प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण १८ वें.
यूरोप, शार्लमान राजाच्या मृत्यूपासून सोळाव्या शतकापर्यंत.

हॅप्सबर्ग घराण्यांत साम्राज्यपद.- इ. स. १४१० या वर्षीं सिजिसमंड हा बादशहा झाला. यानें कॉनस्टन्स येथें एक मोठी सभा भरवून भांडणें मिटंविण्याचा प्रयत्न केला. याशिवाय यानें बोहिमियन लोकांचे बंड मोडलें. सिजिसमंड हा इ. स. १४३७ या वर्षीं मरण पावला. येथून साम्राज्याच्या इतिहासांत एक नवीनच युग सुरू झाले. आतां साम्राज्याचें पद हॅप्सबर्ग घराण्यांत गेले. हॅप्सबर्ग घराण्यांतील पहिला राजा अलबर्ट यानें १४३८-४० पर्यंत राज्य केलें. दुस-या फ्रेडरीकपासून (१४४०-१४९३) साम्राज्याची गादी हॅप्सबर्ग घराण्यांत परंपरागत झाली.