शरीर खंड पाहण्याची पद्धत

खंड क्रमांक ६ ते २१ हे शरीर खंड आहेत. यातील प्रत्येक खंडात ज्या अद्याक्षराच्या नोंदी आहेत त्याचा उल्लेख खंडाच्या नावाबरोबर असलेला दिसेल. आपण हव्या त्या खंडावर क्लीक करावे. उदाहरणार्थ खालील आकृतीत आठव्या खंडावर क्लीक केलेले दिसत आहे.


आठव्या खंडात आफ्रिका ते इक्ष्वाकु यामधील अद्याक्षरांच्या नोंदी आहेत. खंड ८ च्या शीर्षकावर वर दाखविल्याप्रमाणे क्लीक करताच तुमच्या स्क्रीनवर अगदी उजवीकडे पहा आठव्या खंडातील सर्व लेखनोंदींची यादी तुमच्या क्लीकसाठी तुमच्यासमोर हजर झाली आहे. त्या यादीच्या सुरूवातीचा काही भाग खालील आकृतीत दिसत आहे.


वरील आकृतीत दाखविल्यानुसार 'आंबा' ह्या लेखनोंदीवर क्लीक करताच ती लेखनोंद आपल्यासमोर खालीलप्रमाणे दिसू लागेल.


सर्व शरीर खंड वरील पद्धतीनुसार पाहता येतील.