प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण ३ रें.
प्राथमिक ज्ञानाची उत्पत्ति-संख्यालेखन.
हाताचीं बोटें व अंकपद्धति:- हाताच्या बोटांचा उपयोग आजहि हिशेब करण्याच्या कामी सर्वत्र केला जात असल्यामुळें, हाताच्या बोटांचा असला उपयोग करतां करतांच पूर्वकाळीं कोणीं त्रिमान तर कोणीं चतुर्मान, कोणीं पंचमान तर कोणीं दशमान, वगैरे गणनापद्धती बसविल्या असा तर्क केल्यास तो फारसा चुकण्याचा संभव नाहीं.