विभाग सतरावा: नेपाळ - बडोदें
 
पट्टदकल– मुंबई इलाखा, विजापूर जिल्हा. पूर्वी याला किसुव्होलाल म्हणत असत. हें मलप्रभेच्या तीरावर बदामीच्या आग्नेयीस आठ मैलांवर आहे. येथें द्राविडी धर्तीवर बांधलेलीं देवळें आहेत. या देवळांत बारा शिलालेख आहेत. पापनाथाचें देऊळ पांचव्या शतकांत बांधलेलें असून अखिल हिंदुस्थानांत सर्वांत जुनें असावें असें दिसतें.