तारीख/महिना/वर्ष   घटना/टप्पा
  १९०७  पुढल्याच वर्षी अमेरिकेतील कार्नेल विद्यापीठात बी.ए. परीक्षा उत्तीर्ण.
  १९०८  त्या पुढल्या वर्षी कार्नेल विद्यापीठाची एम.ए. परिक्षाही उत्तीर्ण.
  १९०९  पीएच.डी. साठी ‘दि हिस्टरी ऑफ कास्टस इन इंडिया’ ह्या विषयावर प्रबंध लिहीला. वय वर्षे २५.
  १९०५ ते १९११  अमेरिकेतील खर्चासाठी शेतात काम करणे, वसतीगृहात ताटे-वाट्या धुणे, वाढप्याचे काम, पुस्तक विक्रेत्याचे काम वगैरे कामे केली. स्वावलंबन अंगात मुरले
  १९०९ ते १९११ प्रबंधाचे अमेरिकेत कौतुक झाले. प्रबंध आणि त्याचा विषय गाजला. लंडनच्या एका प्रकाशकाने तो पुस्तक रूपाने प्रसिद्धही केला.
 १९११   पीएच.डी. मिळाली. श्रीधर केतकर डॉक्टर श्रीधर केतकर झाले. वय वर्षे २७.
 २ मे १९११   अमेरिका सोडली. इंग्लंड मार्गे भारतात परतण्याचे वेध.
 मे १९११ ते सप्टेंबर १९१२   परतण्याच्या वाटेवर सव्वा वर्ष इंग्लंडमध्ये गेली. ठिकठिकाणी पेईगगेस्ट म्हणून रहाणे. स्वस्त उपहारगृहे शोधून पैसे वाचवण्यात वाकबगार झाले. कित्येकदा एक वेळाच जेऊन राहिले.
  १९१२   लंडनमध्ये प्रथमच कु. ईडीथ कोहन हिच्याशी व तिच्या कुटुंबियांशी परिचय. मैत्री. पण ती पुढे वाढण्याच्या आतच केतकरांनी लंडनला तिचा निरोप घेऊन भारताचा प्रवास सुरू केला. परतताना बोटीच्या प्रवासात ईडीथ कोहनचे प्रेमळ डोळे आठवत राहिले.
 ऑक्टोबर १९१२  भारतात आगमन.
 जुलै १९१३ ते मे १९१४  कलकत्ता विद्यापीठात प्राध्यापकाची नोकरी. अर्थशास्त्र हा विषय शिकवला. पण तिथे मन रमले नाही.
 १९१३  दै. केसरी मध्ये केतकरांनी लिहीलेली ‘जातिभेद व त्यासंबंधीचे राष्ट्रीय धोरण’ ही लेखमाला प्रसिद्ध झाली. त्यातील लेखांवरून धर्मानंद कोसंबी यांच्याशी त्यांचा वाद झाला.
 मे १९१४  इंडियन इकॉनॉमिक्स हे इंग्रजी पुस्तक लिहीले. त्यातील एक परिच्छेद कलकत्ता विद्यापीठाच्या कुलगुरूंना आवडला नाही. नोकरी सुटली.
 १९१४  ‘हिंदू लॉ अँड दि मेथडस अँड प्रिन्सीपल्स ऑफ दि हिस्टरीकल स्टडी देअरऑफ’ हे आणखी एक इंग्रजी पुस्तक कलकत्त्यास असताना लिहीले.
 १९१४  ‘उत्तर अमेरिकेतील वसंतकाल’ हे काव्य मुंबईत प्रसिद्ध झाले.