प्रस्तावनाखंड: विभाग दुसरा – वेदविद्या.

प्रकरण २ रें.
वेदप्रवेश– ऋग्वेद.

- तृतीय काण्ड - द्वितीय प्रपाठक.

१. बहिष्पवमानापूर्वीं, बहिष्पवमान गाऊं लागल्यावर, माध्यंदिन पवमान गाण्याचे वेळीं आणि आर्भवपवमानगायन सुरू करतांना यजमानानें म्हणावयाचें ‘होतृ’संज्ञक मंत्र. द्रोणकलश वगैरेचें ‘अभिमर्शन’.

२. सोमयागसंबंधीं सवनत्रय. पूतभृत, आहवनीय इत्यादि ग्रहांचें समंत्रक अवलोकन.

३. सोम, व ‘उपांशु’ इत्यादि ग्राहांचें समंत्रक अवलोकन.

४. महावेदी तयार करण्याचीं साधनें (स्फ्य, परशु वगैरे) यांचें उपस्थान. आस्तावस्थल, आहवनीयादि अग्नि, सर्वधिष्ण्या व ऋत्विज यांचें उपस्थान. सदामध्यें यजमानाचें उपवेशन.

५. सोमपानविधी, चमसाचें आप्यायन, शस्त्रप्रायश्चितें, हारियोजनभक्षण आणि वेदीमध्यें पितरांच्या साठीं ‘पिंडदान’.

६. पृषदाज्यलक्षण, पृषदाज्य ग्रहण करण्याचा प्रकार आणि पृषदाज्य सांडल्यास प्रायश्चित्त.

७. ब्रह्म्यानें सामगांनां साम म्हणावयासाठीं द्यावयाची आज्ञा. यजमानानें शस्त्राचें व स्तोत्राचें दोहन करावयाचें मंत्र.

८. माध्यंदिनसवनांतील विशिष्ट होमाचे मंत्र. आग्नीध्रीयेंत करावयाचा ‘वैश्वकर्मण’ होम. ‘पूतभृतां’त ‘आशिर’ ओतणें व ‘धुवे’चें अवेक्षण.

९. प्रतिगरलक्षण. प्रतिगर देण्याचे काल प्रतिगरांच्या शेवटीं उच्चारावयाचे सवनभेदानुसार भिन्न मंत्र.

१०. द्विदेवत्य (ऐंद्रवायक, मैत्रावरूण व आश्विन) ग्रहप्रचार.

११. ‘त्रैधातवीया’ इष्टीच्या याज्यापुरोनुवाक्या.