प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण १५ वें. : इतिकर्तव्यता.

उपप्रकरण ८ वें.
अल्पप्रदेशविषयक कर्तव्यें.

जुने व्यापारी मार्ग व जुनी सावकारी - महाराष्ट्रांतील पूर्वींचे दळणवळणाचे मार्ग व सावकारीची पद्धति यांवर प्रकाश पाडणार्‍या कांहीं गोष्टी येथें देतों.

कोंकणांतील चौल, कल्याण, सोपारे, ठाणें व दक्षिणेंतील जुन्नर, नाशिक, पैठण यांचा प्राचीन इतिहास पाहिला असतां पुणें जिल्ह्यांतून बरेच व्यापारी मार्ग होते असें दिसतें. ख्रिस्ती शकापूर्वींच्या पहिल्या शतकांत जुन्नरहून समुद्रकिनार्‍यावर जाण्याकरितां माळसेज घाटांतून एक व नानाघाटांतून एक असे दोन मुख्य रस्ते होते. या दोन्ही रस्त्यांवर त्या काळचे शिलालेख, पायर्‍या, हौद, इत्यादि गोष्टी अद्यापि अस्तित्वांत आहेत. त्याचप्रमाणें बेडसा, भाजा व कारला येथील बौद्धांच्या वेळचीं लेणीं व इतर स्थानें यांचा काळ लक्षांत घेतां ख्रिस्ती शकापूर्वीं १०० पासून इ. स. ६०० पर्यंत बोरघाट हा देखील एक व्यापारी मार्ग होता असें दिसतें. शिवनेरीवर असलेल्या एका हौदावरून देवगिरीच्या यादवांच्या वेळेस जुन्नर हें एक व्यापाराचें ठिकाण होतें असें दिसतें. पुढें पेशव्यांची राजधानी पुणें शहर झाल्यावर पेशव्यांनीं नाना, माळसेज, भीमाशंकर आणि कसुर हे घाट बरेच सोईचे केले होते असें दिसतें.

इ. स. १८२६ सालीं अस्तित्वांत असलेले रस्ते.
मुंबई- अहमदनगर रस्ता. पनवेलपासून या रस्त्याची लांबी १४८ मैल.

मार्ग - पनवेल-चौक-खालापूर-खोपवली-बोरघाट-खंडाळें-लोणावळें-खडकाळें-वडगांव-कुवले-तथवडे-औंध-पुणें-वाघोली-लोणी-कोरेगांव-गणपतीचें रांजणगांव-कर्दळवाडी-शिरूर-हिंगणी-कडुस-रांजणगांव-सारोळें-अकुळनेर-केडगांव.

 कल्याण-अवरंगाबाद  रस्ता  १८५ मैल.
 पुणें-सुरत  रस्ता  २५४ मैल.
 पुणें-कल्याण   रस्ता  ७५ मैल.
 पुणें-जुन्नर  रस्ता  ८५ मैल.
 पुणें-खंडाळा  रस्ता  ५० मैल.
 पुणें-धुळें  रस्ता  २०१ मैल.
 पुणें-अवरंगाबाद   रस्ता  १४४ मैल.
 पुणें-सोलापुर (सावळेश्वरमार्गें)  रस्ता  १५७ मैल.
 पुणें-सोलापुर(दिवाघाटमार्गें)  रस्ता  १५७ मैल.
 सोलापुर-सिकंदराबाद   रस्ता  १९२ मैल.
 पुणें-एदूर-बेळगांव  रस्ता  २४१ मैल.
 एदूर-धारवाड  रस्ता  २१३ मैल.
 पुणें-दापोली   रस्ता  ९७ मैल
 पुणें-गोरेगांव   रस्ता  ६६ मैल.
 पुणें-निपाणी  रस्ता  २११ मैल.
 पुणें-नागोठणें  रस्ता  ६४ मैल.

मराठ्यांच्या अमदानींत सह्याद्रीपार होण्यास दोन महत्त्वाचे मार्ग होते. (१) पुणें-कोल्हापूर-कर्नाटक. या रस्त्यास बोरघाट साल्पाघाट आणि न्हावीघाट लागत. (२) रत्‍नागिरी-पंढरपूर रस्ता कलढोण घाटांतून पंढरपूरकडे जात असे.

इ. स.१८२६ मध्यें सातारा जिल्ह्यांत पुढील रस्ते होते.

 

पुणें-सातारा-बेळगांव. (दोन रस्ते २४१ व २१३ मैल.)
सातारा-शिरूर ८७ मैल.
पुणें-सातारा-अहमदनगर.१२० मैल.
सातारा-सोलापूर (दोन रस्ते १३१ व १४८ मैल).
कर्‍हाड-राजापूर. ११७ मैल.
कर्‍हाड-मालवण. ११९ मैल. हा रस्ता कोल्हापूरवरून फोंडा घाटांतून जात असे.
सातरा -दापोली. (एक कुंभारली घाटांतून व दुसरा आंबोली घाटांतून).

देशावरून कोंकणांत यावयाचें म्हणजे मध्यंतरीं सह्याद्रि पर्वत लागतो. कुलाबा व ठाणा जिल्ह्याची एक सरहद्द सह्याद्रि पर्वतानेंच आंखली गेली आहे. त्या पर्वतावरून पलीकडे येण्याकरितां जे मार्ग आहेत त्यांस घाट असें म्हणतात. असे हे घाट ठिकठिकाणीं आहेत. महाबळेश्वरापासून राजमाचीपर्यंत जे घाट आहेत त्यांचीं नांवेः-
पार घाट- महाडाच्या आग्नेयीस सुमारें १५ मैलांवर किनेश्वरजवळ आहे. हा केवळ पायरस्ता असून येथून महाबळेश्वरास जातां येतें. इ. स. १८२६ सालीं वंजारी लोक या मार्गानें कोंकणांतून धान्य व मीठ नेत असत.

फिट्झजेरल्ड घाट- पारघाटाच्या उत्तरेस अर्ध्या मैलावर कापडें खुर्द या खेड्याजवळ हा घाट आहे. सातार्‍यास जाणार्‍या मार्गावर हा घाट आहे. येथून व्यापार बराच चालतो. महाडहून वाई व नहर येथें आणि वाई व नहरहून महाड येथें दरवर्षीं व्यापाराकरितां पुष्कळ माल येतो. कापडें येथें दस्तुरी होती.

ढवळा आणि कामठा घाट- फिट्झजेरल्ड घाटाच्या उत्तरेस सुमारें ५॥ मैलांवर आहेत. हे फक्त पायरस्ते असून यांचा कोणी फारसा उपयोग करीत नाहीं. या मार्गानें भोर संस्थानांतून वाई येथें जातां येतें.

वरंधा घाट- कामठा खिंडीच्या उत्तरेस पांच मैलांवर वरंधा नांवाच्या खेड्याजवळ हा घाट आहे. या घाटांतून हिरडोशी-भोर या गांवावरून पुण्यास रस्ता जातो. इ. स. १८६७ सालीं हा रस्ता तयार झाला. या घाटांतून बराच व्यापार होतो. वरंधा घाटाच्या उत्तरेस पाव मैलावर माझेरीजवळ उंबर्डें  घाट आहे. पायरस्त्याप्रमाणेंच याचा उपयोग होतो.

गोप्या घाट-उंबर्डे घाटाच्या उत्तरेस चार मैलांवर शिवतरजवळ गोंदे-पुणें रस्त्यावर हा घाट आहे.

आंबेनाळ घाट- गोप्या घाटाच्या उत्तरेस एक मैल आंबेशिवतरजवळ हा घाट आहे येथून पुण्यास जाण्यास मार्ग आहे परंतु व्यापाराकरितां याचा कोणी उपयोग करीत नाहींत.

मढ्या घाट- आंबेनाळ घाटाच्या उत्तरेस एक मैलावर वाकी बुद्रुख खेड्याजवळ हा घाट आहे. येथून पुण्यास जाण्यास मार्ग आहे.

शेवत्या घाट- मढ्या घाटाचे उत्तरेस अर्ध्या मैलावर हा घाट आहे. येथून भोर संस्थानांतील पांगारा व तोरणा या गांवांवरून पुण्यास जाण्यास मार्ग आहे.

कावळ्या घाट - शेवत्या घाटाच्या उत्तरेस सहा मैलांवर हा घाट आहे. फक्त पायरस्ता आहे.

कुंभ घाट- कावळ्या घाटाच्या उत्तरेस आठ मैलांवर आहे. मशीदवाडी रस्त्यांतून हा रस्ता जातो. फक्त पायरस्ता आहे.

लिंग घाट- कुंभ घाटाच्या उत्तरेस चार मैलांवर लिंग घाट आहे. येथून ओझीं लादलेली जनावरें येऊं शकतात.

निसणी घाट- लिंग घाटाच्या उत्तरेस दोन मैलांवर हा घाट आहे. हा फक्त पायरस्ता असून चढ अतिशय आहे.

ताम्हाणें, देवस्थळी व थिव घाट- निसणी घाटाच्या उत्तरेस सहा मैलांवर माणगांवच्या ईशान्येस १४ मैलांवर असलेल्या विळे खेड्याच्या सरहद्दींत हे घाट आहेत. हे फक्त पायरस्ते आहेत.

पिंपरी घाट- ताम्हाणे घाटांच्या उत्तरेस चार मैलांवर पिंपरी घाट आहे. येथून ओझीं लादलेलीं जनावरें येऊं शकतात. हा घाट फार उपयोगांत आहे.

या घाटांपैकीं फिट्झजेरल्ड घाट, वरंधा घाट, पिंपरी घाट, आंबोली घाट, तळ घाट, बोर घाट, नाना घाट, कसुर घाट वगैरे घाटांतून बैलांवरून व्यापार होत असे. बाकीचे बहुतेक घाट फक्त पायरस्ते होते.

ठाणें जिल्ह्याच्या पूर्वेकडील सरहद्दीवर ११५ मैल सह्याद्रि पर्वत आहे. या भागावर असलेले घाट खालीं लिहिल्याप्रमाणें.

अंबोली घाट- त्रिंबकहून मोखाड्यास जातां येतें. घाट सोपा आहे.

चंद्रे आणि हुंबे मेट- हे दोन मार्ग त्रिंबकहून मोखाड्यास जाण्याकरितां आहेत. चंद्रे मेट सोपा आहे. हुंबे मेट हा फक्त पायरस्ता आहे.

गोंदे घाट- त्रिंबकहून जव्हार. जव्हार संस्थानांतील बराच व्यापार या घाटांतून होत असे.

शीर घाट- त्रिंबकहून वसईस जाण्याकरतां हा घाट होता. हल्लीं येथून गाड्या जाऊं शकतात. वंजारी लोक बैलावरून नाशिक येथून भिवंडी व वाडा येथें माल नेत असत.

तळ घाट- कसारा आणि इगतपुरी यांच्या दरम्यान हा खडी घातलेला रस्ता आहे. इ. स. १८२६ सालीं हा सर्वांत सोपा रस्ता होता. बैलगाड्या येथून जात असत. हल्लीं रेल्वे झाल्यामुळें या मार्गावरून व्यापार कमी होतो.

पिंप्री घाट- नाशिकहून वसई किंवा कल्याण येथें जाण्यास हा घाट फार सोयीस्कर होता.

चोंढे-मेंढे- अहमदनगर जिल्ह्यांतील अकोला व राजुर गांवांहुन शहापुर व भिवंडी येथें जाण्याकरितां याचा उपयोग होत असे. या मार्गानें धनगर लोक कोंकणांत मेंढरें व बकरीं विकावयास घेऊन येत.

साद्रे घाट- अकोला तालुक्यांतून मुरबाड तालुक्यांत या घाटानें उतरतां येत असे. हा अतिशय कठिण रस्ता होता. दरोडेखोरांच्या टोळ्या कोंकणांत दरोडे घालण्याकरितां याचा उपयोग करीत.

निसणी घाट- मुरबाड तालुक्यांतून जुन्नर तालुक्यांत जाण्याकरितां. हाहि फार अवघड आहे. पायरस्ता म्हणून देखील कोणी हल्लीं हा फारसा उपयोगांत आणीत नाहीं.

माळसेज घाट- अहमदनगरहून कल्याणास जातांना लागणारा घाट. येथून हत्ती, उंट जाऊं शकत असत.

भोरांडे घाट- मुरबाड तालुक्यांतून जुन्नर तालुक्यांत जाण्याकरितां. हा घाट कठिण असून फक्त कोळीच याचा उपयोग करतात.

नाना घाट- मुरबाड तालुक्यांतून जुन्नर तालुक्यांत जाण्याकरितां. तळघाट आणि बोरघाट यांच्या खालोखाल या घाटाचा उपयोग होत असे.

पलु घाट- कल्याण ते जुन्नर पायरस्ता.

कुटे घाट- मुरबाड तालुक्यांतून खेड तालुक्यांत जाण्याकरितां. हा फार अवघड असून फक्त कोळीच याचा उपयोग करतात.

गोवेली घाट- मुरबाड तालुक्यांतून खेड तालुक्यांत जातो. हा अवघड पायरस्ता आहे.

अवापे घाट- पायरस्ता. मुरबाड तालुक्यांतून खेड तालुक्यांत     जातो.

शिदगड घाट- वरील प्रमाणेंच.

भीमाशंकर - देशावरून पनवेल पर्यंत जाणारा रस्ता. पूर्वीं या घाटानें गूळ वगैरे कोकणांत येत असे.

कसुर- सुस्थितींत आहे.

राजमाची घाट. यास कोंकण दरवाजा म्हणत.

फार प्राचीन काळापासून सोळाव्या शतकाच्या अखेरीपर्यंत चौल गांव व्यापाराचें केंद्रस्थान होतें व त्या वेळीं सह्याद्रीच्या पार घाटांतून व थळ घाटांतून हा व्यापार चालत असावा असें दिसतें. त्याचप्रमाणें त्या वेळीं चौलशीं बराच व्यापार बोर घाटांतून होत असावा असेंहि दिसतें. या व्यापाराची इ. स. १८२६ च्या सुमारास पुढें दिल्याप्रमाणें स्थिति होती.

इ. स. १८२६ सालीं पुणें जिल्ह्यांतून कुलाबा जिल्ह्यांत येण्यास खालील रस्ते होते.

१. सावे खिंडींतून उन्हेरी-राहुबगांव, चिकणी-नागोठणें. एकंदर रस्त्याची लांबी ६३ मैल.

२. पुणें- रत्‍नागिरी रस्ता- एकंदर लांबी १६३ मैल. हा रस्ता बिरवाडी-खरवली-माटवण-कंगुलु-दिवी-पोलादपूर याप्रमाणें होता.

३. पुणें-घोडेगांव रस्ता-एकंदर लांबी ६५ मैल. कुंभघाटांतून खालीं येऊन हा रस्ता निजामपूर-काळ तरमरी-कडापा या ठिकाणांवरून जात असे. या रस्त्यावर लागणारी गांवें-शिरसदबोरवाडी-हरोंडी-करंबेळी-ताम्हाणें-फुलसगांव-हटकेळी-तळेगांव-वडगांव इ०

४. पुणें-घोडेगांव रस्ता- एकंदर लांबी ५६ मैल. देवस्थळी घाटांतून खालीं उतरून उंबर्डी-शिरवली या गांवांवरून घोडेगांवास जात असे.

याशिवाय सावित्री नदीच्या तीरावर असलेल्या दासगांवापासून तीन रस्ते गेले होते.

१. दासगांव-नागोठणें. लांबी ३८ मैल.
२. दासगांव-शेवत्या घाटाचा माथा. लांबी २३ मैल.
३. दासगांव -खेड रस्ता. लांबी २७ मैल. पेण-पनवेल रस्ता. एकंदर लांबी २१ मैल.

इ. स. १८४० सालीं पुढील रस्ते तयार झाले. पेणेहून अलीबागेस जाण्यास तीन मार्ग होते.

१. पेण-नागोठणें-सांबरी-पोयनाड-अलीबाग. हा खुष्कीचा मार्ग होता. लांबी ४५ मैल.
२. पेण-कासू-सांबरी-पोयनाड-अलीबाग. यानें दळणवळण कमी असे. लांबी ३२ मैल.

३. पेण-धरमतर-पोयनाड-अलीबाग. मध्यंतरीं खाडी लागत असल्यामुळें पादचारी या रस्त्याचा क्वचितच उपयोग करीत. लांबी २४ मैल.

यानंतर इ. स. १८८१ सालीं आणखीं कांहीं रस्ते उपयोगास आणतां येण्यासारखे झाले. हे एकंदर रस्ते बारा होते. त्यांची एकंदर लांबी १८७ मैल होती. यांपैकीं तील रस्त्यावर पूल असून त्यांची एकंदर लांबी ४८ मैल होती. बाकीचे नऊ बरसातीखेरीज इतर आठ महिन्यांत उपयोगांत आणण्यासारखे होते.

१ नागोठणें-धरमतर रस्ता. लांबी १३ मैल. इ. स. १८८१ सालीं तयार झाला.
२ मुख्य रस्ता नागोठणें-कोलाड-माणगांव-महाड-पोलादपूर-महाबळेश्वरचा पायथा. लांबीं ५६ मैल.

नागोठणें-महाबळेश्वर रस्त्यास फुटलेले फांटे:-

३ कोलाड-रोहें. लांबी १० मैल.
४ माणगांव-निजामपूर. लांबी ७ मैल. (लोकलफंडी रस्ता)
५लोणेर-घोडेगांव (गोरेगांव) लांबी २ मैल.
६ महाड-नातें. लांबीं ४ मैल.
७ महाड-विन्हेरें-लांबी १२ मैल.
८ मुख्य रस्ता-वरंधा घाटाचा पायथा-लांबी ९ मैल.
९ मुख्य रस्ता- महाप्रळ. लांबी १६ १/२ मैल.
१० रेवस-अलीबाग. लांबी १५ मैल.
११ धरमतर-खोपवली (बोरघाटाचा पायथा). लांबी २५ मैल.
१२ खोपवली- अलीबाग.

नागोठणें-महाबळेश्वर रस्त्यावरील इंदापूर पासून तळ्यास एक रस्ता जातो. तो तेथून मालाटी या गांवीं मांदाड नांवाच्या खाडीवर जातो. पावसाळ्याशिवाय इतर वेळीं हा रस्ता उपयोगी पडतो. या खाडींतून माणगांव तालुक्यांतील माल जलमार्गानें बाहेर जात असे.

कुलाबा जिल्ह्यांत एकंदर ११ खिंडी आहेत. त्यांपैकीं दोन अलीबाग तालुक्यांत, पांच पेणमध्यें, दोन रोहें तालुक्यांत आणि दोन महाड तालुक्यांत आहेत.

 रस्ता   खिंडींचीं नावें.
 अलीबाग-धरमतर रस्ता  कारवली खिंड. पीर खिंड.
 धरमतर-खोपवली रस्ता  खाचर, गागडे, दहीवली गोविर्ले.
 नागोठणें-महाबळेश्वर रस्ता   सुकेळी, दासगांव.
 रोहें-अलीबाग पायरस्ता  चावरी खिंड.
 महाड-नातें रस्ता   चांभार खिंड.

कुलाबा जिल्ह्यांत एकंदर आठ दस्तुर्‍या होत्या त्या येणेंप्रमाणें:-

 रस्ता  दस्तुरी
 अलीबाग-रेवस रस्ता  मांडवा.
 अलीबाग-खोपवली रस्ता  १ कारली खिंड. २ करमळी
 महाबळेश्वर रस्ता   १ नागोठणें. २ वरसगांव. ३ पचपळें. ४ चांभारखिंड. ५ किनेश्वर

दरवर्षीं यांचा लिलांव होत असे. इ. स. १८८१-८२ सालीं या दस्तुर्‍यांचें उत्पन्न १५८१० रुपये झालें होतें.

 कुलाबा जिल्ह्यांत एकंदर ३१ नावा आहेत.
 अंबा नदीपार होण्याकरितां-  ४    नावा
 कुंडलिका नदीपार होण्याकरितां-  ५    नावा
 सावित्री नदीपार होण्याकरितां-  ४    नावा
 रायगड-काळ नदीपार होण्याकरितां-  ४    नावा

या शिवाय १४ नावा लहान लहान ओढ्यांवर व खाड्यांवर चालत असतात. यांपैकीं १६ सबंध वर्षभर चालू असतात व पंधरा फक्त पावसाळ्यांत चालू असतात.

कुलाबा जिल्ह्यांत चालू असलेल्या त्या वेळच्या सावकारीच्या धंद्याची पुढें दिलेल्या त्या वेळच्या व्याजाच्या दरांच्या तक्त्यावरून कल्पना येईल.

 इ. स. १८५४ सालचे कुलाबा जिल्ह्यांतील व्याजाचे दर.
 कर्जदाराची स्थिति  गहाण ठेवून  गहाण न ठेवून  व्याजाचा दर दरसाल शेंकडा 
 श्रीमंत  गहाण ठेवून  -  ७ ते ९
 श्रीमंत  -  गहाण न ठेवून  १२ ते १५
 मध्यम स्थिति शेतकरी  -  गहाण न ठेवून  १८ ते ३७

 

 इ. स. १८८२ सालचे व्याजाचे दर.
 कर्जदाराची स्थिति   गहाण  किती रक्कम  व्याजाचा दर दरमहा दरशेंकडा
 १ ते ३ १/
 शेतकरी  पिकांची मनोती   थोडी रक्कम   १ १/२ ते ३ /४
 जंगम गहाण   मोठी रक्कम   १/२ ते १
 स्थावर गहाण   मोठी रक्कम   ३/४ ते १
 मजूर  जामिनावर  -   १ १/२ ते २
 श्रीमंत शेतकरी  -  -   ३/८ ते ५/
 मध्यम शेतकरी  -  -   ३/४ ते १ १/
 गरीब शेतकरी  -  -   २ ते ६

इ. स. १८५४ सालीं अलीबाग येथें एक पेढी होती. ती मुंबई, पुणें आणि बनारस या गांवांवर हुंड्या देत असे.

 महीना  ज्या गांवांवर हुंडी दिली तें गांव   हुंडणावळ दर.
 नवंबर ते मे.  मुंबई    शेंकडा १/
 जून ते आक्टोबर   -  १/
 वर्षभर  पुणें   शेंकडा १
 वर्षभर  बनारस  शेंकडा २ ते ३

पांच हजारापेक्षां जास्त रकमेची हुंडी त्यावेळीं क्वचितच देत असत. परंतु जरुरीच्या वेळीं २५००० रुपयांपर्यंतची देखील हुंडी मिळत असे. इ. स. १८८२ सालीं अलीबाग येथून ५ रुपयांपासून ५००० पर्यंत मुंबई, अहमदाबाद, पुणें, सातारा, चिपळून आणि खेड या गांवांवर हुंड्या मिळत असत. मुदतीच्या हुंडीकरितां शेंकडा १/२ ते १ पर्यंत हुंडणावळ असे; व दर्शनी हुंडीची हुंडणावळ जरा जास्त असे.