विभाग आठरावा : बडोदें ते मूर  
 
ब्रह्मांडपुराण– मत्स्यपुराणांत सांगितल्याप्रमाणें या पुराणांत ब्रह्मांडांचें वर्णन असेंल असें वाटतें; पण स्कंदपुराणांतील वराच भाग यांत आहे. कांहीं हस्तलिखित संग्रहांत या नांवाचा एकच ग्रंथ आहे; आणि हिंदुस्थानापासून दूरच्या बलि बेटांतहि शैवपंथाचें हें एकच पुराण आहे. परंतु उपलब्ध हस्तालेखित प्रतींमध्यें माहात्यें, स्तोत्रें व उपाख्यानें बरींच असून तीं ब्रह्मांडपुराणाचाच भाग होत असें मानतात. अध्यत्मिरामायण म्हणजे जो श्रीरामचरित्रावर एक रहस्यमय तत्त्वज्ञानापर ग्रंथ आहे त्यालाहि या पुरणापैकीं लेखतात.  वाल्मिकीच्या रामायणाप्रमाणेंच याचीं सात कांडें असून त्यांना नावेंहि तींच दिलीं आहेत. यांत रामाला विष्णूप्रमाणें व सीतेला सौख्यदेवता लक्ष्मीप्रमाणें मानलें आहे. तसेंच जुन्या व सुंदर नाचिकेताच्या कथेचें रूपांतर जें एक घाणेरडें हास्यकारक नाचिकेतोपाख्यान हेंहि ब्रह्मांपुराणापैकीं मानतात.