पुरवणी खंड : हिंदुस्थानखंड

प्रकरण ४ थें
लोकसमाज

आर्य-द्राविडी किंवा हिंदुस्थानी - संयुक्तप्रांत, राजपुतान्याचा कांही भाग व बिहार यांमध्यें हे लोक असून यांच्यांतील श्रेष्ठ दर्जाचे लोक म्हणजे हिंदुस्थानी ब्राह्मण व कनिष्ठ दर्जाचे चमार होत. यांच्या डोक्याचा आकार लांबट पण मध्यम असतो, रंग थोडा तपकिरी व काळा यांच्या दरम्यान असून नाक इंडो-आर्यन् लोकांपेक्षां रुंद असतें व बांधा ठेंगणा असतो.