प्रस्तावना खंड.
विभाग पांचवा - विज्ञानेतिहास.

ग्रंथप्रवेश.

विज्ञानेतिहासाचा उपयोग, आणि त्यामुळे ज्ञानविकासास होणारी मदत याविषयींचे सविस्तर विवेचन पहिल्या प्रकरणात केले आहे.

प्रस्तावना ग्रंथकार ग्रंथ संपूर्ण झाल्यावर लिहितो, आणि जे करावे लागलें असेल तें कां करावें लागलें इत्यादि लिहून आपल्या कृतीचें मंडन करीत असतो. आम्हाला ज्या गोष्टबद्दल स्वत:चें समर्थन किंवा स्पष्टीकरण करावें गोष्ट म्हटली म्हणजे ग्रंथव्याप्तीसंबंधानें होय.

शास्त्रें अनेक आहेत.त्यांचा विकास अत्यंत प्राथमिक स्थितीपासुन वर्णन करावयाचा म्हणजे निवडानिवड बरीच करावी लागणार. प्रस्तुत ग्रंथात जीं ज्ञानांगे वगळलीं आहेत तीं निर्देशिलीं पाहिजेत. मनुष्य प्राण्यास पृथ्वीवरील निरनिराळ्या दिशाचीं ओळख कशी झाली याचा म्हणजे भुगोलविघेचा इतिहास हा वगळला लागला. तसेच समाजविषयक शास्त्रे हींहि बरींच वगळलीं मनुष्योतिहासाशीं संबध्द जीं शास्त्रें आहेत त्यांचे स्थूल विवेचन पहिला विभाग पृ. 90 व तिसरा विभाग पृ. 9 यात­ येऊन गेलेच आहे. जास्त व्यापक समाजशास्त्र म्हणजे अधिक प्रगत समाजांच्या अभ्यासावरून निघालेलें शास्त्र. हा विषय इतिहासाचे उपांग असल्यामुळें तिसर्‍या व चवथ्या विभागांत प्रसंगोपात आलेला दृष्टीस पडेल. या विभागांत वरील शास्त्रें वगळण्याचें कारण त्या शास्त्रांचे सयुक्तिक स्थल अन्यत्र आहे इतकेंच केवळ नव्हे तर ग्रंथाचीं नियमित पृष्ठें हे एक सबळ कारण होय. या ग्रंथाचा विस्तार दिलेल्या मजकुरामुळेंच वाढला हें ग्रंथावलोकनावरून दिसून येईल.

शास्त्राचां इतिहास हा विषय सामान्य इतिहासापेक्षां अर्थातच रूक्ष असणार. येथें लढाया वगौरे वर्णन करतां येत नाहित व दुसर्‍या अनेक मौजेच्याहि गोष्टी लिहितां येत नाहींत.

विज्ञानेतिहासांत मनोरंजकतेस बिलकुलच स्थान नाही असे नाहीं. संशोधकांस जुन्या समजुतींशीं झगडावे लागल्यामुळें त्याचे होणारे छळ, मत्सरपूर्ण मनुष्यवृत्तीमुळें एका संशोधकास दुसर्‍या संशोधकाकडून होणारे त्रास, खर्‍या  संशोधकास श्रेय न ण्याविषयीं तत्कालीन लब्धप्रतिष्ठांची खटपट,लोकप्रिय होऊं पाहणारे तत्कालीन सवंग तत्त्ववेत्ते, यांकडून त्यांच्या सिहान्ताचें आभासात्मक खंडन इत्यादि गोष्टींविषयी माहिती देत बसण्यानें ग्रंथाची रूचिकरता अधिक वाढेल पण शास्त्रीय ज्ञानविकासाचें त्या प्रकारच्या इतिहासास चरित्र म्हणतां येणार नाही. तथापि संतांविषयीं आदर उत्पन्न करण्याकरितां ज्याप्रमाणें भरूविजय व संतलीलमृत उपयोगी पडतात त्याप्रमाणें शास्त्रप्रगत्यथे आयुष्य खर्चिणार्‍याच्या हालअपेष्टा व शेवटी जय वर्णन करून शास्त्रसंशोधकाभोवतीं तेजोवलय निर्माण करण्यास त्या प्रकारचे ग्रंथ उपयोगी पडतात. समाजांत ज्याप्रमाणें शासनसंस्थेशीं साकारिता व्यक्त व्हावी यासाठीं राजभक्ति किंवा कार्यकर्त्याविषयीं आदर अवश्य आहे त्याप्रमाणेंच जे प्रगतिसाधक अनेक तववेत्ते शास्त्रज्ञ निर्माण झाले त्यांच्याविषयीं आदरहि अवश्य आहे. तरूणांची महत्त्वाकांक्षा लोक कोणाचा आदर करतात हें पाहुन प्रज्वलित होते. केवळ प्रतिष्ठित धंघांत पैसा व अधिकांरं हीं मिळविणार्‍या लोकांबद्दलच समाजांत आदर असला आणि रांविषयी नसला तर समाजांतील तरूणांस हर्बर्ट स्पेन्सर किंवा कोपर्निकस यांचे उदाहरण अनुकरणीय आहे असें कसे वाटेल आदर असणें ही गोष्ट आपणा भारतीयांस नवीन नाही.

शास्त्रज्ञांबद्दल जुन्या काळांत जे ब्राह्राण न्याय किंवा व्याकरण अगर मीमांसा इत्यादि शास्त्रांत पारंगत होत त्याविषयीं समाजात आदर वाटे;  पण तो काल गेला. अर्वाचीन पध्दतीच्या शास्त्रव्यासंगी व्यक्तिबद्दल आदर वाटण्याचा काळ अजून फारसा आला नाही. प्रस्तुत विज्ञानेतिहास शास्त्रवर्धनास मार्गदर्शक होईल असें आज म्हणण्याचें जरी आम्ही साहस करीत नाहीं तरी हा इतिहास इतर इतिहासांइतका किंवा जागतिक इतिहासामध्यें विशिष्ट राष्ट्राच्या इतिहासापेक्षां अधिक महत्त्वाचा आहे अशी जर भावना सामान्यांमध्ये या ग्रंथाच्या अवलोकनानें उत्पन्न होईल तर आमचें बरेंचसे कार्य झालें असे आम्हांस वाटेल.