प्रस्तावनाखंड: विभाग दुसरा – वेदविद्या.
 
प्रकरण १२ वें
वेदकालीन इतिहास-दैवतेतिहास.

अंश.- हा शब्द ऋग्वेदांत फक्त आठदहा वेळां आला आहे. व त्याचा अर्थ बहुतेक भगसारखाच आहे, म्हणजे वांटा, भाग, वांटणारा वगैरे अर्थ आहेत. देव या अर्थानें हा शब्द फक्त तीनदां आला आहे.