प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग

प्रकरण ३ रें
असुरराष्ट्रसंस्थापनेच्या नंतरच्या इतिहासार्थ वेदावलोकन.

सूक्तांची युध्दोत्तरता आणि ती जाणण्यासाठी उपयोगी पडणा-या व्यक्ती.- ॠग्वेदमंत्रंचा दाशराज्ञ युध्दाशीं संबंध जाणण्यासाठी ज्या ज्या व्यक्तीच्या उल्लेखांच्या साहाय्यानें तो संबंध आपण तपासणार त्या व्यक्तीकडे लक्ष दिलें पाहिजे. व्यक्तीचा दाशराज्ञ युध्दाशी संबंध दिसून आला म्हणजे त्या व्यक्तीचा, ज्या सूक्तांत त्यांचा उल्लेख आला आहे त्या सूक्तांचे दाशराज्ञ युध्दाशीं पूर्वापरत्व काढण्याच्या कामी उपयोग होईल. ह्या व्यक्ती, त्यांची  दाशराज्ञ युध्दाशीं पूर्वोत्तरता, आणि त्यावरुन सूक्तांच्या पूर्वोत्तरते वर पडणारा प्रकाश येणेंप्रमाणें आहे.

अं शु:- (.५,२६). तुग्र प्रियमेध, उपस्तुत, शिंजार यांच्यासह उल्लेख. काल अनिश्चित तथापि अंशूचा उल्लेख सूक्तकाल निश्रयास अनवश्य. तुग्राच्या उल्लेखामुळें सूक्त उत्तरकालीन. तुग्र पहा.

अ क्ष:- (.४६,२४). सायणमताप्रमाणें व्यक्ति. नहुषसमकालीन. पृथुश्रवस् यांच्या दानस्तुतीत उल्लेख. नहुषसमकालीन असल्यामुळें सुदासोत्तर अक्षाबरोबर अरट्वाचा उल्लेख आहे.

अ ग स्त्य:- (.३३,१०). वसिष्ठ आणि अगस्त्य मित्रावरुणाचे मुलगे. वसिष्ठाचा सुदासाशीं पौरोहित्यसंबंध. तेव्हां अगस्त्याचा उल्लेख असलेली (.११७; १७०; १७९; १८०; १८४; .३३; .५; १०.६०). सूक्ते उत्तरकालीनच.

अ ग्रु:- (.३०,१६). कुमारीपुत्र. सूक्तांत यदुतुर्वशांचा उल्लेख असल्यामुळे सूक्त उत्तरकालीन. व्यक्तीचा प्रत्यक्ष संबंध नाही.

अ घा श्व:- (.११६,६). हा पैद्व होता. पेदुसंबंध पहा. दिवोदासाच्या उल्लेखामुळें सूक्त उत्तरकालीन.

अ जा स:- (.१८,१९). सुदासशत्रू. दाशराज्ञ युध्दांत शरण आल्यावर यांनीं इंद्राला अश्वशिरांचा बलि अर्पण केला, सूक्त उत्तरकालीन.

अ ति थि ग्व:- दिवोदासाचें नांव. यांचा उल्लेख असलेली (.५१; ३; ११२; १२३; .१४; .२६; .१८; २६; ४७; .१९;.५३; १०.४८) सूक्तें उत्तर.

अ त्क:- (१०.४९,५). अत्क व कुत्स यांचे इंद्रानें रक्षण केलें; अत्क कुस्ससमकालीन असावा. सायण अत्क ही व्यक्तिं मानीत नाहीं, कुत्सोल्लेखामुळें सूक्त उत्तर.

अ त्रि:- (.८६,१). प्रियमेध, कण्व, गौतम, कक्षी, वान यांच्यासह उल्लेख. पांचवे मंडल आत्रेय असून त्यांतील सूक्तद्रष्ठे अत्रिकुलोत्पन्न आहेत. प्रत्यक्ष अत्रीच्या नांवावर असलेल्या सूक्तांत (.८६) तो त्रिताचा उल्लेख करतो. त्रित पहा. अत्रीचा उल्लेख असणारीं सूक्तें (.४५; ११८; ३९; १८३; ५.४१; .५; १०.१४३; १५) उत्तरकालीन.

अ ध्रि गु:- (.१२२,२). भुज्यूसह उल्लेख. अश्वीनीं भुज्यू चेंव अध्रिगूचें रक्षण केलें. अध्रिगु भुज्युसमकालीन असावा. भुज्यु पहा. अध्रिगूचा आणखी उल्लेख दशग्वासह (.१२,२) या सूक्तांत आहे.

अ नु:- (.१८,१४). सुदासशत्रु. इंद्रानें सुदासाकरितां अनु, द्रुह्यु यांचा वध केला. अनूचा आणखी उल्लेख असलेले सूक्त (.१०) उत्तर.

अ पा ला:- (.९१,७). अनुक्रमणीप्रमाणें अत्रिकन्या. अत्रि पहा.

अ प्र वा न:- (.१०२,४), और्व भृगूसह उल्लेख. सूक्त द्रष्टा प्रयोग ह्मणतो, 'और्वभृगु, अप्रवान याप्रमाणें मी अग्नीला बोलावतो,' अप्रवान भृगुसमकालीन असावा. भृगु पहा. अप्रवान याचा आणखी उल्लेख (.७,१) या ठिकाणीं आहे.

अ भ्या व र्ती चा य मा न:- (.२७,८). पृथूंचा राजा. याला पार्थव म्हटलें आहे, पृथू हे सुदाससहकारी होते. अभ्यावर्ती चायमान दाशराज्ञ युध्दांत मारला गेला (.१८,८).

अं ब री ष:- (.१००,१७) वृषागिरपुत्र. ॠज्राश्व, सहदेव, भयमान व सुराधस् हे वृषागिरपुत्र होते. ॠज्राश्व व वार्षागिर पहा.

अ या स्य:- (१०.१३८,४). कुत्स, ॠजिश्वन् यांचा उल्लेख असलेल्या सूक्तांत उल्लेख. अयास्याचा आणखी उल्लेख (.६२; ८.६२; .४४; १०.६७; १०.८). या सूक्तांत आहे. परंतु तो व्यक्तिवाचक नाही. याचा उल्लेख जुन्या मंडळांतून येत नसल्यामुळे हा फारच उत्तरकालीन असावा.

अ र ट्व:- (.४६,२७).अक्षाबरोबर उल्लेख. अक्ष पहा.

अ र्च ना न स् :- (.६४,७). अनुक्रमणीप्रमाणें अत्रिपुत्र; व रथवीति दार्भ्य याचा पुरोहित. दार्भ्य पहा.

अ र्जू न:- (.१२२,५). कुत्स पिता. कुत्साला आर्जुनेय म्हटलें आहे. अर्जुनाचा उल्लेख कुत्सामार्फतच आला आहे. सुक्त उत्तरकालीन.

अ र्ण:- (.१९,६). इंद्रानें तुर्वशाकरितां सरयू नदीवर अर्णाचा पराभव केला. सूक्त उत्तरकालीन.

अ लि ना स:- (.१८,७). सुदासशत्रु. सूक्त सुदासोल्लेखामुळें उत्तरकालीन.

अ व त्सा र:- (.४४,१०). क्षत्र, मनस्, एवावद, यजत सध्रि, अवत्सार यांचा एकत्र उल्लेख. कदाचित् समकालीन असावे. सूक्ताचा द्रष्टा अवत्सारच असून तो ॠचा १२ मध्यें सदापृण, बाहुवृक्त, श्रुतवित् , तर्य यांचा उल्लेख करतो; व ॠचा १३ मध्यें सुतंभराला आपला यागनिर्वाहक समजतो. यावरुन सुतंभरहि याचा समकालीन असावा. सुतंभरसंबंध पहा. सूक्त उत्तरकालीन. 


अ व स्यु:- (.३१,१०). 'सर्व स्तोत्यांनी इंद्राची स्तुति करावी' असें अवस्यु इच्छितो. या सूक्ताचा द्रष्टा अवस्यु आहे. ८ व्या ॠचेत 'इंद्रानें यदुतुर्वशांनां तरुन नेलें व कुत्साला रक्षिलें' असा उल्लेख करतो. अवस्यूचा आणखी उल्लेख (.७५) या सूक्तांत आहे. दोन्ही सूक्तें उत्तरकालीन.

अ श्व थ:- (.४७,२४). पायूचा आश्रयदाता. अश्वथ प्रस्तोकाचेंच नांव. प्रस्तोक पहा. सूक्त उत्तरकालीन.

अ श्व मे ध:- (.२७,४-५-६). त्र्यरुण दानस्तुतींत उल्लेख. अनुक्रमणीप्रमाणें भरतपुत्र. अश्वमेध, त्रसदस्यु, त्र्यरुण, त्रैवृष्ण, ही एकाच व्यक्तीची नांवे असावीं. सूक्त उत्तरकालीन.

अ श्व्य:- (८.२४,२५) कुत्साचें रक्षण करण्याविषयी अश्व्य इंद्रास प्रार्थितो. अनुक्रमणीप्रमाणें अश्व्य, वैयश्व, विश्वमनस् ही एकाच व्यक्तीची नांवे आहेत. अश्व्याचा आणखी उल्लेख (१.११२) या सूक्तांत आहे. दोन्ही सूक्तें उत्तरकालीन.

अ स मा ति:- (१०.६०,२). हा इक्ष्वाकु कुलांतील असावा. याच सूक्तांत इक्ष्वाकूचा उल्लेख आहे. सूक्ताचे द्रष्टे गोपायन कुलांतील बंधु, सुबंधु, विप्रबंधु व श्रुतबंधु हे असून अनुक्रमणीप्रमाणें ते अगस्त्याचे भाचे होते. याच सूक्ताच्या ६ व्या ॠचेंत सूक्तद्रष्टा 'आम्हांस धन देण्यासाठी तूं रथाला घोडे जोडून यें' अशी राजाची प्रार्थना करतो. अगस्त्यसंबंधामुळें सूक्त उत्तरकालीन.

अह्नवाय्य:- (.४५,२७). यदुतुर्वशशत्रु. इंद्रानें यवुतुर्वशांकरितां अह्नवाय्यास मारिलें.

आजमीळहास:- (.४४,६) येथें उल्लेख असून अजमीळह व पुरुमीळह हे या सूक्ताचे द्रष्टे आहेत. पुरुमीळह पुरुवंशज असावा. पुरुमीळह पहा. सूक्तद्रष्टा पुरुमीळह असल्यामुळें सूक्त उत्तरकालीन.

अ ति थि ग्व:- अतिथिग्ववंशज याचा उल्लेख असलेलें सूक्त (.६) उत्तर.

आ य व स:- (.१२२,१५). नहुषांचा राजा मशर्शार  याच्यासह उल्लेख. सुक्तद्रष्टा कक्षीवान म्हणतो; 'मशर्शार आणि आयवस यांचे मुलगे मला त्रास देतात' सूक्तद्रष्टा कक्षीवान असल्यामुळें सूक्त उत्तरकालीन.

आ यु:- (१.५३,१०). इंद्राने सुश्रवस नामक राजाकरितां कुत्स, अतिथिग्व, आयु, यांचा पराभव केला. आयूचा आणखी उल्लेख असलेली सूक्तें (.१८; ८.५३) उत्तरकालीन.

आ र्च त्क:- (.११६,२२). याचें नांव शर. अश्वी देवांनी याला पाण्यांतून वर काढिलें. प्रत्यक्ष संबंध नाही. सूक्तद्रष्टा कक्षीवान. सूक्त उत्तरकालीन.

आ र्ष्टि षे ण:- (१०.९८,). ॠष्टिषेणपुत्र. देवापि व शंतनु यांचे पैतृक नांव. देवापि व शंतनु हे भरत कुलांतील असावे. देवापि पहा.

आश्वघ्न:- (१०.६१,२१). सायणमताप्रमाणें नामानें दिष्ठाचेंच नांव. या सूक्ताचा द्रष्टा नाभानेदिष्ठ असून सूक्ताच्या १५ व्या ॠचेंत तो कक्षीवानांचा उल्लेख करतो. तेव्हां आश्वघ्न, नाभानेदिष्ठ कक्षीवानसमकालीन असावा.

आश्वमेध:- (.६८,१६). आतिथिग्व, इंद्रोत यांच्या सह एकाच दानस्तुतीत उल्लेख. प्रियमेधाचा आश्रयदाता. सूक्त उत्तरकालीन.

आ सं ग प्ला यो गि:- (८.१,३१). मेधातिथीचा आश्रयदाता. याच सूक्तांच्या ३१ व्या ॠचेंत याला 'याद्व: पशु: म्ह. यदूंतील श्रेष्ठ असें म्हटलें आहे. यावरुन हा यदूंचा राजा असावां. सूक्त उत्तरकालीन. 

आस्त्रबुध्न:- (१०.१७१,३). इंद्राने आस्त्रबुध्नाकरितां वेन्याला (वेनाला) मोकळें केलें. पृथु हा वेनाचा मुलगा पृथुसंबंध पहा. वेन्याच्या उल्लेखामुळें सूक्त उत्तर.

इ क्ष्वा कु:- (१०.६४,४) इक्ष्वाकु भरतकुलांतील होता. असमाति पहा. सूक्त उत्तर.

इ लि बि श:- (.३३,१२). एक असुर. प्रत्यक्ष संबंध नाही. कुत्सोल्लेखामुळें सूक्त उत्तर.

इ ट:- (१०.१७१,१). अनुक्रमणीप्रमाणें भृगुपुत्र या सूक्ताचा हाच द्रष्टा असून ३ -या ॠचेंत आस्त्रबुध्न, वेन्य, यांचा उल्लेख करतो. यावरुन वेन्यसमकालीन असावा. वेन्योल्लेखामुळें सूक्त उत्तर.

इं द्रो त:- (.६८,१७). अतिथिग्ववंशज. सूक्त उत्तर.

उ क्ष ण्या य न:- (.२५,२२). विश्वमनस्चा आश्रयदाता. विश्वमनस् पहा. सूक्त उत्तर.

उ ग्र दे व:- (.३६,१८). दुर असलेल्या यदु, तुर्वश व उग्रदेव यांना अग्नीसह बोलावतो असें सूक्तद्रष्टा कण्व म्हणतो. यदुतुर्वशोल्लेखामुळें सूक्त उत्तर.

उ प म श्र व स्:- (१०.३३,७). कुरुश्रवणपुत्र. याच सुक्तांत याला त्रासदस्यव असेंहि म्हटलें आहे. यावरुन हा त्रसदस्युवंशज असावा. सूक्तांत पर्शूंचा उल्लेख असल्यामुळें सूक्त उत्तर. 

उ र ण:- (.१४,४). इंद्रशत्रु एक असुर. अतिथिग्वाच्या उल्लेखामुळे सूक्त उत्तर.

उ रु: क क्ष:- (६.४५,३१). गांग्य लोकांचा राजा ('गांग्यांचा जसा उरु:कक्ष मुख्य होता तसा वृबु पणीचा मुख्य झाला). यदूंच्या उल्लेखामुळे सुक्त उत्तर.

उ श ना-का व्य:- (.२९,९). उशनस्काव्य याच्या स्तुतीने इंद्र्र कुत्साच्या घरीं आला. उशनस् कुत्साचा पुरोहित असावा. उशनस्चा आणखी उल्लेख असलेलीं सूक्तें (.५१; ८३; १२१; १३०; .१६; २६; .२९; ३१; ३४; .२०; .७; २३; .८७; ९७; १०.२२; ४०). उत्तरकालीन.

उ शि ज:- (.१३१,५). सायणांनीं या ठिकाणीं उशिज हें नाम मानिलें नाही. परंतु कक्षीवानाला व ॠजिश्वन्ला औशिज म्हटलें आहे. कदाचित हा उशिज, कक्षीवान व ॠजिश्वा यांचा पिता असावा.

उ शी न रा णी:- (१०.५९,१०). उशीनराची स्त्री. प्रत्यक्ष संबंध नाहीं. अगस्त्य, इक्ष्वाकु यांच्या उल्लेखामुळें सूक्त उत्तर.

ऊ र्ज व्य:- (.४१,२०). प्रत्यक्ष संबंध नाही. कण्वोल्लेखामुळें सूक्त उत्तर.

ऋ क्ष सू नु-आ र्क्ष:- (.६८,१५). प्रियमेधाचा आश्रयदाता. आतिथिग्व-इंद्रोत व आर्क्ष-ऋक्षसूनु यांजकडून दान मिळाल्याचे प्रियमेध उल्लेखितो. आर्क्षाचा आणखी उल्लेख (.७४) या सुक्तांत आहे. सूक्त उत्तर.

ॠ जि श्व न्:- (.२०,७). विंदथिनपुत्र. ॠजिश्वन् यांला वैदथिन् असें म्हटलें आहे. ॠजिश्व्याला 'औशिज ॠजिश्वा' असें म्हटलें आहे. व कक्षीवानालाहि औशिज म्हटलें आहे. तेव्हां औशिज ॠजिश्वा व वैदथिन-ॠजिश्वन् हे एकच असावे असें वाटतें; व त्याप्रमाणें ॠजिश्वन् व कक्षीवान हे भाऊ होतात. इंद्रानें ॠजिश्व्याकरितां पिप्रूस मारिलें. ॠजिश्वन्चा आणखी उल्लेख असलेलीं सूक्ते (.५३; १०१; .१६; .२९; ८.४९; १०.९९; १३६.) उत्तर.

ॠ जू न स्:- (.५२,२). प्रत्यक्ष संबंध नाही. आयूच्या उल्लेखामुळें सूक्त उत्तर.

ॠज्राश्व:- (.१००,१७). वृषागिरपुत्र. अंबरीष, सहदेव, भयमान, सुराधस् यांच्या सह उल्लेख. ॠज्राश्व 'नहुषांच्या प्रजेसह युध्दास येणारा' असें इंद्राला म्हणतो. ॠज्राश्व नहुषसंबंधी असावा. नहुष व मशर्शार पहा. सूक्त उत्तर. आणखी उल्लेख (.११६; ११७).

ॠ णं च य:- (.३०,१२). रुम, रुशम यांचा राजा. कण्व रुमरुशमांचे पुरोहित होते. कण्वांनी रुमरुशमांकडून इंद्राला बोलाविलें (.४,२). कण्व पहा. सूक्त उत्तर. आणखी उल्लेख (.११६; ११७).

ॠ त स्तु भ:- (.११२,२०). भुज्यु व ॠतस्तुभ यांचे इंद्रानें रक्षण केलें. भुज्यु व ॠतस्तुभ समकालीन असावे. भुज्यूच्या उल्लेखामुळें सूक्त उत्तर.

एकद्यू:- (८.८०,१०). अनुकमणीप्रमाणें नोधसपुत्र. नोधससंबंध पहा. नोधससंबंधामुळें एकद्यूचा उल्लेख असलेलें सूक्त उत्तर.

ए त श:- (.१,११). इंद्रानें कुत्सासह एतशाचें रक्षण केलें. कुत्ससंबंध पहा. एतशाचा आणखी उल्लेख असलेली सूक्तें (.५४; ६१; १२१; १६८; .१९; .१७; ३१; .२९; ३१; .१५; .१; ५०). उत्तरकालीन.

एवावद:- (.४४,१०). अवत्सारसहोल्लिखित. अवत्सार पहा. पक्यांच्या उल्लेखामुळें सूक्त उत्तर.

ओ ग णा स:- (१०.८९,१५). अनुक्रमणीप्रमाणें विश्वामित्रपुत्र रेणु याच्या सुक्तांत उल्लेख. रेणु म्हणतो, 'मला त्रास देणारे ओगण अंधारांत जावोत'. ओगण विश्वामित्रपुत्रसमकालीन असावे. सुक्त उत्तर.

औ च थ्य:- (.१५८,१;४). उचयपुत्र; दीर्घतमस्ंचें दुसरें नांव. त्याच सूक्तांत (१५८,६) मामतेयाचा उल्लेख आहे. मामतेयाबरोबर (.९,१०) मध्यें कक्षीवान्, व्यश्व पृथी, वैन्य यांचा उल्लेख येतो कक्षीवान्, व्यश्व दीर्घतमस् व वैन्यपृथी यांनी अश्वीची स्तुति केली, यावरुन ते समकालीन असावे.

औ र्ण वा भ:- (२.११,१८). याशिवाय याचा उल्लेख (.३२;७७) या स्थळी असून शेवटच्या स्थळीं कण्वकुलोत्पन्न कुरुसुति याच्या सूक्तांत उल्लेख आहे. प्रत्यक्ष संबंध नाही.

औ र्व:- (.१०२,४) उरुंचा वंशज याचा भृगु, अप्रवान, त्यांच्या सह आणि सुदासशत्रू द्रुह्य व भृगु (.१८,६) यांच्या सह उल्लेख येतो. और्वभृगु हें भृगूचें नांव असावें. भृगुसंबंध पहा. ओर्वभृगु तुर्वशसंबंधी असावे.

औ ला न:- (१०.९८,११). हे शंतनूचें नांव होतें असें मॅकडोनलचें मत आहे. शंतनु भरत होता व त्याचा आर्ष्ठिषेण-देवापी बरोबर (१०.९८, १; ३; ७) उल्लेख आहे.

औ शि ज:- (.१८,१) ॠजिश्वन्चें दुसरें नांव असून कक्षीवान् यालाहि उपर्युक्त स्थली तेंच नांव दिलें आहे. कक्षीवानाचा आश्रय दाता भाव्य हा असून त्याचा कक्षीवानासह (.१२६) उल्लेख आहे. भाव्य (भावयव्य) हा भस्त होता; व कक्षीवानाच्या (.११९) सूक्तांत दिवोदासाचा उल्लेख आहे. औशिजाचा उल्लेख असलेलीं सूक्तें (१.१८; ११९; १२२; .२१; .४१; .४; १०.९९) उत्तरकालीन.

क कु ह:- (.६,४८). याचा याद्वाबरोबर उल्लेख आहे. सूक्त उत्तरकालीन. ककुहानें जिकिंलेले याद्व (लोक) स्तोत्यास दिलें. हा याद्वांचा शत्रु असावा.

क क्षी वा न्:- (.१८,१). याच्या सूक्तांत दिवोदासाचा उल्लेख येतो यावरुन हा दिवोदासोत्तरकालीन ठरतो. याचा उल्लेख असलेली सूक्तें (.५१; १२२; ११६; ११७; १२६; .२६; .; ९.७४; १०.२५; ६१; १४३). कक्षीवान् यास दुसरें नांव ॠजिश्वन् असें होते. याला औशिज असेंहि म्हटलें आहे. औशिज पहा. कक्षीवान् १.११६ ते १२६ या सूक्तांचा द्रष्टा आहे.

क ण्व:- कण्वाचा व्यक्तिवाचक नांवापेक्षां कुलवाचक नांव म्हणून अधिक उल्लेख येतो. यदुतुर्वश व कण्व यांचा एकत्र उल्लेख अनेक स्थळीं येतो. कण्व यदुतुर्वशांचे पुरोहित असावे. कारण 'यदु व तुर्वश हे तुझ्या प्रसादानें सुखी असलेले मी पहावे' अशी कण्वकुलोत्पन्न देवातिथि इंद्राची प्रार्थना करतो. यावरुन कण्वाचा उल्लेख असलेली सूक्तें (.१४; ३६; ३७; ३९;४४; ४५; ४६; ४७; ४८; ४९; ११२; ११७; १३९; .२; ३; ४; ; ६; ७; ८; ९; ३२; ३३; ३४; ४९; १०.३१; १५०) व ज्या सूक्तांचे कण्व द्रष्टे आहेत अशी (.३६ ते ४३) सूक्तें उत्तरकालीन.

क द्रु व:- (.४५,२६). यदुतुर्वशांचा उल्लेख असलेल्या सूक्तांत उल्लेख आहे. प्रत्यक्ष संबंध नाही. यदुतुर्वशोल्लेखामुळें सूक्त उत्तर.

क म द्यू:- (१०.६५, १२). भुज्यूबरोबर एकाच ॠचेत उल्लेख. कमद्यू ही विमदाची बायको होती. अश्वीदेवांनी भुज्यूचें रक्षण केलें व विमदास कमद्यू दिली. भुज्यूचा उल्लेख असल्यामुळें सूक्त उत्तरकालीन, प्रत्यक्ष संबंध नाही.

क रं ज:- (.५३,८). असुर: इंद्रशत्रु; यदु, तुर्वश, कुत्स, आयु वगैरेंचा उल्लेख असलेल्या सूक्तांत उल्लेख असल्यामुळे सूक्त उत्तर प्रत्यक्ष संबंध नाहीं.

क र्के धु:- (.११२,६) या उत्तरकालीन सूक्तांत उल्लेख येतो. प्रत्यक्ष कोणाशीं संबंध नाही. सूक्त उत्तर.

क लि:- (.११२,१५). उत्तरकालीन सूक्तांत अश्वी देवांनी रक्षण केल्याचा उल्लेख प्रत्यक्ष संबंध नाही.

कवष:- अनु द्रुह्यु यांचा सहचर. श्रुत, कवष, वृद्ध, अनु, द्रुह्यु यांना इंद्रानें पाण्यांत बुडविलें. (.१८,१२) या उत्तर कालीन सूक्तांत उल्लेख.

क वि:- उशनस् याच्या बापाचें नांव. उशनस् पहा.

क शु:- (.५,३७). अगस्त्य याचा उल्लेख असलेल्या सूक्तांत उल्लेख. चेदीचा पुत्र. कण्वकुलांतील ब्रह्मातिथि (सूक्त द्रष्टा) कशृनें दान दिल्याचें वर्णितो. कण्व पहा.

क शो जु:- (.११२,१४). दिवोदासाचें विशेषण. सदरहू सूक्त उत्तरकालीन आहे.

क श्य प:- (.११३,११४). या सूक्तांचा द्रष्टा व (.११४,२) यांत उल्लेख. प्रत्यक्ष संबंध नाही.

का नी त:- (.४६,२४). याचेच नांव पृथुश्रवस्. याचा उल्लेख, नहुषाचा उल्लेख असलेल्या उत्तरकालीन सूक्तांत आहे. कानीत हा अश्व्य याचा आश्रयदाता. अश्व्य पहा.

काव्य:- उशनस्चें नांव. उशना पहा.

की क ट:- (.५३,१४). सुदासानें विश्वामित्रासह कीकट देशावर स्वारी केली. सुदासाचा उल्लेख असल्यामुळें सूक्त उत्तरकालीन.

कु णा रु:- (.३०,८). विश्वामित्राच्या सूक्तांत उल्लेख आहे. प्रत्यक्ष उल्लेख नाही. सूक्तद्रष्टा विश्वामित्र असल्यामुळें सूक्त उत्तर.

कु त्स:- अतिथिग्व, कुत्स व आयु यांचा तूर्वयाणान पराभव केला म्हणून कुत्साचा उल्लेख असलेली (.३३; ५१; ५३; ६३; १०६; ११२; १२१; १७४; १७५; .१४; १९; .१६; २६; ३०; .२९; ३१; .१८; २०; २६; ३१; .१९; २५; .१; २४; ५३; १०.२९; ३८; ४०; ४९; ९९; ३८) सूक्तें व ज्या सूक्तांचा कुत्स द्रष्टा आहे तीं (.९४ ते ९८; १०१ ते १०४; १०६ ते ११५) व ९.९७ या सूक्तांतील ॠचा उत्तरकालीन.

कु य व:- (.१९,६). कुत्साकरितां इंद्र्रानें कुयवाला मारिलें. कुत्साबरोबर उल्लेख असल्यामुळें कुयवाचा उल्लेख करणारी सुक्तें (१.१०३; १०४; २.१९; ४.१६; .३१; .१९) उत्तर.

कुरंग :- (.४,१९). तुर्वशाबरोबर उल्लेख आला आहे. सूक्तद्रष्टा देवातिथि म्हणतो, ' सर्व तुर्वशांमध्यें श्रेष्ठ असें दान कुरंगानें मला दिलें.यावरुन कुरंग हा तुर्वशांचा राजा असावा. सूक्त उत्तर.

कुरुश्रवण:- (१०.३३,४). त्र चा मुलगा. यालाचा पौरुकुत्स (.३३,८), पौरुकुत्सि (.१९,३), पौरुकुत्स्य (८.१९,३६) असें म्हटलें आहे. सुदास (.६३,७) व दिवोदास (.१३०,७) हे पुरुकुलांतील होते. व पुरुकुत्स हाहि पुरुकुलांतील होता. कुरुश्रवणाचा आणखी उल्लेख (१०.३२,९) मध्यें आहे. पुरुकुत्स व त्रसदस्यु पहा.

कु शि क:- सुदासपुरोहित विश्वामित्र याच्या पित्याचें व कुलाचें नांव कुशिकाचा उल्लेख असलेली सूक्तें (.२६; २९; ३०; ३३; ४२; ५३) उत्तरकालीन.

कृ प:- (.४,२). सायणमतानें एक राजा. इंद्रानें रुम रुशम, श्यावक व कृप यांचे रक्षण केलें. रुम रुशम पहा. सूक्त उत्तर.

कृ ष्णि य:- (.११६, २३; ११७, ७) या कक्षीवानाच्या सूक्तांत उल्लेख. प्रत्यक्ष संबंध नाही.

कौ र या ण:- (.३,२१). कुरयाणपुत्र. याचेंच नांव पाकस्थामन् मेधातिथि (काण्व) याचा आश्रयदाता. रुम रुशमांच्या उल्लेखामुळे सूक्त उत्तर.

कौ लि त र:- (.३०,१४). शंबराचें दुसरें नांव. शंबर सुदासशत्रु होता. शंबरोल्लेखामुळें सूक्त उत्तर.

क्रि वि:- (८.२२,१२). प्रत्यक्ष संबंध नाही. किवीचा आणखी उल्लेख (.२०; ५१; ८७; .९) येथें आहे. पक्थोल्लेखामुळें सूक्त उत्तर.

क्ष त्र श्री:- (.२६,८). प्रातर्दनीचें दुसरें नांव. भरद्वाजाचा आश्रयदाता. या सूक्ताचा द्रष्टा भरद्वाज क्षत्रश्रीपासून धन मिळाल्याचें उल्लेखितो. प्रातर्दनि प्रतृदवंशज असावा. प्रतृद तृत्सू होते. सुदासोल्लेखामुळें सूक्त उत्तर.

खेल:- (.११६, १५). वसिष्ठबंधु अगस्त्य याचा आश्रयदाता. दिवोदासोल्लेखामुळें सूक्त उत्तरकालीन.

ग य प्ला त:- (१०.६३,१७). प्लतिपुत्र. या सूक्ताचा हाच द्रष्टा असून 'नहुषपुत्र ययाति याच्या यज्ञाला जाणारे देव मला धन देवोत' असा सूक्तांत उल्लेख करतो. यावरुन गथप्लात हा नहुष समकालीन असावा. नहुषांचा पराभव करुन इंद्रानें यदुतुर्वशांनां मदत केली (१०.४९,८). गयाचा आणखी उल्लेख (१०.६४) या सूक्तांत आहे.

गविष्ठिर:- (१०.१५०,५) या सूक्ताचा द्रष्टा मृळीक म्हणतो, 'भरद्वाज, अत्रि, त्रसदस्यु, गविष्ठिर यांसह अग्नि माझें रक्षण करो.' यावरुन गविष्ठिर त्रसदस्युसमकालीन असावा. गविष्ठिराचा आणखी उल्लेख असलेले (५.१) सूक्त उत्तरकालीन.

गांग्य:- (.४५,३१). उरु:कक्ष याचेंच नांव. उरु:कक्ष पहा.

गुंगु:- (१०.४८,८). एका जातीच्या लोकांचे नांव. अतिथिग्वशत्रु. इंद्रानें या लोकापासून अतिथिग्वाचें रक्षण केलें व पर्णय आणि करंज यांना मारिलें. पर्णय व करंज हे गुंगूंचे राजे असावे. सूक्त उत्तरकालीन.

गृत्समद:- (.१९,८), यानें केलेल्या इंद्रस्तुतीत दिवोदासाचा उल्लेख आहे. दुस-या मंडलास गार्त्समदमंडल असें म्हणतात. त्या मंडलांतील सूक्तांचे द्रष्टे गृत्समदकुलांतील होते. प्रत्यक्ष गृत्समदाचा उल्लेख (.४; १९; ३९; ४१) या सूक्तांत आहे.

गै रि क्षि त:- (.३३;८). त्रसदस्यूचें पैतृकनाम. सूक्त उत्तरकालीन.

गोतम:- (.४,११) गोतम द्रष्टा असलेल्या सूक्तांत तो उशनस् याचा उल्लेख करतो (.८३). उशनस् कुत्सपुरोहित होता. गोतमाचा उल्लेख असलेली (.६०-६३; ७७-७९; ८५; ८८; ९२; ११६; १८३; ४.४; ३२; ८.८८) सूक्तें व तो द्रष्टा असलेली सूक्तें (.७४-९३) उत्तरकालीन.

गो प व न :- (.७४,११). आर्क्ष-श्रुतर्वन् यापासून दान घेणारा. आर्क्ष-ॠक्षपुत्र व आतिथिग्व इंद्रोत हे आपल्याला दान देत असल्याचें प्रियमेध उल्लेखितो (.६८,१५). सूक्त उत्तर.

गोशर्य:- (.४९,१०). 'पक्थ, कण्व, त्रसदस्यु व गोशर्य यांचे रक्षण केलें त्याप्रमाणेंच माझें रक्षण कर' असें सूक्तद्रष्टा प्रियमेध म्हणतो. यावरुन गोशर्य हा कण्व, पक्थ, त्रसदस्यु यांचा समकालीन असावा. गोशर्याचा आणखी उल्लेख असलेलीं सूक्तें (८.८;५०) उत्तरकालीन.

गौ रि वी ति:- (.२९,११). अनुक्रमणीप्रमाणें वसिष्ठ किंवा शक्ति याचा मुलगा. या सूक्ताचा द्रष्टा हाच असून तो 'वैदथिन् याचें रक्षण करुन त्याचा सोम प्राशन केलास' असें इंद्राला म्हणतो. वैदथिन्समकालीन असावा. सूक्त उत्तरकालीन.

घो ष:- (.१२०,५) सर्वानुक्रमणीप्रमाणें कक्षीवानपुत्री घोषा हिचा मुलगा. याचा पज्रिय कक्षीवानाचा उल्लेख असलेल्या सूक्तांत उल्लेख येतो. कक्षीवान् पहा.

घो षा:- (.११७). कक्षीवान्कन्या (सर्वानुक्रमणीप्रमाणें). कक्षीवान् , पेदु, वगैरेचा उल्लेख असणा-या सूक्तांत उल्लेख आहे. कक्षीवान् पहा.

चा य मा न:- (.२७,८). याचेंच नांव अभ्यावर्तिन्. अभ्यावर्तिन् पहा. आणखी उल्लेख (.१८).

चित्र:- (.२१,१८). सर्वानुक्रमणीप्रमाणें (८.१९;२२) या सूक्तांचा द्रष्टा असलेल्या सोभरीच्या ॠचेंत उल्लेख. सोभरीचा आश्रयदाता, सोभरीच्या सूक्तांत पक्थ, त्रसदस्यु, तृक्षि इत्यादि अनेक व्यक्तीचा उल्लेख असल्यामुळें उत्तरकालीन. सोभरि पहा.

चित्ररथ:- (.३०,१८). तुर्वशशत्रु. तुर्वशांकरितां इंद्रानें याचा सरयूनदीवर पराभव केला. सूक्त उत्तरकालीन.

चुमुरि:- (.१९,१४). इंद्रानें दभीतीकरितां धुनि आणि चुमुरि यांनां मारल्याचा उल्लेख आहे व दभीतीबरोबर तुर्वीतीचें रक्षण केल्याचा उल्लेख (.११२,२३) आहे. तुर्वीति हा लुडविगमतानें यदुतुर्वशांचा राजा होता. यावरुन चुमुरीचा उल्लेख असणारी सूक्तें (.१५; .१८; २०; २६; .१९; १०.११३) उत्तरकालीन.

चै द्य:- (८.५,३७). कशूचें पैतृक नांव. कशु पहा.

च्यवन-च्यवान:- (१०.६१,१). अश्वीचा उपासक व पक्थांचा राजा तूर्वयाण याचा विरोधी. याचा आणखी (.११६; ११७; ११८; .७५; .६८; ७१; १०.५९; ६१) या ठिकाणीं उल्लेख असल्यामुळें सूक्तें उत्तरकालीन.

च्य व ता न:- (.३३,९). च्यवतान, ध्वन्य, मारुताश्व, पुरुकुत्स हे संवरणाचे आश्रयदाते होते. एकाच व्यक्तीचे आश्रयदाते असल्यामुळें ते पुरुकुत्ससमकालीन असावे. सूक्त उत्तरकालीन.

ज म द ग्नि:- (.५३,१५). यानें विश्वामित्राला 'ससर्परी' नामक वाणी दिली. जगदग्नीचा उल्लेख असलेली सूक्तें (.६२; .९६; .१०१; .६२; ५; ९७; १०.१६७) उत्तरकालीन शिवाय (.६५; ६७; १०.११०) हीं जमदग्नि द्रष्टा असलेली सूक्ते उत्तरकालीन.

ज रु थ:- (.९,६). वसिष्ठानें अग्नि प्रदीप्त केला आणि अग्नीनें जरुथ यास मारिलें. जरुथ वसिष्ठसमकालीन असावा. जरुथाचा उल्लेख करणारी सूक्ते (७.१; ९; १०.८०) उत्तरकालीन.

ज न्हा वी:- (.११६,१९; ३.५८). जन्हुसंबंधी प्रजा. उल्लेख उत्तरकालीन सूक्तांत आहे. ग्रिफिथ मताप्रमाणें कुशिकाच्या वंशास 'जन्हावी' म्हटलें आहे. जन्हु कुशिकांचा पूर्वज असावा.

जा तू ष्ठि र:- (.१३,११). सुदास-दिवोदासकालीन पुष्कळशा व्यक्तींचा उल्लेख आला असल्यामुळें उत्तरकालीन ठरलेल्या सुक्तांत उल्लेख. प्रत्यक्ष संबंध नाही.

जा हु ष:- (.७१,५). पक्थांचा राजा तूर्वयाण याच्या विरुद्ध असलेल्या च्यवनाबरोबर याचा उल्लेख आहे. शिवाय उत्तरकालीन ठरलेल्या (.११६) या सूक्तांत उल्लेख आहे. प्रत्यक्ष संबंध नाही.

तकवान:- (.१२०,६). कक्षीवान्पुत्र तकु याचा पुत्र (मॅकडोनल्) उत्तरकालीन सूक्तांत उल्लेख. कक्षीवान्ंसंबंध पहा.

तरंत:- (.६१,१०). तरंत व पुरुमीळह हे विददश्वि पुत्र होते. हे पुरुवंशज असावेत. तरंत हा श्यावाश्वाचा आश्रयदाता होता. व श्यावाश्वानें त्रसदस्यूकरितां इंद्राची स्तुति केल्याचा (.३६,७) उल्लेख आहे. तरंताचा उल्लेख असलेलें सूक्त (.६१) उत्तर.

तरुक्ष:- (.४६,३२). वश-अश्व्य याचा आश्रयदाता. वश-अश्व्य हा तरक्षापासून धन मिळाल्याचें वर्णितो. अश्व्य पहा.

त र्य:- क्रिवीसह उल्लेख. क्रिवि पहा. प्रत्यक्ष संबंध नाही.

तान्व:- (१०.९३,१५). पृथूंच्या राजाबरोबर तान्वाचा उल्लेख. अनुक्रमणीत याला पृथुपुत्र म्हटलें आहे. पृथुपर्शवांचा दाशराज्ञ युध्दाशी संबंध असल्यामुळें तान्वांचा उल्लेख असणारी सूक्तें (.३१; १०.९३) उत्तरकालीन.

ति रिं दि र:- (.६,४६). याद्व व पर्शु यांच्यासह उल्लेख. सूक्तद्रष्टा वत्स म्हणतो, 'पर्शु पुत्र (अथवा कुलोत्पन्न) तिरिंदिर यानें याद्वांचे धन मला दिलें सूक्त उत्तर.

तु ग्र:- (१०.४९,४). इंद्रानें कुत्साकरितां तुग्राला मारिलें कुत्सासह उल्लेख असल्यामुळें तुग्राचा उल्लेख असणारीं सूक्तें (.११६; ११७; ६.२०; २६; १०.४९) उत्तरकालीन. कुत्ससंबंध पहा.

तु र्व श:- यदूंसह उल्लेख. सुदासशत्रु. तुर्वशाचा उल्लेख असणारीं सूक्तें (.३६; ४७; ५४; १०८; १७४; .३०; .२०,२७; ४५; .१८; १९; ८.४; ७; .१०; ९.६१; १०.४९) उत्तरकालीन.

तु र्वी ति:- (.५४,६). यदुतुर्वशांबरोबर उल्लेख असल्यामुळें उत्तरकालीन. याचा आणखी उल्लेख असणारी सूक्ते (.३६; ६१; ११२; २.१३; ४.१९) उत्तरकालीन. हा तुर्वशांचा राजा असावा (लुड्विग).

तू तु जि:- (.२०,८) इंद्रानें द्योतननामक राजाकरितां तुग्र, तूतुजि, वतेसु, दशोणि यांचा पराभव केला. तुग्रसहोल्लिखित असल्यामुळें तूतुजि याचा उल्लेख असणारें सूक्त उत्तरकालीन. मॅकडोनलच्या मतानें तुजि आणि तुतूजि ही एकच व्यक्ति, तेव्हां तुजीचा उल्लेख असलेलीं सूक्तें (.२६; १०.४९) उत्तरकालीन.

तू र्व या ण:- (१.५३,१०). अतिथिग्व, आयु व कुत्स यांचा शत्रु तूर्वयाण हा पक्थांचा राजा होता. याचा उल्लेख असलेलें सूक्त उत्तरकालीन.

तृ क्षि:- (८.२२,७). त्रसदस्युपुत्र याचा उल्लेख असणारी सूक्तें (८.२२; ६.४६) उत्तरकालीन.

तृ ण स्कं द:- (.१७२,३). सर्वानुक्रमणीप्रमाणें अगस्त्याच्या सूक्तांत उल्लेख. सायणमताप्रमाणें अगस्तीचेंच विशेषण्. प्रत्यक्ष संबंध नाही.

तृ त्सु:- सुदासाचे साहाय्यकर्ते व वसिष्ठाचे अनुयायी. तृत्सूंचा उल्लेख करणारीं सूक्तें (.१८; ३३; ८३) उत्तरकालीन.

त्र स द स्यु:- (७.१९,३). पुरुकुत्सवंशज व पुरुंचा राजा असावा. याला पूरु म्हटलें आहे. याचा उल्लेख असणारी सूक्तें (.११२;.३८; ४२; .२७; ३३; .१९; .८; १९; ३६; ४९; १०.१५०). उत्तरकालीन, शिवाय त्रसदस्यु द्रष्टा असलेलें (.११०) हे सूक्त उत्तरकालीन.

त्रा स द स्य व:- त्रसदस्युवंशज. तृक्षि व कुरुश्रवण यांचे हें नांव आहे. याचा उल्लेख (.१९; २२; १०.३३) या ठिकाणी येतो. ही सूक्तें उत्तरकालीन.

त्रि त-आ प्त्य:- यांचा उल्लेख अनेक स्थळी आहे. अनुक्रमणीप्रमाणें त्रित हा (१०.४) या सूक्ताचा द्रष्टा असून 'मरुदेशांतील पाणपोईप्रमाणें तूं पुरुंनां धनानें तोषविणरा आहेस' असें अग्नीला म्हणतो.

त्रि शो क:- हा द्रष्टा असलेल्या सूक्तांत (.४५,३०) यदुतुर्वशांचा उल्लेख करतो. त्रिशोक काण्व होता. व कण्व यदूंचे पुरोहित होते. याचा उल्लेख (.११२; १०.२९).

त्रै त न:- (.१५८,). तौग्रय, दीर्घतमस् यांचा उल्लेख असलेल्या सूक्तांत उल्लेख. हा दीर्घतमस्चा दास व कदाचित त्रितांचा संबंधी असावा.

त्रै वृ ष्ण:- (.२७,१), त्रसदस्यूचें नांव.

त्र्य रु ण:- (.२७,१), त्रसदस्यूचें नांव.

दध्यड्:- (.११६,१२). अथवा दघ्यनिच्. हा आथर्वण होता. वरील उत्तरकालीन सूक्तांत उल्लेख. याचा आणखी उल्लेख (.८,३९; .१६; .१०८) या सूक्तांत आहे. प्रत्यक्ष संबंध नाही.

द भी ति:- याचा तुर्वशांसह अनेक स्थळी उल्लेख येतो. दभीति व तुर्वीति संबंध. चुमुरि पहा. याचा उल्लेख करणारी पुढील सूक्ते (१.११२; २.१३; १५; .३०; ४१; .२०; २६; .१९; १०.११३) उत्तरकालीन.

द श ग्व:- (५.२९,१२). हे आंगिरस होते. यांचा कुत्स, एतश, उशना या व्यक्तीचा उल्लेख असलेल्या सूक्तांत उल्लेख आहे. दशग्वांचा आणखी उल्लेख असलेली सूक्ते (.६२; २.३४; .३९; ४.५१; .२९; .१; १२). प्रत्यक्ष संबंध नाही.

द श द्यु:- (.३३,१४). याचा या ठिकाणी 'तुग्रासह युद्ध करणा-या दशद्युचें व तुग्राचें इंद्रानें रक्षण केले' असा उल्लेख आहे. आणखी उल्लेख (.२) या सूक्तांत आहे. तुग्रसमकालीन असावा.

द श व्र ज:- (.४९,१०). पक्थ, त्रसदस्यू यांच्यासह कण्व, त्रसदस्यु, पक्थ, यांचे अश्वीनी रक्षण केलें असा उल्लेख याचा उल्लेख करणारें सूक्त (८.५०) उत्तर.

दधोणि:- (.२०,८). तूतुजि, तुग्रसहोल्लिखित. तुग्र अथवा तूतुजि पहा. दशोणीचा आणखी उल्लेख असलेली सूक्तें (.५२; १०.९६) उत्तरकालीन.

द स्य वे वृ क:- (.५६,२). दस्यूंचा पराभव करणारा एक राजा, व पृषध्राचा आश्रयदाता. मॅक्डोनलमतानें पूतक्रतूचा मुलगा. याच्या बायकोचें नांव पूतक्रता. याचा आणखी उल्लेख असलेली सूक्तें (.५१; ५५) उत्तर.

दा र्भ्य:- दर्भाचा मुलगा. दर्भाचा उल्लेख ॠग्वेदांत नाही. याचेंच दुसरें नांव रथवीति. अनुक्रमणी व बृहदेवतेप्रमाणे रथवीति यानें अर्चनानस् पुत्र श्यावाश्वाला आपली मुलगी दिली होती (५.६१,१७), श्यावाश्वसंबंधाकरितां तरंत पहा.

दि वो दा स:- सुदासपिता, अतिथिग्वपुत्र अथवा अतिथिग्वाचेंच नांव. याचा उल्लेख असलेली सर्व सूक्तें (.११२; ११६; ११९; १३०; .१९; .२६; ३०; .१६; २६; ३१; ४३; ४७; ६१; .१८; .६१) उत्तरकालीन.

दी र्घ त म स्:- कक्षीवान्पिता. कक्षीवान् पहा. दीर्घतमस्चा आणखी उल्लेख असलेली सूक्तें (.१५८; .९) ही उत्तरकालीन.

दी र्घ श्र व स्:- (.११२,११). कक्षीवानासह उत्तरकालीन सूक्तांत उल्लेख. प्रत्यक्ष संबंध नाही.

दु र्ग ह:- (.४२,८). पुरुकुत्सपूर्वज. सायणमताप्रमाणें पुरुकुत्साचा पिता. दुर्गहाचा (.६५) मध्यें आणखी उल्लेख आहे. सदर सूक्त उत्तरकालीन.

दु र्मि त्र:- (१०.१०५,११). याला कुत्सपुत्र म्हटलें आहे. दुर्मित्राचा उल्लेख असलेलें सूक्त उत्तरकालीन. कुत्स पहा.

दु: शा सु:- (१०.३३,१). कुरुश्रवणाचा शत्रु. लुडविगमतानें पर्शु असावा. कुरुश्रवणाचा पुरोहित कवष याचा उल्लेख करतो. सूक्त उत्तर.

दु: शी म:- याचा पृथवान, वेन, यांच्या सह व तान्वाचा उल्लेख असलेल्या (१०.९३,१४) सूक्तांत उल्लेख आहे. 'दु:शीम, राम, पृथवान, वेन, यांच्या पुढें मी स्तोत्र पठण केले' असें सूक्तद्रष्टा तान्व म्हणतो. तान्व पहा. सूक्त उत्तरकालीन.

दृ भी क:- (२.१४,३). कुत्स, अतिथिग्व, आयु वगैरेंचा उल्लेख असलेल्या उत्तरकालीन सूक्तांत उल्लेख. प्रत्यक्ष संबंध नाही.

दे व क-मा न्य मा न:- (७.१८,२०). तृत्सूंचा शत्रु व शंबर मित्र. लुडविगमतानें कदाचित् शंबराचेंच नांव असावे.

दे व व त:- सुदास पितामह, याचा उल्लेख (.१८, २२;.३१,१५) असलेली सूक्तें उत्तरकालीन.

दे व वा त:- (.२३,२). हा भारत (भरतकुलांतील) होता. विश्वामित्र व सुदास यांच्या कुलास भरत म्हटलें आहे. देववात कदाचित् विश्वामित्रसमकालीन असावा.

दे व श्र व स्:- हाहि भरतमुलांतील होता. देववाताबरोबर (.२३) उल्लेख. देववात पहा.

देवापि:- (१०.९८,६). ॠष्टिषेणाचा पुत्र व शंतनूचा पुरोहित. शंतनु भरतकुलांतील होता. शंतनूचा उल्लेख या सूक्तामध्यें असल्यामुळें सुक्त उत्तरकालीन. शंतनु व देवापि हे सुदासोत्तर कालांतील असावे.

दै व वा त:- देववाताचा मुलगा. अथवा सृंजयाचें दुसरें नांव देववाताचा वंशज. दैववाताकरितां इंद्रानें वृचीवंताचा राजा तुर्वश याचा पराभव केला (.२७,७). दैववाताचा उल्लेख असणारीं सूक्ते (.२३; .१५; .२७) उत्तरकालीन. सायण व झिमर यांच्या मताप्रमाणें दैववात हें अभ्यासर्तीचेंच नांव असावें.

दै वो दा सि:- (.१०३,२). दिवोदासवंशज अथवा सुदासाचें नांव. सूक्त उत्तरकालीन.

द्यो त न:- (.२०,८). तुग्र, तूतुजि, यांचा विरोधी. तूतुजि पहा.

द्रु ह्यु:- दाशराज्ञ युध्दांतील सुदासशत्रु. द्रुह्यूचा उल्लेख असलेली सूक्ते (.१०; ६.४६; ७.१८; ८.१०) उत्तर.

धु नि:- चुमुरीबरोबर उल्लेख, चुमुरि पहा.

ध्व न्य:- त्रसदस्यु, ध्वन्य व मारुताश्व हे संवरणाचे आश्रयदाते होते (.३३,).

ध्व सं ति:- इंद्रशत्रु. (.११२) या उत्तरकालीन सूक्तांत उल्लेख. याच्या बरोबर पुरुषंतीचा उल्लेख असून ते दोघे (सर्वानुक्रमणीप्रमाणें) कश्यप कुलांतील अवत्सार याचे आश्रयदाते होते. सूक्तद्रष्टा अवत्सार हा ध्वसंति व पुरुषंति यांच्यापासून धन मिळाल्याचा उल्लेख करितो (.५८,३).

ध्व स्त्र:- (९.५८,३). याचा (.११२) या उत्तरकालीन सूक्तांत उल्लिखित असलेल्या पुरुषंतीबरोबर उल्लेख असल्यामुळें हें सूक्त उत्तरकालीन. मॅकडोनलमतानें ध्वसंति व ध्वस्त्र ही एकच व्यक्ति असावी. ध्वसंति पहा.

न भा क:- (.४०,४). या नाभाकाच्या सूक्तांत उल्लेख. हा कण्वकुलांतील होता. याच्या वंशांतील अथवा याचाच मुलगा असलेला नाभाक ज्या सूक्ताचा द्रष्टा आहे अशा सूक्तांत आयूचा उल्लेख (८.३९,१०) आहे. तूं आयूला धन देतोस, असें नाभाक अग्नीला म्हणतो. नाभाक आयूचा समकालीन असावा. आयूचा संबंध पूर्वी दृष्ट आहेच.

ना भा क:- नभाक पहा (.४१) या सूक्ताचा द्रष्टा.

न मी-सा प्य:- (६.२०,६). कुत्स, तूतुजि, तुग्र यांचा उल्लेख असलेल्या सूक्तांत उल्लेख. नमीचा आणखी उल्लेख (१०.४८) या सूक्तांत आहे. प्रत्यक्ष संबंध नाही.

न मु चि:- (.५३,७). इंद्रशत्रु. अतिथिग्व, यदु, तुर्वश, यांचा उल्लेख असणा-या सूक्तांत उल्लेख. नमुचीचा उल्लेख असलेली सूक्ते (.१४; .२०; .१९; ८.१४; १०.७३) उत्तर कालीन. प्रत्यक्ष संबंध नाही. मॅकडोनल म्हणतो 'नमीसाठी इंद्रानें नमुचीला मारिलें' (१.५३,७).

न र्य:- (१.५४,६). तुर्वशसहोल्लिखित. इंद्रानें नर्य, यदु, तुर्वश यांचे रक्षण केलें. याचा आणखी उल्लेख (.११२) या उत्तरकालीन सूक्तांत आहे.

न व ग्व:- हे आंगिरस होते. यांचा दशग्वांशीं संबंध फार येतो. दशग्व पहा. नवग्वांचा उल्लेख (.३३; ६२; .३९; .५१; .२९; ४५; .६; २२; .१०८; १०.१४; ६१; ६२; ८५; १०८) या सूक्तांतून आहे. प्रत्यक्ष संबंध नाही.

न व वा स्त्व:- (.३६,१८) यदु, तुर्वश यांच्याबरोबर उल्लेख. तुर्वीति, नववास्त्व व बृहद्रथ यांनां अग्नि मजकडे आणो, असें सूक्तद्रष्टा कण्व म्हणतो. याचा आणखी उल्लेख असलेली सूक्तें (.२०; १०.४९) उत्तर.

न हु ष:- (१०.६३,१). याला ययातीचा पिता असें म्हटलें आहे. लुडविंगमतानें नहुष म्हणजे लोक असून ते यदुतुर्वशांचे विरोधी असावे (१०.४९,८). मशर्शार हा नहुषांचा राजा होता. (.१२२; .१२; .२२; २६; ४६; .६; ९५; .६; ८; ४६; १०.४९; ८०; ९९) ही सूक्तें नहुषोल्लेखामुळें उत्तरकालीन.

ना भा ने दि ष्ठ:- (१०.६१,१८). पक्थ, तूर्वयाण यांच्या उल्लेखामुळें हें सूक्त उत्तरकालीन ठरलें आहे. वरील सूक्ताचा हा द्रष्टा असल्यामुळें वरील व्यक्तीच्या उत्तरकालीन ठरतो.

ना र्म र:- (.१३,८), तुर्वीति, वय्य, दभीति यांच्या उल्लेखामुळें हें सूक्त उत्तरकालीन ठरलें आहे. प्रत्यक्ष संबंध नाही.

ना र्य:- कुत्याचा उल्लेख असलेल्या (.२४, २९) या सूक्तांत उल्लेख. सूक्तद्रष्टा वैयश्व याचा आश्रयदाता अर्थव पहा.

ना र्ष द:- कण्वाचें नांव. कण्वाला नृषदपुत्र असें म्हटलें आहे (१०.३१,११). नार्षद-कण्व याचा उल्लेख (१.११७) या उत्तरकालीन सूक्तांत आहे. कण्वसंबंध पहा.

निं दि ता श्व:- कुत्स, एतश, याद्व परमज्या इत्यादिकांच्या उल्लेखामुळें उत्तरकालीन ठरलेल्या (.१,३०) या सूक्तांत उल्लेख. मेण्यातिथीचा आश्रयदाता. या मेण्यातिथीचा आसंग हाहि आश्रयदाता होता. (आसंग पहा.) प्रपथिन् , परमज्या हे यदुवंशज असावेत. यांच्याबरोबर याद्वांचा उल्लेख येतो.

नी पा ति थि:- पक्थ व त्रसदस्यु यांचा उल्लेख असलेल्या (.४९,९) या उत्तरकालीन सूक्तांत उल्लेख. सूक्तद्रष्टा प्रस्कण्व म्हणतो 'इद्रा, तूं त्रसदस्यु, पक्थ व नीपातिथि यांना धन देता झालास तसा मला धन दे.' (८.५१) याहि सूक्तांत याच्या बरोबर पुष्टिगु, श्रष्टिगु, प्रस्कण्व इत्यादिकांचा उल्लेख येतो. यावरुन पुष्टिगु श्रुष्टिगु नीपातिथि, त्रसदस्यु व पक्थ हे समकालीन असावे.

नृ मे ध:- (१०.८०,३). जरुथासह उल्लेख. अग्नीनें जरुथास मारिलें व नृमेधास संतति प्राप्त करुन दिली. कदाचित् जरुथ व नृमेध समकालीन असावे. जरुथ पहा.

नृ ष द:- (१०.३१,११). नार्षद-कण्व याचा पिता. नार्षद पहा.

नो ध स्-नो धा:- (.१२४,४). कक्षीवानाबरोबर उल्लेख आहे. याचा गोतमाशी निकट संबंध येतो. याला सर्वानुक्रमणी गोतमाचा पुत्र अथवा वंशज म्हणते. हा द्रष्टा असलेली सूक्ते (.५;४) ही उत्तरकालीन. हा द्रष्टा असलेल्या एका सूक्तांत तो सुदासाचा 'इंद्रानें अंहू नामक असुराचें धन सुदासाला दिले' असा उल्लेख करतो (.६३,७). यावरुन हा सुदासोत्तरकालीन असल्याचें ठरतें.

प क्थ:- तूर्वयाणाची प्रजा व सुदासाचे शत्रू. यांचा उल्लेख असलेली (.१८; .२२) सूक्तें उत्तरकालीन. यांच्या बरोबर भलानस, विषाणिन्, शिवास:, यांचा उल्लेख येतो. हेहि सुदासशत्रू असावे.

प ज्र:- हें आंगिरसाचें कुलनाम आहे. कक्षीवानाला (.११६; १७; १२०; १२२) या सूक्तांत 'पज्रिय' म्हटलें आहे. पज्रांचा बहुवचनीं उल्लेख (.११७) या सूक्तांत आहे. कक्षीवान् पहा.

प ठ र्वा:- याचा (१.११२) या उत्तरकालीन सूक्तांत उल्लेख आहे. प्रत्यक्ष संबंध नाही.

प ड् गृ भि:- (१०.४९,५). इंद्रानें श्रुतर्वनकरितां पड्गृभीचा पराभव केला असा या सूक्तांत उल्लेख आहे. या सूक्तांत आयु व कुत्स यांचा उल्लेख असल्यामुळें सूक्त उत्तरकालीन.

प णि:- (.५१,३). सूक्तद्रष्टा वामदेव म्हणतो, 'अत्यंत गूढ अशा अंधारांत पणि जाऊन पडोत:' पणि हे इंद्रशत्रु असून त्यांनी लपवून ठेविलेल्या गाई अथवा उदके सोडविण्यासाठी आंगिरसांनी इंद्राची प्रार्थना केली आहे. सायण यास्काला अनुसरुन कोठें कोठें पणीचा वणिक् (वाणिज्य करणारे) असा अर्थ करतात. पणींचा ॠग्वेदांत अनेक स्थळीं उल्लेख आहे.

प र म ज्या:- आयु, कुत्स, याद्व इत्यादिकांचा उल्लेख असलेल्या (.१) या सूक्तांत उल्लेख. लुडविगमतानें हा कदाचित् यदुवंशापैकीं मोठा मनुष्य असावा निंदिताश्व पहा.

प रा वृ ज:- (.१३,१२). सायणमतानें एक ॠषि. हा पाण्यांत बुडाला असतां अश्वीनी याला वर काढिलें. प्रत्यक्ष संबंध नाही.

प रा श र:- सुदासपुरोहित वसिष्ठ याचा मुलगा. (.१८) या उत्तरकालीन सूक्तांत उल्लेख. (७.१०४) याहि सूक्तांत अत्रीबरोबर उल्लेख.

प र्ण य:- (१०.४८,८). इंद्रानें अतिथिग्वाकरितां पर्णयाचा वध केला. पर्णयाचा आणखी उल्लेख (.५३) येथें आहे. अतिथिग्वोल्लेखामुळें सूक्त उत्तरकालीन.

प र्शु:- पृथु, पर्शु, हे भरतांचे साहाय्यकारी. (.८३,१), या सुक्तांत सुदासासह उल्लेख.

पा क स्था म न्:- कौरयाण पहा.

पा यु:- (.४०-२४). हा भरद्वाजकुलांतील होता. याचा आश्रयदाता अश्वथ (दिवोदास) हा होता. अश्वथ पहा, सर्वानुक्रमणीप्रमाणें पायु द्रष्टा असलेलें (.७५) सूक्त उत्तरकालीन. अनुक्रमणीत याला भरद्वाजपुत्र म्हटलें आहे.

पा रा व त:- सायणमतानें पलीकडील (दुरचे) लोक, सरस्वती नदीला 'पारावतघ्नी' असें म्हटलें आहे (.६१). कदाचित् हे लोक सरस्वती नदीच्या कांठचे असावे. यांचा उल्लेख (५.५२; .३४; १००) या सूक्तांत आहे. प्रत्यक्ष संबंध नाही.

पा र्थ व:- अभ्यावर्तिन् पहा.

पा र्थ्य:- तान्व पहा.

पा र्ष द्वा ण:- प्रस्कण्वाचा आश्रयदाता. पुष्टिगूच्या (८.५१) या सूक्तांत उल्लेख. प्रस्कण्व, पुष्टिगु पहा.

पा श द्यु म्र-वा य त:- (.३३,२). याच्या यज्ञास इंद्र गेला असतां वसिष्ठानें त्याला सुदासाच्या यज्ञामध्यें आणिलें. सूक्त उत्तरकालीन.

पि ठी न स:- दभीति, चुमुरि यांचा उल्लेख असलेल्या सूक्तांत (.२६,६) उल्लेख. इंद्रानें पिठीनस नामक राजाला रजिनामक स्त्री दिली. प्रत्यक्ष संबंध नाही.

पि प्रु:- वैदथिन्-ॠजिश्व्याकरितां इंद्रानें पिप्रूला मारिलें ॠजिश्वन् पहा. पिप्रूचा उल्लेख असलेली सूक्तें (.५१; १०१; १०३; .१४; .१६; .२९; .१८; २०; .३२; १०.९९; ) उत्तरकालीन. पिप्रूचा शंबरासह उल्लेख येतो. शुष्ण, पिप्रु व कुयव यांचा वध करतेवेळी इंद्राने शंबराचीं नगरें विध्वंसिलीं.

पु र य:- (.६३;९). भरद्वाजाचा आश्रयदाता. या सूक्ताचा द्रष्टा भरद्वाज याला पुरय घोडे देतो. भरद्वाजाबरोबर दिवोदासाचा उल्लेख (.१६,५) आहे. दिवोदासाचा भरद्वाज पुरोहित होता.

पु रु कु त्स:- हा पुरुवंशांतील असावा. याचा सुदासासह उल्लेख आहे (.६३,७). हा त्रसदस्यूचा मुलगा होता. त्रसदस्यु पहा पुरुकुत्साचा आणखी उल्लेख असलेली सूक्तें (.११२; १७४;६.२०) उत्तर.

पु रु कु त्सा नी:- पुरुकुत्सस्त्री. पुरुकुत्स पहा. पुरुकुत्सानीचा उल्लेख असलेलें सूक्त (.४२,९) उत्तर.

पु रु णी थ:- (.५९,७) शतवनीपुत्र व भरद्वाजांचा आश्रयदाता. (.५९,७) भरद्वाज सुदासपुरोहित होता.

पु रु पं था:- (.६३,१०). भरद्वाजाचा आश्रयदाता पुरुपंथा भरद्वाजाला धन देत होता. भरद्वाज सुदासपुरोहित होते.

पु रु मा य:- (.६३,०). इंद्रोत, आतिथिग्व इत्यादिकांचा उल्लेख असलेल्या (.६८,१०) सूक्तांत उल्लेख आहे. कदाचित् हा त्यांचा संबंधी व पुरुवंशज असावा.

पु रु मि त्र:- (१.११७). याचा या उत्तरकालीन सूक्तांत उल्लेख आहे. हा विमदपत्नी 'कमद्यू' हिचा पिता. याचा आणखी उल्लेख (१०.३९) या सूक्तांत आहे. हा कदाचित पुरुवंशज असावा.

पु रु मी ळ्ह:- तरंत, दार्भ्य यांचा उल्लेख असलेल्या सूक्तांत (.६१,९) उल्लेख. दार्भ्य पहा. पुरुमीळहाचा आणखी उल्लेख असलेली सूक्ते (.१५१; १८३; ८.७१) उत्तरकालीन. हा पुरुकुलांतील असावा.

पु रु षं ति:- ध्वसंतीसह उल्लेख. ध्वसंति पहा.

पु रु र व स्:- हा पुरुवंशांतील असावा. याचा उल्लेख (.३१; १०.९५) या सूक्तांत आहे. 'अग्नीनें पुरुरव्यावर अनुग्रह केला' असें सूक्तद्रष्टा हिरण्यस्तूप म्हणतो. उर्वशीपुरुरवासंवाद प्रसिद्ध आहे.

पु ष्टि गु:- याचा (८.५१) नीपातिथि, मेघ्यातिथि, यांच्यासह उल्लेख. नीपातिथि पहा.

पू त क्र ता:- (.६८; १७) अतिथिग्व, इंद्रोत, आश्वमेघ, पूतक्रता ही सर्व एकाच व्यक्तींची नांवे असावीं. किंवा ते सर्व समकालीन असावे.

पू रु:- हें कुलनाम असून दिवोदास व सुदास हे याच कुलांतील होत. सुदासास (.६३,७) व दिवोदासास (.१३०,७) 'पूरवे' म्हटलें आहे. यांचा उल्लेख असलेली सूक्तें (.५९; १३१; १७४; .२१; ३८; .२०; .५; १९; ९६; .६४) उत्तर.

पृ क्ष या म न्:- (१.१२२,७). हा पज्र कुलांतील असावा अथवा सायणमताप्रमाणें कक्षीवानाचेंच नांव. श्रुतरथ व प्रियरथ हे कक्षीवानाचे आश्रयदाते होते. कक्षीवानसंबंध पहा. सूक्त उत्तरकालीन.

पृ थ वा न:- (१०.९३,१४). दु:शीम याच्या बरोबर उल्लेख. तान्व व दु:शीम पहा.

पृ थु:- (.८३,१). एका जातीचे लोक, पर्शूशी संबंध. पर्शु पहा.

पृ थु श्र व स:- कानीताचें दुसरें नांव. कानीत पहा. दिवोदासाच्या उल्लेखामुळें उत्तरकालीन ठरलेल्या (१.११६) या व (.४६) या सूक्तांत उल्लेख.

पृ दा कु सा नु:- (.१७,१५). अत्रिकुलांतील इरिंबिट नामक सूक्तकाराच्या सूक्तांत उल्लेख. लुडविंगच्या मतें हा एका यज्ञसांप्रदायाचा प्रवर्तक होता. याचा दाशराज्ञयुध्दांतील व्यक्तीशी प्रत्यक्ष संबंध येत नाही.

पृश्निगु:- पुरुकुत्स याच्यासह (.११२) या उत्तरकालीन सूक्तांत उल्लेख. प्रत्यक्ष संबंध नाही.

पृ ष ध्र:- (८.५२,२). आयु, दशोणि यांच्यासह उल्लेख. सूक्तद्रष्टा आयु म्हणतो 'इंद्रा तूं दशोणीसह सोमपानानें मदयुक्त झालास तसा पृषध्रासह हो.' पृषध्र दशोणीसमकालीन असावा. दशोणि पहा.

पे दु:- याचा (.११६;११७) या उत्तरकालीन सूक्तांत उल्लेख असून (१.११८; ११९; १०.३९) या सूक्तांत उल्लेख आहे. अश्वीदेवांनी पेदूला घोडा दिल्याबद्ल कक्षीवान् उल्लेख करतो. कदाचित् पेदु कक्षीवान्समकालीन असावा.

पे रु क:- (.६३,९). पुरय व पुरुपंथा यांच्यासह उल्लेख. भरद्वाजाचा आश्रयदाता. भरद्वाज पेरुकापासून धन मिळाल्याचें उल्लेखितो.

पै ज व न:- सुदासाचें पैतृक नांव. याचा (.१८) या सूक्तांत उल्लेख आहे.

पौ त क्र त:- पूतक्रतपुत्र. पृषध्र द्रष्टा असलेल्या (.५६) सूक्तांत उल्लेख. पृषध्राचा आश्रयदाता. पृषध्रसंबंध पहा.

पौ र:- (.३,१२).पुरुवंशज. आयु व रुशम, यांच्यासह उल्लेख. मेघ्यातिथि म्हणतो, 'ज्या रक्षणसामर्थ्यानें रुम, रुशम व पौर यांचे रक्षण केलेंस त्या सामर्थ्यानें माझे रक्षण कर.'

पौ रु कु त्स्य:- पुरुकुत्साचा वंशज अथवा पुत्र. पुरुकुत्स पहा. पौरुकुत्सि हें याचेंच नांव. याचा (.३३; .१९; .१९) या ठिकाणी उल्लेख आहे. सूक्तें उत्तरकालीन.

प्रतृद:- हें तृत्सूंचेंच दुसरें नांव आहे. यांचा वसिष्ठ पुरोहित होता (.३३). सूक्त उत्तर.

प्र प थि न्:- निंदिताश्व पहा.

प्रमगंद:- (.५३,१४). कीकटांचा राजा. सुदासशत्रु. सूक्त उत्तर.

प्र स्क ण्व:- कण्वकुलांतील होते. प्रस्कण्व व कण्व यांचा यदुतुर्वशांशी बराच संबंध येतो. प्रस्कण्व व कण्व हे यदुतुर्वशांचे पुरोहित असावे. प्रस्कण्वाचा उल्लेख असलेलीं (.४४; ४५; .३; ५१; ५४). सूक्तें व प्रस्कण्व ज्या सूक्तांचा द्रष्टा आहे अशी सूक्तें (.४४; ५०; व ९.९५) उत्तरकालीन. सर्वानुक्रमणी याला 'कण्वपुत्र' म्हणते.

प्रस्तोक:- सृंजय व प्रस्तोक हीं दिवोदासाचींच नांवे आहेत. याला सृंजयपुत्र असें हि म्हटलें आहे (.४७, २२).

प्रा त र्द नि:- प्रतर्दनपुत्र. क्षत्रश्रीचें दुसरें नांव. क्षत्रश्री पहा.

प्रि य मे ध:- हा कण्व कुलांतील होता. याचा अत्रीबरोबर उल्लेख येतो. अत्रीचा संबंध पहा. प्रियमेध हें कुलनाम असावें. कारण ब-याच ठिकाणीं 'प्रियमेधास:' असें रुप आढळतें. प्रियमेध द्रष्टा असलेल्या सूक्तांत (.६८; ६९) अतिथिग्व व इंद्रोत यांचा उल्लेख येतो. हे प्रियमेधाचे आश्रयदाते होते. प्रियमेधाचा उल्लेख असलेलीं सूक्तें (.४५; १३९; .२; ३; ४; ५; ६; ८; ६९; १०.७३) व प्रियमेध द्रष्टा असलेली सूक्तें (.६८; ८७; .२८) उत्तर.

प्रि य र थ:- ग्रिफिथमतानें कक्षीवानाचा आश्रयदाता. कक्षीवान् कण्वकुलांतील होता. कक्षीवान् पहा. प्रियरथाचा उल्लेख असलेलें सूक्त (.१२२) उत्तरकालीन आहे. सायण प्रियरथ व श्रुतरथ हीं कक्षीवानाचीं विशेषणें समजतात.

ब भ्रु:- रुम रुशम यांचा राजा ॠणंचय हा बभ्रूचा आश्रयदाता होता. ॠणंचय पहा. बभ्रूचा उल्लेख असलेलीं सूक्तें (२.३३; ५.३०; .४४; .२२; २९; .९८) उत्तरकालीन.

ब ल्बू थ:- (.४६,३२). अश्वपुत्र वश याचा आश्रयदाता. या वशाचा कानीत नामक आश्रयदाता असून त्यांचा (.११६) या उत्तरकालीन सूक्तांत उल्लेख येतो. बल्बूथाचा उल्लेख असलेलें सूक्त उत्तरकालीन. अश्व्य पहा.

बा हु वृ क्त:- किवि, तर्य यांसह उल्लेख. तर्य पहा. प्रत्यक्ष संबंध नाहीं.

बृ बु:- पणीचा राजा अथवा पणीचा सुतार. व भरद्वाजाचा आश्रयदाता. (.४५). या सूक्तांत बृबूचा उल्लेख आहे. भरद्वाज भरतांचा पुरोहित होता.

बृ स य:- याला सरस्वती नदीच्या कांठी इंद्रानें मारिलें. याच नदीवर वध्ऱ्यश्वाला दिवोदास मिळाला. याचा दिवोदासाचा उल्लेख असलेल्या सूक्तांत उल्लेख (.६१,३) असून दुस-या एका सूक्तांत बृसयाला त्वष्टा-वृत्रपिता म्हटलें आहे (.९३,४). प्रत्यक्ष संबंध नाही.

बृ ह दु क्थ:- (१०.५४;६) या सूक्तांत याचा उल्लेख आहे. याला सर्वानुक्रमणीत वामदेवाचा पुत्र अथवा गोत्रज म्हटलें आहे. वामदेव हा मंडल चा द्रष्टा असून त्याचा कुत्स, पिप्रु्र, ॠजिश्वन् यांचा उल्लेख (.१६,१८) असलेल्या सूक्तांत उल्लेख येतो. वामदेवाच्या ४ थ्या मंडलांत अतिथिग्व, दिवोदास, त्रसदस्यु, यदु, तुर्वश, इत्यादिकांचा उल्लेख असल्यामुळें वामदेव वरील व्यक्तींच्या नंतरचा अथवा समकालीन तरी असावा. बृहदुक्थाचा उल्लेख असलेली सूक्तें उत्तर.

बृ ह द्र थ:- (.३६,१८). यदु, तुर्वश यांच्यासह उल्लेख. नववास्त्व पहा. बृहद्रथाचा आणखी उल्लेख (१०.४९).

भ जे र थ:- (१०.६०,२) मध्यें अगस्त्य, असमाति, इक्ष्वाकु यांच्यासह उल्लेख. सायणमताप्रमाणें असमातीचा शत्रु अथवा पूर्वज (१०.६०,५). सूक्तद्रष्टा बंधु आपणास अगस्त्य याचा दौहित्र म्हणवितो. व धनप्राप्तीसाठीं असमातीला बोलावितो. असमाति हा अगस्त्याचा व बंधु वगैरेंचा आश्रयदाता होता. अगस्त्य पहा.

भ य मा न:- कक्षीवानाच्या (.१००) सूक्तांत अंबरीष, सहदेव सुराधस् यांच्यासह उल्लेख. ॠज्राश्व, वार्षागिर पहा.

भ र त:- हें सुदास, दिवोदास, तृत्सु, व विश्वामित्राचें वंशज त्यांचे कुलनाम होतें भरत नांवाची कोणी व्यक्ति होती, व त्या व्यक्तीच्या वंशजांना 'भारत' म्हणत असत सायणांनी काही ठिकाणीं 'भरत' याचा 'हवि अर्पण करणारा' असा अर्थ केलेला आढळतो. भरतांचा उल्लेख असलेली सूक्ते (.३६; .३३; ५३; .५४; .१६; .८;३३) उत्तरकालीन असावी.

भ र द्वा ज:- (.११६,१८). दिवोदासाचा पुरोहित. भरद्वाजाचा आणखी उल्लेख असलेली सूक्तें (.५९; ११२; .१०; १५; ६; ७; २३; ३१; ३५; ४८) उत्तरकालीन होत. सहाव्या मंडलाचा द्रष्ट्रा भरद्वाज असून त्या मंडलांतील खुद्द  त्याच्याच नांवावर असलेली (१५; ३१-३६; ४४; ५२) यांखेरीज सर्व सूक्तें उत्तरकालीन. भारद्वाज हें कुलनामहि असावें. कारण त्याचा बहुवचनीं उल्लेख (.२५; ४७; ५०) या सूक्तांतून येतो.

भ ला न स:- सुदासशत्रु. पक्थ पहा.

भा र द्वा ज:- (.५१,१२) भरद्वाजाचे वंशज.

भा र्व र:- सायणमताप्रमाणें इंद्रविशेषण. परंतु लुडविग म्हणतो की हें औशिजाचें नांव असावें (.२१,७). औशिजसंबंध पहा.

भा व्य-भा व य व्य:- कक्षीवानाचा आश्रयदाता. (.१२६) या उत्तरकालीन सूक्तांत उल्लेख. कक्षीवान् पहा.

भु ज्यु:- तुग्रपुत्र. तुग्राचा संबंध स्पष्ट आहे. तुग्र पहा. भुज्यूचा उल्लेख असलेलीं सूक्तें (.११२; ११६; ११७; ११९; .२७; .६२; .६८; ६९; .२२; ४६; १०.४०; ६५; ९५; १४३) उत्तरकालीन.

भू तां श:- (१०.१०६,११). सर्वानुक्रमणी याला कश्यपपुत्र म्हणते. प्रत्यक्ष संबंध नाही.

भृ ग वा ण:- कक्षीवान् द्रष्टा असलेल्या (.१२०) व (.७) या सूक्तांत उल्लेख असल्यामुळें ती उत्तरकालीन. कदाचित् कक्षीवानाचेंच हें नांव असावें. कारण तो आपणास (याच ठिकाणी) पज्रिय म्हणवितो. कक्षीवानाला कांही स्थली पज्रिय म्हटलें आहे. कक्षीवान् पहा.

भृगु:- (.३,९). भृगूचा या सूक्तांत प्रस्कण्वाबरोबर उल्लेख आहे. प्रस्कण्व पहा. भृगूचा आणखी उल्लेख (.६०) या सूक्तांत आहे. कदाचित् भृगु प्रस्कण्वकालीन असावे. भृगु हें कुलनाम हि होतें. भृगुंचा बहुवचनीं उल्लेख (३.२; ५; .३५) या ठिकाणीं येतो.

भे द:- इंद्रानें सुदासाकरितां भेदास मारिलें (.१८,१९). भेदाचा आणखी उल्लेख असलेलीं सुक्तें (.३३; ८३) उत्तर.

भो जा:- (.५३,७) 'भोज' नामक लोक. सुदासाचे अनुचर. सुदासानुचर भोज हे मला अश्वमेधामध्यें मदत करीत असें विश्वामित्र म्हणतो.

म त्स्या स:- (.१८,६). 'मत्स्य' नामक लोक. हे सुर्वशाचे शत्रु होते. तुर्वशानें मत्स्य लोकांनां आपल्या अनुशासनाखालीं आणिलें.

म न स्:- (.४४,६). एवावद, अवत्सार किवि यांच्यासह उल्लेख. प्रत्यक्ष संबंध नाहीं.

म न्धा तृ:- (.४०,१२). अनुक्रमणीप्रमाणें युवनाश्व पुत्र. सूक्तद्रष्टा नामाक म्हणतो, मंधाता, अंगिरस् व माझा पिता नभाक यांच्याप्रमाणें स्तुति करणा-या माझें इंद्राग्नीनी रक्षण केले. नभाक संबंध संशयित आहे. कक्षीवानाच्या (.११२,१३) सूक्तांत 'शेतामध्यें मंधात्याचें अश्वीदेवांनी रक्षण केल्याचा' उल्लेख आहे. यावरुन मंधाता कक्षीवानाचा पूर्वकालीन परंतु फार दूरचा नसावा.

म श र्शा र:- (.१२२,१५). लुडविगमताप्रमाणें नहुषांचा राजा व सुदासशत्रु. कक्षीवानाच्या सूक्तांत उल्लेख. कक्षीवान् म्हणतो 'आयूचे तीन मुलगे व मशर्शाराचे चार मुलगे मला त्रास  देतात.' कक्षीवान् पहा.

मा न:- अगस्त्याचें दुसरें नांव (.३३,१३). अगस्त्य पहा.

मा न्दा र्य:- मान्याचें दुसरें नांव. मान्दार्य-मान्य यांचा उल्लेख (.१६५) या ठिकाणी असून शिवाय (.१६६; १६७; १६८). या सूक्तांतून आहे. मान व अगस्त्स पहा.

मा म ते य:- दीर्घतमस्चें दुसरे नांव. दीर्घतमस् याच्या आईचें नांव ममता असें होते व सर्वानुक्रमणीप्रमाणें दीर्घतमस्च्या पित्याचें नांव 'उचथ्य' असें होतें. मामतेयाचा उल्लेख (.१४७; १५२; १५८) या सूक्तांमध्यें आहे.

मा यु-मा य व:- (१०.९३,१५). तान्व, पार्थ्य यांच्यासह उल्लेख. तान्व पहा.

मा रु ता श्व:- (.३३,१०). संवरणाचा आश्रयदाता. ध्वन्य पहा.

मि त्रा ति थि:- (१०.३३,७). उपमश्रवस्चा पिता. उपमश्रवस् पहा.

मु द्ग ल:- (१०.१०२,६). याच्या गाई शत्रूंनी नेल्या असतां यानें शत्रूंनां जिंकून त्या परत आणिल्या. प्रत्यक्ष संबंध नाही.

मुं द्ग ला नी:- (१०.१०२,). मुद्रलाची बायको. हिनें लढाईत मुद्रलाचें सारथ्य केलें. प्रत्यक्ष संबंध नाही.

मृ ग य:- (१०.४९,५). इंद्रानें आर्क्ष-श्रुतर्वणाकरितां मृगयाला मारिलें. श्रुतर्वण-आर्क्ष पहा.

मृ ळी क:- याला सर्वानुक्रमणी वसिष्ठपुत्र म्हणते (१०.१५०) या सूक्ताचा द्रष्टा. या सूक्तांतील सर्व ॠचांमध्यें याचा उल्लेख आहे. ५व्या ॠचेमध्यें तो 'अत्रि, भरद्वाज, गविष्ठिर, कण्व, त्रसदस्यु, यांच्यासह संग्रामांत आमचें रक्षण कर' अशी अग्नीची प्रार्थना करतो. तो वरील व्यक्तीचा समकालीन असावा.

मे ध:- (.५०,१०). याचा कण्व, दीर्घनीथ, गोशर्य, यांच्यासह उल्लेख. कण्वसमकालीन असावा.

मे ध्य:- पृषध्र, दशोणि, दशप्रिय, यांच्यासह उल्लेख (.५२,२). अनुक्रमणीप्रमाणें हा (.५३; ५४; ५७; ५) या सुक्तांचा द्रष्टा असून, (.५३,२) मध्यें कुत्स, आयु अतिथिग्व यांचा उल्लेख करतो. यावरुन तो वरील व्यक्तींच्या उत्तरकालांतील असावा.

मे धा ति थि:- मे ध्या ति थि:- अनुक्रमणीमध्यें याला काण्व-कण्व- पुत्र अथवा कण्वकुलोत्पन्न म्हणलें आहे. (.२,४०) मध्यें तो आपणास 'काण्वमेघ्यातिथि' म्हणवितो. तो आसंगाचा पुरोहित असावा. (.१,३०) मध्यें आसंगाजवळून धन मिळाल्याबद्ल तो आसंगाची स्तुति करतो. मेघातिथीचा (.३६;३७;८.१; २; ; ३३; ४९; ५१; ९.४३) या सूक्तांत उल्लेख आहे.

मे ना:- (.५१,१३). 'इंद्र वृषणश्व्याची मेना झाला' असा उल्लेख आहे. याशिवाय प्रत्यक्ष संबंध नाही.

य क्षु-य क्ष व:- सुदासशत्रु. अजस् पहा.

य ज त:- अवत्सार एवावद यांच्यासह (.२२) या सूक्तांत उल्लेख. प्रत्यक्ष संबंध नाही. अवत्सार, क्रिवि पहा.

य दु:- सुदासशत्रु. यदुतुर्वशांनां अतिथिग्वाच्या ताब्यांत देण्याबद्ल वसिष्ठ इंद्राची प्रार्थना करतो (.१९,८). इंद्रानें यदुतुर्वश व शंबर यांनां सुदासाच्या ताब्यांत दिलें (.६,२). यदुतुर्वश हे प्रथम सुदासाचे शत्रू असून नंतर मित्र झाले असावें. कारण शत्रूंनी दूर टाकिलेल्या यदुतुर्वशांनां जवळ आणिलें (.४५,१); यदु तुर्वशांनां अभिषेकार्ह केलें (.३०,१७); तरुन नेलें (.२०,१२); अशा त-हेचे उल्लेख आढळतात. यदूच्या वंशजांनां याद्व असें म्हटल्याचें आढळतें. यदूचा उल्लेख (.३६; ५४; १०८; १७२; १७४; .३०; .३१;.४५; .४; ७; ९; १०; ४५; .६१; १०.४९; ६२) असलेली सूक्तें उत्तरकालीन.

याद्व:- यदूंचें कुलनाम. याद्वांचा उल्लेख (.१९; ८.१;६) या सूक्तांतून येतो.

यु ध्या म धि:- (.१८,२४). सुदासशत्रु. इंद्रानें सुदासाकरितां युध्यामध्यीचा वध केला.

र जि:- (.२६,६). पिठीनसाची स्त्री. दभीति, चुमुरि यांच्यासह उल्लेख. इंद्रानें दभीतीकरितां चुमुरीला मारिले आणि पिठीनस याला रजि नामक स्त्री दिली. याशिवाय प्रत्यक्ष संबंध नाही.

र थ प्रो ष्ठ:- (१०.६०,५). असमाति व रथप्रोष्ठ यांचा एकत्र उल्लेख आहे. अनुक्रमणीप्रमाणें असमाति हा अगस्त्याचा दौहित्र जो बंधु त्याचा आश्रयदाता. भजेरथ व असमाति पहा. रथप्रोष्ठ व असमाति ही एकाच व्यक्तीची नांवे असावी.

र थ वी ति-दा र्भ्य:- श्यावाश्वाचा आश्रयदाता व बृहद्देवतेप्रमाणें श्यावाश्वाचा श्वशुर. श्यावाश्वाला रथवीति-दार्भ्य यानें आपली मुलगी दिली. पुरुमीळह व तरंत हे विदथिन्चे मुलगे असून ते श्यावाश्वाचे आश्रयदाते होते. यांनी श्यावाश्वाला दान दिल्याचा उल्लेख (.६१) मध्यें आहे. यावरुन तरंत, पुरमीळह, दार्भ्य-रथवीति व श्यावाश्व हे समकालीन असावे. पुरुमीळह, तरंत हे पुरुवंशांतील असावे.

र हु ग ण:- हें गोतमाचें कुलनाम आहे. (.७८,५) या ठिकाणीं सूक्त-द्रष्टा गौतम 'आम्ही रहूगण अग्नीसाठी मधुर स्तोत्रें पठण करतों' असा उल्लेख करतो. गोतमोल्लेखामुळे सूक्त उत्तर.

रा म:- (१०.९३,१४). पृथवान, दु:शीम व वेन यांच्यासह उल्लेख. सूक्तद्रष्टा तान्व आपणास मिळालेल्या दानाचें पृथवान, दु:शीम, वेन व राम यांच्या पुढें वर्णन करतो. तान्व व दु:शीम पहा.

रु धि क्रा:- (.१४,५). पिप्रुसमकालीन एक असुर. स्वश्न व पिप्रु पहा.

रु म:- या लोकांचा ॠणंचय राजा होता. ॠणंचय पहा.

रु श ती:- (.११७,८), अश्वी देवांनी श्याव नामक ॠषीला रुशती नामक भार्या दिली. श्याव आणि रुशती यांचा याशिवाय अन्यत्र उल्लेख नाहीं व प्रत्यक्ष संबंध नाही. सायणमतानें श्याव व श्यावाश्व ही एकच व्यक्ति असावी.

रु श म:- रुम पहा.

रे भ:- शत्रूंनीं याला दहा दिवस कूपांत टाकिंलें होते. अश्वीनी त्याला वर काढिलें. (.११२; ११६; ११७; ११८; ११९; १०.३९) या सूक्तांतून रेभाचा उल्लेख असून सर्वत्र याच अर्थानें आहे. रेभाचा कण्वासह उल्लेख 'रेभाला कूपांतून वर काढिलें व कण्वाचें बधिरत्व नाहीसे केलें' असा आला आहे. कदाचित् रेभ कण्वसमकालीन असावा. सूक्ते उत्तर.

रो म शा:- कक्षीवानाचा आश्रयदाता भाव्य-भावयव्य याची स्त्री. (.१२६) या ठिकाणीं उल्लेख. कक्षीवान् व भाव्य पहा.

ल क्ष्म ण्य:- (.३३,१०). याचेंच दुसरें नांव ध्वन्य. पुरुकुत्सपुत्र त्रसदस्यु, लक्ष्मण्य, मारुताश्व हे संवरणाचे आश्रयदाते होते. त्रसदस्यु पुरुकुत्सपुत्र होता व पुरुकुत्स पुरुवंशज होता.

लो पा मु द्रा:- (.१७९,४). वसिष्ठबंधु अगस्त्य याची स्त्री.

वं गृ द:- (१.५३,८). अतिथिग्वशत्रु. इंद्रानें अतिथिग्वासाठीं वंगृदाचा शिरच्छेद केला.

व त्स:- अनुक्रमणीत याला कण्वपुत्र म्हटलें आहे व (८.८,८) येथें तो कण्वपुत्र असल्याचा स्पष्ट उल्लेख आहे. (.६) या सूक्ताचा हा द्रष्टा असून यांत वत्साचा उल्लेख आहे व त्यामध्यें तो तिरिंदिराजवळून धन मिळाल्याचें वर्णितो. तिरिंदिर पहा. वत्साचा उल्लेख या शिवाय (.९) या सूक्तांत आहे.

व ध्रि म ती:- अश्वीदेवांनी हिरण्यहस्त नामक पुत्र वध्रिमतीला दिल्याबद्ल सूक्तद्रष्टा कक्षीवान् उल्लेख करतो (.११६; ११७; ६.६२; १०.३९; ६५). याशिवाय प्रत्यक्ष संबंध नाही.

व ध्ऱ्य श्व:- (.६१,१). दिवोदास पिता. सरस्वती नदीनें वध्ऱ्यश्वाला दिवोदास पुत्र दिला. वध्ऱ्यश्वाचा आणखी उल्लेख (१०.६९) या सूक्तांत आहे.

व न्द न:- (१०.३९,८) कलि, विश्पला, यांच्या बरोबर उल्लेख. अश्वी देवांनी कूपांत पडलेल्या वंदनास वर काढिलें व अगस्त्याचा आश्रयदाता खेल याच्या पत्नीचा युध्दांत पाय तुटला असतां लोखंडी पाय बसवून दिला. कदाचित् वंदन खेल-विश्पला यांचा समकालीन असावा. याशिवाय प्रत्यक्ष संबंध नाही. वन्दनाचा वरीलप्रमाणेंच आणखी उल्लेख (.११२; ११६; ११७; ११८; ११९) या सूक्तांतून आहे.

व म्र:- (.११२,१५). अश्वी देवांनी याचें रक्षण केल्याबद्ल उल्लेख. वम्र हा (१०.९९) या सुक्ताचा द्रष्टा असून ५ व्या ॠचेत याचा उल्लेख आहे; व ॠचा ९ मध्यें तो इंद्रानें कुत्साकरितां शुष्णाचा वध केल्याबद्ल उल्लेख करतो. कदाचित् कुत्ससमकालीन असावा.

व य्य:- तुर्वीतिसह उल्लेख. इंद्रानें तुर्वीति व वय्य यांनां तरुन नेलें (.१३,१२; .१९,६). तुर्वीति पहा.

व र शि ख:- इंद्रानें अभ्यावर्तिन्- चायमानाकरितां वरशिखाच्या मुलांना मारिलें (.२७,५). अभ्यावर्तिन्-चायमान हा दाशराज्ञयुध्दांत मारला गेला. अभ्यावर्तिन् पहा.

व रो सु षा म न्:- विश्वमनस्चा आश्रयदाता. विश्वमनस् हा (.२३-२६) या सूक्तांचा द्रष्टा असून यांपैकी एका सूक्तांत तो वरोसुषामन् याला धन प्राप्त होण्यासाठी अग्नीची प्रार्थना करतो (२३,२८). विश्वमनस् व वैय्यश्व हे एकच. अश्व्य पहा. वरोसुषामन्चा (.२३; २४; २६) या सूक्तांतून उल्लेख आहे.

व र्चि न्:- (.९९,५). दिवोदास शत्रुशंबर याचा सहकारी. इंद्रानें शंबराची नगरें विध्वंसिली  व वर्चिनास मारिलें असा उपर्युक्त ॠचेंत उल्लेख आहे व तसाच उल्लेख आणखी (.१४; ४.३०; .४७) या ठिकाणीहि आहे. शंबर पहा.

व व्रि:- अनुक्रमणीप्रमाणें (.१९,१) या सूक्ताचा द्रष्टा व अत्रिपुत्र. प्रत्यक्षसंबंध नाहीं. अत्रि पहा.

व श:- अश्व्याचें नांव, अश्व्य पहा.

व सि ष्ठ:- मित्रावरुणपुत्र, अगस्त्यबंधु व भरतकुलोत्पन्न सुदासादिकांचा पुरोहित. सातव्या मंडलास वसिष्ठमंडल म्हणतात. यांतील सर्व सूक्तांचा द्रष्टा वसिष्ठच आहे. वसिष्ठांचा एकवचनी व बहुवचनीं उल्लेख सातव्या मंडलांत (.१; ७; ९; १२; १८; २२; २३; २६; ३३; ३७; ३९; ४२; ५९; ७०; ७३; ७६; ७७; ८०; ८६; ८८; ९०; ९५; ९६) इतक्या सूक्तांतून आहे. याशिवाय वसिष्ठाचा उल्लेख (.११२; .९; १०.१५; ६५; ६६; ९५; १२२; १५०; १८१) या सूक्तांमध्यें आहे.

व सु रु च्:- (.११०,६). सायणमतानें एक व्यक्ति. सूक्तद्रष्ठे त्र्यरुण व त्रसदस्यु, हे आहेत. सुक्तांत दुस-या कोणाचा उल्लेख नाही प्रत्यक्ष कोणशी संबंध नाही.

ब सु रो चि ष्:- (.३४,१६). ग्रिफिथच्या मतानें गायकांचा आश्रयदाता. याचा उल्लेख फक्त एकदांच आला आहे. सायण याचा व्यक्तिवाचक अर्थ घेत नाहींत. याचा कोणाशीं प्रत्यक्ष संबंध नाही.

व सू यु:- (५.२५,२६) या सूक्तांचा दृष्टा. उपर्युक्त सूक्त २५ यांतील ९ व्या ॠचेंत 'वसूयव:' असा बहुवचनीं उल्लेख. कदाचित् विशेषनाम असावें. वरील दोन्ही सूक्तांत आणखी कोणाचा उल्लेख अथवा संबंध दृष्ट नाही.

वा त र श ना:- (१०.१३६,२) या ठिकाणीं वातरशन नामक मुनीचा उल्लेख आहे. अनुक्रमणीप्रमाणें जूति, वातजूति, विप्रजूति व वृषाणक हे या सूक्ताचे द्रष्टे असून अनुक्रमणी त्यांनांच वातरशनॠषी म्हणते. ॠग्वेदांत जूति इत्यादिकांचा उल्लेख नाही. वरील सूक्तांत आणखी कोणाचा उल्लेख नाही.

वा म दे व:- चवथ्या मंडलास वामदेव मंडल असें म्हणतात व त्यांतील ४२-४४ सूक्तांशिवाय बाकीच्या सर्व सूक्तांचा द्रष्टा वामदेव आहे. वामदेवाचा उल्लेख फक्त (.१६,१८) याठिकाणी आहे. परंतु तो कोणा व्यक्तीशी संबंध दाखविणारा नाहीं. अनुक्रमणीप्रमाणें वामदेव हा मंडल ४ चा द्रष्टा मानिल्यास या मंडलांतील बहुतेक सर्व सूक्तांत सुदास, दिवोदास, सृंजय, अतिथिग्व, कुत्स इत्यादि उत्तरकालीन व्यक्तींचा उल्लेख आहे व ४२-४४ या सूक्तांचे द्रष्टे हि त्र्यरुण व त्रसदस्यु हे आहेत. तेव्हां वामदेव ही व्यक्ति सुदास समकालीन असून चवथें मंडल दाशराज्ञयुध्दोत्तर मानण्यास हरकत नाहीं.

वा य त:- वयत पुत्र. पाशद्युम्र यांचे दुसरें नांव. पाशद्युम्र पहा.

वा य्य:- (.७९,१). वय्यपुत्र याचेंच नांव सत्यश्रवस. वय्य पहा.

वा र्षा गि र:- (.१००,१७). ॠज्राश्व, अंबरीष, सहदेव, भयमान, व सुराधस् यांनां वार्षागिर-वृषागिरपुत्र म्हटलें आहे. उपर्युलिखित सूक्ताचे हे द्रष्टे आहेत. यापैकी ॠज्राश्वाचा नहुष लोकांशी संबंध होता. नहुष व ॠज्राश्व पहा. वरील मंडळीपैकी सहदेवाचा पुत्र साहदेव्यसोमक हा वामदेवाचा आश्रयदाता होता. वामदेव (.१५) या सूक्तांत सोमकसाहदेव्याजवळून धन मिळाल्याचें उल्लेखितो. यावरुन ॠज्राश्व अंबरीषादि वृषागिरपुत्र वामदेवाच्या ब-याच जवळच्या काळांतील असावे.

वि म द:- याला आश्विनांनी पुरुमित्राची कन्या बायको करुन दिली असा उल्लेख (.११७,२०; व १०.३९,७) या ठिकाणी आहे. ॠचेंत 'पुरुमित्रस्य योषां' असा उल्लेख असतांना सायणांनी त्याचा 'कन्या' असा अर्थ दिला आहे. पुरुमित्र हा पुरुवंशांतील असावा असें एक मत आहे. त्याप्रमाणें विमद हा पुरुमित्र जामात म्हणजे पुरुंचा संबंधी ठरतो. विमदाचा आणखी उल्लेख (.५१; ११२; ११६; .९,१५; १०.२०; २३; ६५) या सूक्तांतून आहे.

वि शि शि प्र:- (.४५,६). सूक्तद्रष्टा सदापृण हा मनूमें विशिशिप्र यास जिंकल्याचा उल्लेख करतो. याशिवाय कोणाशीं संबंध नाही. याच ॠचेंमध्यें वाणिज्य करणा-या कक्षीवानासाठी पाउफ्स पाडल्याचा उल्लेख आहे. परंतु त्याचा विशिशिप्राशी संबंध नाही.

वि श्प ला:- (.११६,१५). अगस्त्याचा (अनुक्रमणीप्रमाणें) आश्रयदाता खेल याची पत्नी. युध्दामध्यें हिचा पाय तुटला असतां अश्वीनी लोखंडी पाय बसवून दिला. विश्वलेचा आणखी उल्लेख (.११२; ११७; ११८; १०.३९) या सूक्तांत आहे.

वि श्व क:- कृष्णाचा मुलगा. याला कृष्णिय म्हटलें आहे. अश्वींनीं याला विष्णापु नांवाचा मुलगा दिल्याचा उल्लेख आहे. प्रत्यक्ष संबंध नाहीं. विश्वकाचा उल्लेख (.११६; ११७; १०.६५) या सूक्तांतून आहे.

वि श्व म न स्:- हा अश्व्य-वश याचा पुत्र. सायणमतानें याचेंच नांव वैय्यश्व. याचा उल्लेख (.२३; २४) या सूक्तांतून असून (.२३-२५) या सूक्तांचा तो द्रष्टा आहे. अश्व्यसंबंध पहा.

वि श्व वा र:- यजत, सदापृण, मायिन् यांच्यासह उल्लेख (.२२). प्रत्यक्ष संबंध नाही.

वि श्व सा मा न्:- (.२२,१). अनुक्रमणीप्रमाणें अत्रिपुत्र अथवा अत्रिकुलोत्पन्न. तो आपणास स्वत:स अग्नीची पूजा करण्यास आज्ञा करतो. हा वरील सूक्तांचा द्रष्टा आहे. अत्रिसंबंध पहा.

वि श्वा मि त्र:- सुदासपुरोहित व वसिष्ठाचा शत्रु. तिस-या मंडळाचे द्रष्टे विश्वमित्र व त्याच्या कुलांतील ॠषी आहेत. प्रत्यक्ष विश्वामित्र याच्या नांवावर बरीच सूक्तें आहेत. विश्वामित्रानें सुदासाकडून यज्ञ करविल्याचा (.३,९) व त्याच्या यज्ञाकरितां (अश्वमेधा करितां) घोडा सोडल्याचा (.५३,११) उल्लेख आहे. विश्वामित्राच्या कुलास 'कुशिक' असें नांव होतें. (.३३,५) येथें तो आपणास 'कुशिकस्य सूनु:' म्हणवितो. विश्वामित्र कुलाचा 'विश्वामित्रा:'  या बहुवचनी पदानेंहि उल्लेख केला आहे (.५३,१३; १०.८९,१७). विश्वामित्राचा प्रत्यक्ष उल्लेख (.५३) या सूक्तांत आहे.

वि षा णि न्:- (.१८,७). एकाजातीच्या लोकांचे नांव सुदासाचें शत्रू असावे.

वि ष्णा पु:- विश्वकाचा मुलगा. विश्वक पहा. प्रत्यक्ष संबंध नाही.

वी त ह व्य:- (.१५, २-). भरद्वाजकुलज. अथवा भरद्वाजाचेंच नांव असावें. वीतहव्य (.१५) या सूक्तांचा द्रष्टा आहे. भरद्वाज पहा.

वृ क द्व र स्:- (.३०,४). इंद्रशत्रु. लुडविगमतानें शंडीकांचा राजा.

वृ च या:- (.५१,१३). कक्षीवानाची स्त्री. अश्वी देवांनी कक्षीवानाला वृचया नामक स्त्री दिली. कक्षीवानसंबंध पहा.

वृ ची वं त:- (.२७,४-५). इंद्रानें वृचीवंताचा पराभव करुन त्याला दैववात-अभ्यावर्ति याच्या ताब्यांत दिलें वरशिख पहा. वृचीवंत हा तुर्वशांचा राजा असावा.

वृ ष ग ण:- (.९७,८). या नांवाचे ॠषी. पूर्वोक्त ॠचेचे द्रष्टे. प्रत्यक्ष संबंध नाहीं.

वृ ष ण श्व:- (.५१,१३). इंद्र, वृषणश्व्याची मेना नामक कन्या झाला. प्रत्यक्ष संबंध नाही.

वृ ष्टि ह व्य:- (१०.११५,९), वृष्टिहव्य नामक ॠषीचे पुत्र उपस्तुत हे अग्नीची स्तुति करितात, असा उल्लेख. उपर्युक्त सूक्ताचा द्रष्टा उपस्तुत आहे. प्रत्यक्ष संबंध नाही.

वे त सु:- द्योतन व कुत्स यांचा विरोधी. द्योतन, तूतुजि पहा. इंद्रानें तुग्र, स्मदिभ व वेतसु यांचा कुत्साकरितां पराभव केला (१०.४९,४), वेतसूचा उल्लेख (.५८; ६.२०; २६; १०.४९) या ठिकाणी आहे.

वे न:- पृथी अथवा पृथु याचा पिता, पृथु याला वैन्य- वेनपुत्र म्हटलें आहे. दु:शीम, पृथवान, राम पहा.

वे श:- (१०.४९,५). आयूचा विरोधी. इंद्रानें आयूकरितां वेश नामक असुरास वांकविले. आयुसंबंध पहा.

वै क र्ण:- (.१८,११). एका जातीचे लोक. सुदासशत्रू युदासानें वैकर्ण नामक एकवीस राजांचा पराभव केला.

वै द थि न्:- विदथिन्चा मुलगा. ॠजिश्वन्चें दुसरें नांव. लुडविग मतानें औशिज-ॠजिश्वा व वैदथिन्-ॠजिश्वन् हे एकच होत. कक्षीवानासहि 'औशिज कक्षीवान्' म्हटले आहे (.१८,१). यावरुन कक्षीवान् व ॠजिश्वन् हे भाऊभाऊ असून उशिजेचे पुत्र असावें. ॠजिश्वन्, पिप्रु व शंबर यांचे संबंध पहा. वैदथिन्चा उल्लेख (.१६; .२९) येथें आहे.

वै द द श्वि:- (.६१,१०). अनुक्रमणीप्रमाणें तरंत व पुरुमीळह हे विददश्वीचे मुलगे. या दोघांनां वैददश्वि म्हटलें आहे. हे श्यावाश्वाचे आश्रयदाते होते. तरंत व पुरुमीळह पहा.

वै न्य:- (.९,१०) वेनपुत्र. वेन पहा. पृथी अथवा पृथु हा वेनपुत्र होता. या पृथूचेंच नांव वैन्य.

वै य्य श्व:- (.२३,२४). व्यश्वपुत्र विश्वमनस् याचेंच दुसरें नांव, याचा (.२४,२३) या ठिकाणीं आणखी उल्लेख आहे. विश्वमनस् पहा.

वै शं त:- (.३३,२). सायण याचा मनुष्यवाचक अर्थ करीत नाहीत. लुडविगमतानें वेशन्त हेंहि याचेंच नांव असावें व हा पृथुपर्शूंचा पुरोहित असावा. मॅकडोनल मतानें हा राजा असून याच्या यज्ञास गेलेल्या इंद्राला वसिष्टानें सुदासाकडे आणिलें. ग्निफिथ म्हणतो 'वैशंत नामक नदी असून त्या नदीवरुन पाशद्युम्राच्या यज्ञास गेलेल्या इंद्राला वसिष्ठानें सुदासाकडे आणिलें.'

व्य श्व:- वैयश्व अथवा विश्वमनस् याचा पिता. व्यश्वाचा उल्लेख (.२३,२३; २४..६५,७) या ठिकाणी आहे. विश्वमनस् पहा.

व्यं स:- (.१४,५). सायण याचा 'अंसरहित' असा अर्थ करतो. ग्रिफिथमतानें हा इंद्रशत्रु असून इंद्रानें पिप्रु व शुष्ण यांच्या बरोबर व्यंसाचा वध केला. पिप्रु, शंबर पहा.

श क पू त:- (१०.१३२,५) या सूक्ताचा हा द्रष्टा असून अनुक्रमणीप्रमाणें नृमेधपुत्र आहे. या सूक्ताच्या शेवटच्या ॠचेंत तो 'नृमेधाप्रमाणें माझें रक्षण करा' अशी मित्रावरुणांची प्रार्थना करतो, नृमेध व जरुथ पहा.

शं डी क:- (.३०,८). सरस्वती नदीतीरावर राहणारे लोक. लुडविग मतानें या शंडीक लोकांचा वृकद्वरस् हा राजा होता. सूक्तद्रष्टा गृत्समद म्हणतो 'इंद्राने सरस्वती नदीतीरावरील शंडीकांच्या मुख्याला मारिलें, कदाचित् शंडीक गृत्समदाच्या जवळच्या कालांतील असावे.

श त या तु:- (.१८,२१). वसिष्ठाचा मुलगा शक्ति याचें हें नांव असें कांहीचें मत आहे. व कांहीच्या मतानें पराशर व शतयातु हीं वसिष्टाचींच नांवे असावीं. उपर्युक्त ॠचेंत पराशर शतयातु व वसिष्ट यांचा एकत्र उल्लेख आहे. सायणमतानें पराशर व शतयातु ही वसिष्टाचीं विशेषणें आहेत.

शं त नु:- (१०.९८,१). देवापीचा भाऊ. यानें आपला भाऊ देवापि याला यज्ञामध्यें (पर्जन्य पडण्यासाठी) आर्त्विज्य दिलें होतें. देवापि पहा.

शं ब र:- (.२६,३.). दिवोदास शत्रु. दिवोदासाकरितां इंद्रानें शंबरास मारिलें. शंबराचा उल्लेख असलेली सूक्ते (.५१; ५४; ५९; १०१; १०३; १३०; .१२; १४; १९; .२६; ३०; .१८; २६; ३१; ४३; ४७; .१८; ९९; .६१) उत्तर.

श यु:- याला अश्वीनीं दुभती गाय दिल्याचा उल्लेख (.११२; ११६; ११७; ११८; ११९; .६२; .६८; १०.३९) अशा अनेक स्थळीं आहे. प्रत्यक्ष संबंध नाही.

श र-आ र्च त्क:- आर्यत्काचें नांव. आर्चत्क पहा. प्रत्यक्ष संबंध नाही.

श र भ:- (.१००,६). इंद्रानें शरभाला धन दिल्याबदृल सूक्तद्रष्टा भृगुपुत्र नेम उल्लेख करतो. प्रत्यक्ष संबंध नाहीं.

श वि ष्ठ:- सायणमतानें श्रुतवर्ण आर्क्ष याचें विशेषण. लुडविग मतानें एक मनुष्य. सूक्तद्रष्टा गोपवन म्हणतो 'अश्वी देव ज्याप्रमाणें तुग्राला वाहून नेतात त्याप्रमाणें शविष्ठाचे चार घोडे मला वाहून नेतात (.७४,१४). या गोपवनाचा आर्क्ष-श्रुतर्वण हाहि आश्रयदाता होता (.७४,१३) आणि आर्क्ष व इंद्रोत हे प्रियमेधाचे आश्रयदाते होते. ॠक्षसूनु, गोपवन व प्रियमेध पहा. शविष्ठ ही व्यक्ति मानिल्यास ती तुग्रानंतरची ठरते.

श शी य सी:- (.६१,६). अनुक्रमणीप्रमाणें तरंताची स्त्री, तरंत व पुरुमीळह पहा.

श श्व ती:- (.१,३४), आसंगाची स्त्री. आसंग पहा.

शां ड:- (.६३,९). भरद्वाजाचा आश्रयदाता. भरद्वाज शांडाजवळून रथ व घोडे दान मिळाल्याचें वर्णितो. भरद्वाजसंबंध पहा.

शा त व ने य:- (.५१,७), पुरुणीथ व भरद्वाज यांच्यासह उल्लेख. 'भरद्वाजानें ज्या अग्नीला हवि अर्पिला त्या अग्नीची शातवनेय व पुरुणीथ स्तुति करतात.' कदाचित शातवनेय व पुरुणीथ ही एकच व्यक्ति असून त्या व्यक्तीचा भरद्वाज आश्रयदाता असावा. पुरुणीथ पहा.

शा र्या त:- (.५९,१२) मध्यें सूक्तद्रष्टा आंगिरसपूत्र सव्य म्हणतो 'इंद्रा तूं आमच्या येथें सोमपान करतोस त्याचप्रमाणें शार्याताच्या येथेंहि कर. यावरुन शार्यात व सूक्तद्रष्टा हे समकालीन असावे. हा सूक्तकार याच सूक्तांतील ६ व्या ॠचेंत इंद्रानें अतिथिग्वाकरितां शंबरास मारल्याचा उल्लेख करीत असल्यामुळें सूक्तकार अतिथिग्वानंतरचा ठरतो. (.५१,७) येथें सूक्तद्रष्टा विश्वामित्र 'शार्याताच्या येथें सोम प्यालास तसा आमच्या येथें सोम पी' असें म्हणतो. शार्यात विश्वामित्र समकालीन.

शि ग्रु:- सुदासशत्रु. अज, यक्षु, आणि शिग्रु यांनी (युध्दांत शरण आल्यानंतर) इंद्रास अश्वशिरांचा बलिअर्पण केला (.१८,१९).

शिं जा र:- (.५,२५). सूक्तद्रष्टा कण्वकुलोत्पन्न ब्रह्मातिथि म्हणतो 'अश्वीहो कण्व, प्रियमेध, उपस्तुत, अत्रि आणि शिंजार यांचे रक्षण केलें त्याप्रमाणें माझें रक्षण करा.' सूक्तद्रष्ट्याचा चेदि कशु हा आश्रयदाता होता. कण्व व अत्रिसंबंध पहा.

शि म्यु:- (.१८,५). सुदासशत्रु, सुदासाकरितां इंद्राने शिम्यूस मारिले.

शि रिं बि ठ:- (१०.१५५,१). हा या सूक्ताचा द्रष्टा आहे. तो अलक्ष्मीला दूर घालवूं इच्छितो. अनुक्रमणी याला भरद्वाजपुत्र म्हणते. याशिवाय अधिक संबंध नाहीं.

शि वा स:- (.१८,७), सुदासशत्रु पक्थ, भलानस् वि षाणिन् अलिनास् व शिवास् हे सुदासशत्रू होते असा पूर्वोक्त ॠचेंत उल्लेख आहे.

शी ष्ट:- (.५३,४). ग्रिफिथमतानें एका जातीचे लोक. प्रत्यक्ष संबंध नाही.

शु न: शे प:- अनुक्रमणीप्रमाणें विश्वामित्रपुत्र व (.२४-३०) या सूक्तांचा द्रष्टा. वरील सूक्तांपैकी सूक्त २४ यांतील १२ व १३ या ॠचांमध्ये शुन:शेपाचा उल्लेख आहे. यूपाला बांधलेला शुन:शेप मुक्त होण्यासाठी वरुणाची प्रार्थना करतो. अशाच अर्थाचा आणखी उल्लेख (.२,७) याठिकाणी आहे. अनुक्रमणीप्रमाणें तो विश्वामित्रपुत्र आहे. याशिवाय दुसरा संबंध नाही.

शुष्ण:- (.१९,६). इंद्रानें आपलें सारथ्य करणा-या कुत्साकरितां शुष्णाचा वध केला आणि दिवोदासाकरितां शंबराचीं नगरें विध्वंसिली शुष्णाचा आणखी उल्लेख (.११; ३३; ५१; ५६; ६३; १०१; १०३; १२१; १७५; .१४; १९; ३.३१; .१६; ३०; .२९; ३१; ३२; .१८; २०; २६; ३१; .१९; .१; ६; ४०; ५१; ९६; १०.२२; ४९; ९९; १११) या सूक्तांमधून आहे.

शृं ग वृ ष:- (.१७,१३). सायणमतानें एका ॠषीचें नांव. प्रत्यक्ष संबंध नाहीं.

शौचद्रथ:- (.७९,२). वाय्य-सत्यश्रवस याच्या बरोबर उल्लेख. सूक्तद्रष्टा वाय्य म्हणतो. 'उषे, ज्याप्रमाणें सुनीथ-शौचद्र-थास प्रकाश दिलास त्याप्रमाणें मला प्रकाश दे' शौचद्रथ वाय्य याचा समकालीन असावा. वाय्य व वय्य पहा.

शौ र दे व्य:- (.७०,१५). ग्रिफिथमतानें एक व्यक्ति. प्रत्यक्ष संबंध नाहीं.

श्या व:- (.११७,२४). असुरांनीं छिन्नविच्छिन्न केलेल्या श्यावाला अश्वीनीं पूर्ववत् केलें. श्यावाला अश्वीनीं रुशती नामक स्त्री दिल्याचा उल्लेख (.११७,८) येथें आहे. सायणमतानें श्याव व श्यावाश्व हे एकच आहेत. सायणांनी (.६१,९) येथें श्याव याचा श्यावाश्व असा अर्थ केला आहे. या सूक्ताचा द्रष्टा श्यावाश्व असून तो तरंत, पुरुमीळह यांच्यापासून दान मिळाल्याचें या सूक्तांत वर्णितो. सूक्त (१०.६५,१२) मध्यें वध्रिमती नामक स्त्रीला अश्वीदेवांनी श्याव नामक पुत्र दिला असा उल्लेख असून सायणांनी तेथें श्याव हें हिरण्यहस्त याचें विशेषण केलें आहे. आणि अश्वीनी वध्रिमतीला हिरण्यहस्त नामक पुत्र दिला असाहि स्पष्ट उल्लेख आहे. यावरुन सायणमतानें श्याव, श्यावाश्व आणि हिरण्यहस्त हे एकच होत. श्यावाश्व हा तरंत व पुरमीळह यांचा पुरोहित होता. (.१९,३७) येथें श्यावाचा उल्लेख असून त्याचा सायणांनी 'शामवर्ण' असा अर्थ केला आहे. मॅकडोनलमतानें हा कोणी सुवास्तु नदीकांठीं राहणारा मनुष्य असावा.

श्या व क:- (.४,२). रुम, रुशम यांच्याबरोबर उल्लेख. सूक्तद्रष्टा कण्वकुलोत्पन्न देवातिथि म्हणतो; 'इंद्रा, रुशम, श्याव आणि कृप यांच्या येथें सोमपानानें हर्षित होतोस त्याप्रमाणें (हर्षयुक्त होण्यास) आमची स्तोत्रें तुला आणोत.' रुम, रुशम, पहा. श्यावकाचा आणखी उल्लेख (.३) या सूक्तांत आहे.

श्या वा श्व:- तरंत, पुरुमीळ्ह, यांचा पुरोहित. अथवा यांच्या पासून दान घेणारा. याला तरंतानें आपली कन्या दिली. अनुक्रमणीप्रमाणें तो अर्चनानस्चा मुलगा होता. श्यावाश्वाचा उल्लेख (.५२; ८१; .३५; ३६ ३७; ८). या सुक्तांतून असून (.५२-६१ व .३५-३८) या सूक्तांचा तो द्रष्टा आहे. तरंत पुरुमीळह पहा.

श्रु त क क्ष:- (.९२,२५). हा अश्व व गाई यांच्या प्राप्तीसाठी इंद्राची स्तुति करतो. या सुक्ताचा हा द्रष्टा आहे. अनुक्रमणी याला 'आंगिरसकुलोत्पन्न' म्हणते. प्रत्यक्ष संबंध नाही.

श्रु त र थ:- (.१२२,७). कक्षीवानाचा आश्रयदाता. कक्षीवान व प्रियरथ पहा.

श्रु त र्य:- (.११२,९). नर्य, कुत्स यांच्यासह उल्लेख अश्वीनीं श्रुतर्य, नर्य, कुत्स यांचे रक्षण केलें. नर्य संबंध पहा. प्रत्यक्ष संबंध अनिश्चित.

श्रु त र्व ण:- आर्क्ष. याचेंच नांव ॠक्षसूनु (.७४,४;१३). ॠक्षसूनु पहा. श्रुतर्वनाचा आणखी उल्लेख (१०.४९,५) या ठिकाणी आहे.

श्रु त वि त्:- (.४४,१२). सदापृण, बाहुवृक्त, तर्य, यजत, इत्यादिकांबरोबर उल्लेख आहे. याच सूक्तांच्या १० व्या ॠचेंत यजताबरोबर अवत्साराचा उल्लेख आहे. सूक्तद्रष्टा अवत्सारच आहे. प्रत्यक्ष संबंध कोणाचाच नाही. अवत्सार पहा.

श्रु ष्टि गु:- (.५१,१). पुष्टिगु यासह उल्लेख. या सूक्ताचा द्रष्टा श्रुष्टिगु म्हणतो ''इंद्र्रा तूं सांवरण मनु, नीपातिथि, मेध्यातिथि, पुष्टिगु, श्रुष्टिगु यांच्यासह सोम प्यालास.'' नीपातिथिसंबंध पहा.

श्वै त्रे य:- (.३३,१४). इंद्रानें युध्दांत कुत्साचें आणि दशद्यूचें रक्षण केलें व श्वैत्रेयास उठविलें. लुडविग याला 'कुत्साचा मुलगा' असें म्हणतो, व कांहीच्या मतानें श्वैत्रेय हे भुज्यूचेंच नांव असावें. श्वैत्रेयाचा आणखी उल्लेख (५.१९,३) येथें आहे.

सं व र ण:- लक्ष्मण्याचा पुरोहित. लक्ष्मण्य पहा.

स त्य श्र व स:- वाय्य याचें दुसरें नांव. वाय्य पहा.

स दा पृ ण:- श्रुतवित् पहा. प्रत्यक्ष संबंध नाही.

स ध्रि:- एवावद व यजत पहा. प्रत्यक्ष संबंध नाही.

स प्त गु:- आंगिरसकुलज. (१०.४७) या सूक्ताचा द्रष्टा. या सूक्ताच्या शेवटच्या ॠचेंत याचा उल्लेख असून तो आपणास आंगिरस म्हणवितो. प्रत्यक्ष संबंध नाही.

स प्त वं ध्रि:- (.७८,६). याला याच्या भावानें पेटीत कोंडून ठेवले असतां तेथून सुटण्याबद्ल तो अश्वीची स्तुति करतो. 'अत्रीला जसें सोडविलें तंसे मला सोडवा' असें तो म्हणतो. यावरुन तो अत्रीच्या नंतरचा असावा. हा (.७८; .७३; १०.३९;) या सूक्तांचा द्रष्टा असून या सूक्तांत याचा वरील अर्थानेंच उल्लेख आहे.

स स:- (.२१,४) या सूक्तांचा हा द्रष्टा आहे. अनुक्रमणीप्रमाणें हा अत्रिकुलोत्पन्न आहे. याशिवाय प्रत्यक्ष संबंध नाहीं. विश्वसामन्च्या उल्लेखामुळें सूक्त उत्तर.

स ह दे व:- ॠज्राश्व, भयमान, सुराधस् व अंबरीष यांच्यासह उल्लेख. वृषागिरपुत्र. वार्षागिर पहा.

सां व र ण:- अथवा सावर्णि (.५१,१). याला अनुक्रमणी मनुपुत्र म्हणते. सावर्णीचा उल्लेख (१०.६२) या सूक्तांत आहे. दाशराज्ञ युध्दांतील व्यक्तीशी संबंध नाहीं.

सा प्य:- नमीचें दुसरें नांव. नमी पहा. प्रत्यक्ष संबंध नाहीं.

स र्ञ्ज य:- (.४७,२५). सृंजयपुत्र. सायणमताने प्रस्तोकाचे नांव. प्रस्तोक हे दिवोदासाचे नाव. प्रस्तोक पहा.

सु तं भ र:-(.११-१४) या सूक्तांचा द्रष्टा आहे. या सूक्तांत याचा उल्लेख नाहीं. (.१३,६) या ठिकाणीं हा परिचर्या करणारे नहुषपुत्र येवोत' असा उल्लेख करतो. (.४४) येथें सुतंभराचा उल्लेख आहे. या सूक्ताचा द्रष्टा अवत्सार हा सुतंभराला यागनिर्वाहक व दाता म्हणतो. यावरुन सुतंभर, नहुष व अवत्सार हे समकालीन असावे.

सु द क्ष:- (.९२,४). श्रुतकक्ष नामक सूक्तद्रष्ट्याच्या सूक्तांत उल्लेख. श्रुतकक्ष म्हणतो, 'सुदक्षाच्या येथें इंद्र सोम प्याला' प्रत्यक्ष संबंध नाही.

सु दा स:- दाशराज्ञ युध्दांतील मुख्य. सुदासाचा उल्लेख (.४७,६३; ११२; .५३; .५३; .१८; १९; २०; २५; ३२; ३३; ५३; ६०; ६४; ८३;) या सूक्तांत आहे.

सु दी ति:- (.७१,१४;). पुरुमीळह समकालीन. सुदीति आपणास उत्तम गृह मिळण्याबद्ल याचना करण्यास पुरुमीळहास सांगतो. पुरुमीळ्ह पहा.

सु दे व:- (.५,६). 'सुदेवाकरितां गाईच्या गोठ्यांत उदकसेचन करा' अशी सूक्तद्रष्टा अश्वीची प्रार्थना करतो. सूक्तद्रष्टा ब्रह्मातिथि असून तो याच मूक्तांत चैद्य-कशु याच्या जवळून धन मिळाल्याचें वर्णितो. सायणानीं सुदेव शब्द हविर्दात्याचें विशेषण म्हणून घेतला आहे. परंतु लुडविग तें विशेषनाम मानितो. कशु व कण्व पहा.

सु पि त्र्य:- लुडविगमताप्रमाणें एक मनुष्य व सायणमताप्रमाणें अग्नीचें विशेषण, बृहिदृव नामक सूक्तद्रष्ट्याच्या सूक्तांत उल्लेख (१०.११५,६) आहे. प्रत्यक्ष संबंध नाहीं.

सु मि त्र:- (१०.१०५,११). या सूक्ताचा द्रष्टाहि सुमित्रच आहे. तो आपणास कुत्सपुत्र म्हणवितो. कुत्स पहा.

सु मी ळ्ह:- (.६३,९). भरद्वाजाचा आश्रयदाता. सुमीळहापासून शंभर गाई मिळाल्याचें भरद्वाज वर्णितो. भरद्वाज संबंध पहा.

सु रा ध स्:- (.१००,१७). ॠज्राश्वासह उल्लेख. ॠज्राश्व पहा.

सु श्र व स्:- (.५३,९). ज्याच्या विरुद्ध युध्दास वीस राजे उभे होते अशा साहाय्यरहित सुश्रवस्चें इंद्रानें रक्षण केल्याचें सूक्तद्रष्टा सव्य उल्लेखिंतो. कदाचित् हा दाशराज्ञांपैकी असावा.

सु षा म न्:- वरोसुषामन् पहा.

सृं ज य:- तुर्वशशत्रु. इंद्रानें तुर्वशाला सृंजयाच्या ताब्यांत दिलें (.२७,७). याचेंच दैववात हें नांव आहे (.१५,४). सृंजय हें नांव एका जातीच्या लोकांचे होतें असें मॅकडोनलचें मत आहे.

सृ बिं द:- (.३२,२). सूक्तद्रष्टा मेधातिथि इंद्रानें सृबिंद व पिप्रु यांचा वध केल्याचें उल्लेखितो. कदाचित् पिप्रु आणि सृबिंद समकालीन असावे. पिप्रुसंबंध पहा.

सो भ रि:- सर्वानुक्रमणीप्रमाणें (.१९-२२ व .१०३) या सूक्तांचा द्रष्टा आहे. वरील सूक्तांपैकी सूक्त २१ शिवाय सर्व सूक्तांत याचा उल्लेख आहे. अनुक्रमणी याला काण्व (कण्वकुलोत्पन्न) म्हणते. (.१९,३६) येथें तो आपणास त्रसदस्यूपासून पन्नास वधू मिळाल्याचें उल्लेखितो. शिवाय ॠचा (२२;) मध्यें तो पक्थाचा व (१०३,२) मध्यें दैवोदासीचा उल्लेख करितो. त्रसदस्यु व दैवोदासि पहा. सोभरि हें कुलनाम असावें. (.१९,३२; २०;) या ठिकाणी सोभरीचा बहुवचनीं उल्लेख आलेला आहे. सोभरीचा आणखी उल्लेख (.५) या सूक्तांत आहे.

सो म क-सा ह दे व्य:- सहदेवपुत्र. वामदेवाचा आश्रयदाता. सूक्तद्रष्टा वामदेव सोमकापासून आपणास घोडे मिळाल्याचें वर्णितो (.१५,८). याच सूक्तांत सूक्तद्रष्टा दैववात-सृंजय याच्या अग्नीचें वर्णन करतो (.१५;). लुडविगमतानें सोमक सृंजय लोकांचा राजा होता. वामदेव व सृंजय पहा.

स्म दि भ:- (१०.४९,४). इंद्रानें तुग्र आणि स्मदिभ यांना कुत्साच्या ताब्यांत दिलें. कुत्स पहा.

स्यू म र श्मि:- (.११२,१६). अश्वीदेवांनी कळकाच्या बाणांनी स्यूमरश्मीचें रक्षण केलें प्रत्यक्ष संबंध नाही.

स्व न द्र थ:- (.१,३२), सायणमताप्रमाणें मेधातिथीचा आश्रयदाता. आसंग याचें विशेषण; व लुडविगमतानें आसंगाचा मुलगा. आसंगप्लायोगि पहा.

स्व न य:- भाव्य याचें नांव (.१२ ६,३). भाव्य पहा.

स्व श्न:- इंद्रानें स्वश्न, शुष्ण, पिप्रु, नमुचि व रुधिका यांचा वध केला (.१४). वरील व्यक्ती कदाचित् पिप्रुसमकालीन असाव्या. पिप्रु पहा.

ह र या ण:- (.२५,२२). सूक्तद्रष्टा विश्वमनस् हा उक्षण्यायन, हरयाण व वरोसुषामन् यांजपासून दान मिळाल्याचें वर्णितो. सायण उक्षण्यायन व हरयाण ही वरोसुषामन्ची विशेषणें मानतो.

हि  र ण्य स्तू प:- (१०.१४९,५). सर्वानुक्रमणीप्रमाणें आंगिरसपुत्र व अर्चत् नामक सूक्तद्रष्ट्याचा पिता. सूक्तद्रष्टा अर्चत् म्हणतो 'आंगिरस हिरण्यस्तूपाप्रमाणें अन्नप्राप्तीसाठी मी सवित्याची स्तुति करतों. हिरण्यस्तूप हा (.३१-३५) या सूक्तांचा द्रष्टा असून (३३,१४) येथें इंद्रानें कुत्साचें रक्षण केल्याचें तो उल्लेखितो. कुत्स पहा.

हि र ण्य ह स्त:- (.११६,१३). अश्वीदेवांनी वध्रिमतीला हिरण्यहस्त नामक पुत्र दिला. प्रत्यक्ष संबंध नाहीं. वध्रिमती पहा.

वरील विवेचनावरुन पुढें दिलेल्या व्यक्तीचा संबंध निश्चितपणें दाशराज्ञ युध्दाशीं जोडतां येतो. बाकीच्या व्यक्तीचा देखील संबंध दिसतो पण तो तितका निश्चित नाहीं.

ज्ञा त सं बं ध:- अक्ष, अगस्त्स, अजास, अतिथिग्व, अत्क, अत्रि, अनु, अपाला, अभ्यावर्तिन् चायमान, अरट्व, अर्चनानस्, अर्जुन, अर्ण, अलिनास, अवत्सार, अवस्यु, अश्वथ, अश्वमेध, अश्व्य, असमाति, अह्नवाय्य, अतिथिग्व, आयु, आर्ष्टिषेण, आश्वमेध, आसंग प्लायोगि, आस्त्रबुध्न, इक्ष्वाकु, इंद्रोत, उग्रदेव, उपमश्रवस्, उशना काव्य, उशिज, ॠक्षसूनु: आर्क्ष, ॠजिश्वन, ॠणंचय, एतश, और्व, औलान, औशिज, ककुह, कक्षीवान्, कण्व, कवष, कवि, कशोजु, कानीत, काव्य, कीकट, कुत्स, कुयव, कुरुंग, कुरुश्रवण, कुशिक, कृप, कौलितर, क्षत्रश्री, खेल, गयप्लात, गविष्टिर, गुंगु, गृत्समद, गोरिक्षित, गोशर्य, गौरिवीति, घोष, घोषा, चायमान, चित्र, चित्ररथ, च्यवन, च्यवान, च्यवतान, जमदग्नि, जरुथ, जहृावी, तकवाम, तरुक्ष, तान्व, तिरिंदिर, तुग्र, तुर्वश, तुर्वीति, तूतुजि, तूर्वयाण, तुक्षि, तृत्सु, त्रसदस्यु, त्रासदस्यव, त्रिशोक, त्रैवृष्ण, त्र्यरुण, दशद्यु, दशव्रज, दिवोदास, दीर्घतमस्, दुर्गह, दुर्मित्र, दु:शासु, दृभीक, देववत, देववात, देवश्रवस्, देवापि, दैववात, दैवोदासि, द्योतन, द्रुह्यु, ध्वन्य, नभाक, नर्य, नववास्त्व, नहुष, नाभाक, नाभानेदिष्ट, नीपातिथि, नृमेध, नोधस्, पक्थ, पज्र, पराशर, पर्णय, पर्र्शु, पायु, पार्थव, पार्थ्य, पार्षद्वाण, पाशद्युम्र वायत, पुरय, पुरुकुत्स, पुरुकुत्सानी, पुरुणीथ, पुरुपंथा, पुरुरवस्, पुतक्रता, पूरु, पृक्षयामन्, पृथु, पृथुश्रवस्, पृषध्र, पेरुक, पैजवन, पौतक्रत, पौर, पौरुकुत्स्य, प्रतृद, प्रमगंद, प्रस्कण्व, प्रस्तोक, प्रातर्दनि, प्रियमेध, प्रियरथ, बभ्रु, बल्बूथ, बृबु, बृहदुक्थ, बृहद्रथ, भरत, भरद्वाज, भलानस्, भारद्वाज, भार्वर, भुज्यु, भृगवाण, भेद, भोज, मशर्शार, मान, मान्य, मामतेय, मायव, मायु, मारुताश्व, मित्रातिथि, मृगय, मृळीक, मैथ्य, मेघातिथि, मध्यातिथि, यक्षु, यदु, याद्व, युध्यामधि, रथप्रोष्ट, रहूगण, राम, रुम, रुशती, रुशम, रोमशा, लक्ष्मण्य, लोपामुद्रा, वंगृद, वध्र्यश्व, वभ्र, वय्य, वरशिख, वर्चिन्, वश वसिष्ट, वामदेव, वायत, वाय्य, विश्पला, विश्वमनस्, विश्वामित्र, विषाणिन्, वीतहव्य, वृचया, वृचीवंत, वेतसु, वेन, वेश, वैकर्ण, वैदथिन्, वैन्य, वैयश्व, वैशंत, व्यश्व, शकपूत, शंडीक, शतयातु, शंतनु, शंबर, शविष्ट, शश्वती, शांड, शातवनेय, शार्यात, शिग्रु, शिम्यु, शिवास, शुन:शेप, शुष्ण, शौचद्रथ, श्यावक, श्रुतरथ, श्रुतर्वण, श्रुष्टिगु, श्वैत्रेय, संवरण, सत्यश्रवस्, सार्ञ्जय, सुतंभर, सुदास, सुमित्र, सुमीळह, सृंजय, सोभरि, सोमक, स्मदिभ, स्वनद्रथ, हिरण्यस्तूप.

आतांपर्यत झालेलें व्यक्तिविषयक विवेचन हें प्रत्येक सूक्तांच्या पूर्वोत्तरतेविषयीं पुराव्याच्या तपासणीकरितां होय. व्यक्तीचा दाशराज्ञ युध्दाशी संबंध किंवा तिची उत्तरता दिसली म्हणजे तिचा उल्लेख करणारें सूक्त दाशराज्ञयुध्दोत्तर समजावे. हा सूक्तांस उत्तरकालीन ठरविण्याचा एक पुरावा झाला. दुस-या प्रकारचा पुरावा म्हटला म्हणजे जर एखादें सूक्त अमुक एक ग्रंथकाराचें म्हणून सर्वानुक्रमणीनें मानलें असलें तर त्यावरुनहि कांही कांही प्रसंगी सूक्ताच्या उत्तरकालीनत्वासंबंधानें निर्णय काढतां येईल. पुष्कळदां सर्वानुक्रमणीकारानें मंत्रद्रष्ट्याच्या नांवावर एखादें सूक्त घातलें आहे, तें त्याचें नांव त्या सूक्तांत सांपडलें एवढ्यावरच घातलें आहे. तें नांव मंत्रद्रष्ट्याचें नसेल असा आक्षेप सर्वानुक्रमणीच्या निर्णयावर घेतां येईल; पण आंत ज्याचें नांव आलें आहे त्या व्यक्तीशी सूक्ताचें उत्तरत्व स्पष्टच आहे.

सर्वानुक्रमणीची कुलसंबंधविषयक माहिती ज्या मानानें ग्राह्य असेल त्या मानानें आमचे निर्णय ग्राह्य होतील. मधुच्छन्द हा विश्वामित्राचा पुत्र होता किंवा नव्हता, तो पहिल्या दहा सूक्तांचा कर्ता होता किंवा नव्हता, याविषयीं सर्वानुकमणीनें दिलेली माहिती जर ग्राह्य धरली तर आपणांस ती सूक्तें दाशराज्ञ युध्दानंतर झाली असें म्हटलेंच पाहिजे. सध्यां आम्ही आमच्या प्रकृत विवेचनापुरती ती माहिती ग्राह्य धरुन ॠग्वेदांतील प्रत्येक सूक्ताची पूर्वोत्तरता पाहणार आहोंत. सर्वानुक्रमणीची व्यक्तीच्या लौकिक इतिहासासंबंधी विश्वसनीयता पुढें तपासूं.

 प्रत्येक ऋग्वेदसूक्ताची  दाशराज्ञयुद्धाशीं पूर्वोत्तरता दाखविणारें कोष्टक.


मागें दिलेल्या माहितीवरुन ज्यांचा संबंध दाशराज्ञ युध्दाशीं प्रत्यक्ष दाखवितां येतो त्यांची नावें पूर्वी दिलीच आहेत. पुढें दिलेल्या व्यक्तीपैकी कांहीचा संबंध लागत असला तरी तो तितका स्पष्ट नसल्यामुळें व कांहीचा अनिश्चित असल्यामुळें त्यांची नावें वेगळी दिली आहेत.

अ ज्ञा त सं बं ध:- अंशु, अग्रु, अधाश्व, अध्रिगु, अप्रवान, अंबरीष, अयास्य, आजमीळहास:, आयवस, आर्चत्क, आश्वघ्न, इलीबिश, इट, उक्षण्यायन, उरण, उरु:कक्ष, उशीनराणी, ऊर्जव्य, ॠजूनस, ॠज्राश्व, ॠतस्तुभ, एकद्यू, एवावद, ओगणास, औचथ्य और्णवाभ, कद्रुव, कमद्यु, करंज कर्केधु, कलि, कशु, कश्यप, कुणारु, कृष्णिय, कौरयाण, क्रिवि, गांग्य, गोतम, गोपवन, चुमुरि, चैद्य, जातूष्टिर, जाहूष, तरंत, तर्य, तृणस्कंद, त्रित, त्रैतन, दध्यड् , दभीति, दशग्व, दशोणि, दस्यवेवृक, दार्भ्य, दीर्घश्रवस, दु:शीम, देवक-मान्यमान, धुनि, ध्वसंति, ध्वसृ, नमुचि, नवग्व, नार्मर, नार्य, नार्षद, निंदिताश्व, नृषद, पठर्वा, पडगृभि, पणि, परमज्या, परावृज, पाकस्थामन, पारावत, पिठीनस, पिप्रु, पुरुमाय, पुरुमित्र, पुरुमीळह, पुरुषंति, पुष्टिगु, पृथवान, पृदाकुसानु, पृश्निगु, पेदु, प्रपथिन्, बाहुवृक्त, बृसय, भयमान, भृगु, मनस्, मन्धातृ, मुद्रल, मुद्रलानी, मेध, मेना, यजत, रथवीति, रुधिका, रेभ, वत्स, वध्रिमति, वन्दन, वरोसुषामन्, वव्रि, वसुरुच्,वसुरोचिष्, वसूयु, वातरशना, वार्षागिर, विमद, विशिशिप्र, विश्वक, विश्ववार, विश्वसामन्, विष्णापु, वृकद्वरस्, वृषगण, वृषणश्व, वृष्टिहव्य, वैददश्वि, व्यंस, शयु, शर, शरभ, शशीयसी, शिंजार, शिरिंबिठ, शीष्ट, शृंगवृष, शौरदेव्य, श्याव, श्यावाक, श्रुतकक्ष, श्रुतर्य, श्रुतवित्, सदापृण, सध्रि, सप्तगु, सप्तवध्रि, सस, सहदेव, सांवरण, साप्य, सुदक्ष, सुदीति, सुदेव, सुपित्र्य, सुराधस्, सुश्रवस्, सुषामन्, सृबिंद; स्यूमरश्मि, स्वनय, स्वश्न, हरयाण.

वरील विवेचनांत एक गोष्ट गृहीत धरली आहे आणि ती ही कीं सर्वानुक्रमणी हा ग्रंथ प्रामाणिक होय. सर्वानुक्रमणीच्या विश्वसनीयतेवी तपासणी झाली पाहिजे. ती तपासणी व्हावयाची म्हणजे ज्या सूक्तकाराच्या नांवावर विशिष्ट सूक्त पडले असेल ते त्यांनेंच केलें आहे किंवा हें ठरविणें.

आतांपर्यंत दिलेल्या विवेचनावरुन दाशराज्ञ युद्ध हें ॠग्वेदमंत्रांतील अत्यंत जुन्या मंत्रांच्या अगोदर अनेक दशकें किंवा शतकें होऊन गेलें असावें अशी आमची खात्री झाली आहे. जें सूक्त आम्हांस दाशराज्ञ युध्दानंतरचें ठरवितां आलें नाहीं तें युध्दापूर्वीचें आहे असें हि सिद्ध होत नाही. आम्ही आमच्या स्वत:ची खात्री पटवून घेण्याकरितां जो शोध केला तो येथें मांडला आहे, आणि दाशराज्ञ युध्दापूर्वीची एक ओळ तरी ॠग्वेदांत आहे किंवा नाहीं असा संशय आम्ही व्यक्त करतों.

दाशराज्ञ युद्ध हें हिंदुस्थानच्या इतिहासांतील बरेंच उत्तरकालीन वृत होय. म्हणजे वेद हें हिंदुस्थानच्या इतिहासांतील ब-याच उत्तरकालचें वाङमय आहे.