प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण १८ वें.
यूरोप, शार्लमान राजाच्या मृत्यूपासून सोळाव्या शतकापर्यंत.

यूरोपीय मध्य युगाची अखेर.- यांनतर लवकरच हे मध्ययुग संपून अर्वाचीन युगाचा उदय झाला. मुद्रण कलेचा शोध लागला, अमेरिका खंड ज्ञात झालें, हिंदुस्थानला जाणारा निराळा मार्ग सापडला व विद्येच्या पुनरुज्जीवनाची चळवळ जोरानें सुरू झाली. ही चळवळ प्रथम इतालींत झाली. यामुळें ग्रीस व रोम यांच्या संस्कृतीची लोकांत अतिशय अभिरूचि उत्पन्न झाली. चित्रकला व मूर्ति खोदण्याचा कला यांत फार प्रगति झाली. विद्येचा प्रसार फार जोरीनें झाला, पुराणमतावर टीका करण्याकडे लोकांचां प्रवृत्ति होऊं लागली, व पुढें होणा-या धर्मक्रांतीकरितां लोकांचीं मनें तयार झालीं.