प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
चवथ्या विभागांतील महत्त्वाचे सन.
प्र. १ लें. चोवीसशें वर्षांतील जगद्विकास.
ख्रि. पू. ५०० पर्यंत - बुद्धपूर्वकाल.
ख्रि. पू. ५००-इ.स. १००० - ग्रीक, रोमन व मुसुलमानी साम्राज्याचा काल आणि बौद्धधर्मद्वारा भारतीय संस्कृतिप्रसाराचा काल.
ख्रि. पू. १०००-१५०० - यूरोपांत लहान संस्थानांतून मोठ्या राष्ट्रस्वरूपी संस्थानांची वाढ.
ख्रि. पू. १५००-१९१८ - यूरोपीय साम्राज्यविस्ताराची क्रिया.
इ.स. १९१८ नंतर - सर्व जग एका संस्थेखालीं आणून पुनः स्वाभाविक समुच्चयांचें पृथक्त्व व शासनस्वातंत्र्य रक्षणाची क्रिया सुरू.
प्र. ३ रें. इराणचें सत्तावर्धन.
ख्रि. पू. ६५० चा सुमार - झरथुष्ट्र.
ख्रि. पू. ३००० च्या पूर्वी - इराणचा पर्शुभारतीय काल.
ख्रि. पू. ३०००-२००० (?) - इराणचा वसाहत काळ.
ख्रि. पू. २०००-५५८ - इराणचा पौराणिक काळ.
ख्रि. पू. ५५८-३३० - अकिमेनिड घराण्याचा किंवा इराणी साम्राज्याचा काळ.
ख्रि. पू. ५४६-४९४ - पर्शियनांच्या ग्रीसवर स्वार्या.
ख्रि. पू. ५५१-४८५ - पहिला दरायस.
ख्रि. पू. ३३०-२४८ - ग्रीक सत्तेचा काळ.
ख्रि. पू. २४८ - इ.स. २२९ - पार्थियन राजांचा काल.
इ.स. २२६-६३० - कट्टें इराणी सस्सन घराणें.
इ.स. ६३० ते चालू - इस्लामी सत्तेचा काल.
प्र. ४ थें. ग्रीक संस्कृतीची व्यापकता.
ख्रि. पू. १२००-९०० - होमरचें पौराणिक युग.
ख्रि. पू. ९००-७०० - राजसत्ता व अल्पजनसत्ता.
ख्रि. पू. ८८१ - लायकरगसनें स्पार्टासंस्थानला राज्यपद्धति व समाजघटना घालून दिली.
ख्रि. पू. ७००-४८० - टायरंटांचा उर्फ एकतंत्री सत्ताधीशांचा काळ.
ख्रि. पू. ४९० व ४८० - ग्रीकांकडून पर्शियनांचा पराभव.
ख्रि. पू. ४८०-३३८ - लोकसत्ता व ग्रीक साम्राज्य.
ख्रि. पू. ३५६-३२३ - अलेक्झांडर दि ग्रेट.
ख्रि. पू. ३३६-१४६ - संघप्रतिनिधिसत्ता.
ख्रि. पू. १४६-इ.स. ३२४ - रोमन साम्राज्यसत्तेचा काळ.
इ.स. ३२४-१४५३ - पूर्व रोमन साम्राज्याचा काळ.
इ.स. १४५३-१८२२ - तुर्की अंमलाचा काळ.
इ.स. १८२२ - ग्रीसचें स्वातंत्र्य.
प्र. ५ वें. रोमन संस्कृति.
ख्रि. पू. ७५३ - रोम शहराची स्थापना.
ख्रि. पू. ७५३-५१० - प्राचीन राजसत्ताक काळ.
ख्रि. पू. ५१०-१३१ - रोमन लोकसत्ताक पूर्वार्ध.
ख्रि. पू. २४६-१४६ - तीन प्यूनिक युध्दें.
ख्रि. पू. २१५-१६८ - तीन ग्रीसशीं युध्दें.
ख्रि. पू. १३७-३९ - रोमन लोकसत्ताक उत्तरार्ध.
ख्रि. पू. ५७-५१ - सीझरचे गॉलमध्यें विजय.
ख्रि. पू. २७-१४ - ऑगस्टस बादशहा.
ख्रि. पू. १४ ते इ.स. ४७६ - रोमन बादशाही सत्तेचा काळ.
ख्रि. पू, ११४-११६ - ट्राजनचे विजय.
इ.स. ३३७ - जुन्या रोमन साम्राज्याची विभागणी.
इ.स. ३१३ - रोमन बादशहा कान्स्टन्टाइन याचा ख्रिस्तीधर्मस्वीकार.
इ.स. ४७६ - गॉथ लोकांकडून पश्चिम रोमन साम्राज्याचा अंत.
इ.स. १४५३ - पूर्व साम्राज्याचा अंत.
प्र. ८ वें. बुद्धाचें चरित्र.
ख्रि. पू. ५५७ (?) - बुद्धाचा जन्म.
ख्रि. पू. ५२७ - महावीरनिर्वाण.
ख्रि. पू. ४७८ (?) - बुद्धनिर्वाण.
ख्रि. पू. २७३-२३२ - अशोककाल, बौद्धधर्माचा प्रसार.
इ.स. ६५ - चीनमध्यें बौद्ध धर्माचा प्रवेश.
इ.स. २५० - सिंहलद्वीपांत बौद्धधर्मप्रवेश.
इ.स. ३५० - ब्रह्मदेशांत बौद्धधर्माचा प्रवेश.
इ.स. ५३८ - जपानांत बौद्धधर्माचा प्रवेश.
इ.स. ७ वें शतक - तिबेटांत बौद्धधर्माचा प्रवेश.
इ.स. ८ वें शतक - हिंदुस्थानांत बौद्धधर्माचा लोप.
प्र. ९ वें. भारतीयुद्धापासून चंद्रगुप्तापर्यंत राजकीय इतिहास.
पोराणिक काळ पौरव घराणें.
पोराणिक काळ बार्हद्रथ घराणें.
पोराणिक काळ प्रद्योत घराणें.
ख्रि. पू. ६७२-४७० (?) - शैशुनाग घराणें.
ख्रि. पू. ४७० (?)-३२२ - नंद घराणें.
प्र. १२ वें. अशोक ते अराजक-शकयवनांचा धुमाकूळ.
ख्रि. पू. ३२२-१८५ - मौर्य घराणें.
ख्रि. पू. ३२२-२९८ - चंद्रगुप्त.
ख्रि. पू. २७३-२३२ - अशोक.
ख्रि. पू. १८५-७३ - शुंग घराणें.
ख्रि. पू. ७३-२८ - काण्व घराणें.
ख्रि. पू. २३० - इ.स. २२५ आन्ध्र घराणें.
ख्रि. पू. २५० - इ.स. ६० - इंडोग्रीक व इंडोपार्थियन घराणीं.
इ.स. ४८-२२५ - परकी कुशान घराण्याची सत्ता.
इ.स. १२० - १६२ - कुशान राजा कनिष्क.
प्र. ३ वें. सेमेटिक संस्कृती व जगद्व्यापकता.
ख्रि. पू. ४४४-१०० - जुन्या कराराची रचना.
ख्रि. पू. ४ - इ.स. २९ - येशू ख्रिस्त.
इ.स. ५०-२०० - नव्या कराराची रचना.
इ.स. ५७०-६३२ - महंमद पैगंबर व कुराणरचना.
प्र. १४ वें. राजकीय घडामोडी व भौगोलिक ज्ञानविकास.
इ.स. ६७१-६९३ - इत्सिंगचा प्रवास.
इ.स. १३३०-१३५३ - इब्नबतूता याचा प्रवास.
प्र. १५ वें अराजकापासून महंमदी स्वार्यांपर्यंत
इ.स. ३२०-५७२ - गुप्त घराणें.
इ.स. ३३०-३७५ - समुद्रगुप्त.
इ.स. ५०२-६०६ - परकी हूण घराण्याची सत्ता.
इ.स. ६०६-६४७ - हर्षवर्धन.
इ.स. ६४० - चिनी प्रवासी ह्युएनत्संग येतो.
इ.स. ६४७-११९२ - मध्ययुग, लहान राज्यांचा काल.
प्र. १७ वें. खलीफत व इस्लामाचा प्रसार.
इ.स. ६३२-६५१ - मदीनाचे पहिले चार खलीफ.
इ.स. ६६१-७५० - दमास्कसचे उमईद खलीफ.
इ.स. ७५०-१२५८ - बगदादचे अब्बासी खलीफ.
इ.स. ९०९-११७१ - इजिप्तची फातिमाईद खलीफत.
प्र. १८ वें. यूरोप - शार्लमान राजाच्या मृत्यूपासून सोळाव्या शतकापर्यंत.
इ.स. ७६८-८१४ - शार्लमान बादशहा.
इ.स. ८४३ - व्हरडूनच्या तहानें शार्लमानच्या साम्राज्याची विभागणी.
इ.स. ९००-१३०० - यूरोपांत सरंजामी पद्धतीचा (फ्यूडल सिस्टिमचा) काळ.
इ.स. १०९५-१३०० - ख्रिस्ती व मुसुलमान यांच्यामध्यें धर्मयुध्दें (कूसेड्स).
इ.स. १२६५ - इंग्लिश पार्लमेंटची स्थापना.
इ.स. १३०२ - केंब्रिज युनिव्हर्सिटीची स्थापना.
इ.स. १३३० - बंदुकीची दारू खॉर्टझ नांवाच्या जर्मनानें केली.
इ.स. १३६८ - जिनीवा युनिव्हर्सिटीची स्थापना.
इ.स. १४४० - छापण्याची युक्ति प्रथम जर्मनींत निघाली.
इ.स. १५२१ - पहिली मॅगेलनची पृथ्वीप्रदक्षिणा.
प्र. २० वें. राष्ट्रसंवर्धन, राष्ट्रांतील चुरस व जगाची ओळख.
इ.स. १५१८ - लूथरकृत ख्रिस्ती धर्मसुधारणा.
इ.स. १६१२ - इंग्रजांची सुरतेस वखार.
इ.स. १६३८-१७१५ - फ्रान्सचा चवदावा लूई.
इ.स. १६५१ - नॅव्हिगेशन ऍक्ट.
इ.स. १६७२-१७२५ - रशियाचा पीटर दी ग्रेट.
इ.स. १६८८ - इंग्लंडांतील राज्यक्रांति.
प्र. २१ वें. मुसुलमानांची हिंदुस्थानावर सत्ता.
इ.स. ७१२ - मुसुलमानांची हिंदुस्थानावर पहिली स्वारी.
इ.स. ११९३ - महंमद घोरी पृथ्वीराजाचा पराभव करतो.
इ.स. १२९४-१३२१ - अलाउदीनचा दक्षिणविजय.
इ.स. १५२६ - मोगल घराण्याची स्थापना.
इ.स. १८५७ - दिल्लीच्या मोंगल सत्तेचा नाश.
प्र. २२ वें हिंदूंची उचल.
इ.स. १३२६-१५६५ - विजयानगरचें हिंदु राज्य.
इ.स. १४६९ - शीखधर्मसंस्थापक नानकाचा जन्म.
इ.स. १५७२-१५९७ - उदेपूरचा राणा प्रतापसिंह.
इ.स. १६३०-१६८० - मराठी राज्यसंस्थापक शिवाजी.
इ.स. १७१७-१७६० - मराठी साम्राज्याची वाढ.
इ.स. १८१८ - मराठी साम्राज्याचा शेवट.
इ.स. १८५७ - हिंदूंचा स्वातंत्र्यार्थ प्रयत्न.
प्र. २६ वें यूरोपचा इतिहास व जागतिक इतिहास.
इ.स. १७७६ - युनैटेड स्टेट्सचें स्वातंत्र्य.
इ.स. १७८९-१८९३ - फ्रेंच राज्यक्रांति.
इ.स. १८६९ - इटालीचें स्वातंत्र्य.
इ.स. १८८५ - इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना.
इ.स. १९१४-१९१८ - जागतिक युद्ध.
इ.स. १९१७ - रशियन राज्यक्रांति, बोल्शेव्हिक राज्य.
इ.स. १९१९ - इंडियन रिफॉर्म्स् ऍक्टा
इ.स. १९२३ - आयरिश फ्री स्टेटची स्थापना.