ज्ञानकोशातील तळटीपा पाहणे

ज्ञानकोशात तळटीपा किंवा फुटनोटस असणे हा अपरिहार्य भाग आहे. केतकर ज्ञानकोशात अशा शेकडो तळटीपा आढळतात. संकेतस्थळावर वाचकांना त्या सहजपणे दिसाव्या यासाठी दाखविण्यासाठी Mouse over effect पद्धतीचा उपयोग केला आहे. ही पद्धत समजून घेण्यासाठी खालील प्रयोग करून पहा:


प्रथम प्रस्तावना खंड १ वर क्लीक करा. मग, त्यातील प्रकरण १ उपोद्घात -जगातील स्पर्धा ह्या प्रकरणावर क्लीक करा. ते प्रकरण उघडताच तळाशी दाखवलेल्या पान ६ वर क्लीक करा.
पान ६ वर क्लीक करताच ते पान उघडेल. त्या पानावर एक तळटीप आहे. ती खाली दाखवली आहे.