प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण १८ वें.
यूरोप, शार्लमान राजाच्या मृत्यूपासून सोळाव्या शतकापर्यंत.

फ्रान्सच्या राजसत्तेचा उदय - फ्रान्सच्या राजसत्तेचा उदय जर्मनीप्रमाणें झपाट्यानें न होतां फारच मंदगतीनें झाल. इ. स. ५८७ यावर्षीं केरोलिंगियन घराणें बुडालें व फ्रान्समधील सरदारांनीं- ह्युजकॅपटनला फ्रान्सचा राजा केलें. या वेळेपासून फ्रान्सच्या राजसत्तेचा उदय होण्यास प्रारंभ झाला.