प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण १८ वें.
यूरोप, शार्लमान राजाच्या मृत्यूपासून सोळाव्या शतकापर्यंत.
पोपसत्ता व राजसत्ता यांमधील द्वंद्व.- पोपची गादी व साम्राज्य यांमधील तंटा या धर्मयुद्धांशीं समकालीनच आहे. हें भांडन रोमन साम्राज्याचा रोमन बादशहा चवथा हन्री याच्या कारकीर्दींत सुरू झालें. फ्रेडरिक बारबरोसा याच्या वेळेस (११५०-११९०) तें भांडण कळसास पोंचलें. हें भांडण मुख्यतः इतालीच्या स्वामित्वाकरितां होतें व पोपची सत्ता प्रबल असल्यामुळे रोमन सम्राटाला इताली घेणे अशक्य झालें. दुस-या फ्रेडरिकनें मोठ्या चिकाटीनें आपल्या पूर्वजानें सुरू केलेलें काम पुढे चालविलें परंतु त्याला या प्रयत्नांत यश आलें नाहीं. रोमन साम्राज्याचा पूर्ण पराभ होऊन पोपची सत्ता अजिंक्य झाली. रोमन साम्राज्यांतून इताली विभक्त होऊन पोप हा एक राजकीय सत्ताधारी बनला.
याप्रमाणें इ. स. च्या १३ व्या शतकाच्या अखेरीस यूरोपची स्थिति होती.