जातो आणि सापडलेले संदर्भ आपल्यासमोर उपस्थित केले जातात. त्यापैकी कोणत्याही संदर्भावर क्लीक केल्यास आपण त्या पानावर पोहोचता.