प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण १० वें.
बुद्धापासून चंद्रगुप्तापर्यंतच्या काळची सामाजिक परिस्थिति.
जातिसंस्था व राजदरबार.- कांहीं महत्त्वाच्या कार्यासाठीं लोकांना आमंत्रण देणें झाल्यास राजा संघवार आमंत्रणें करी. या संघांचे मुख्य पुढारी पैसेवाले असून ते शिष्टांत मोडले जात व दरबारांत त्यांना मान असे असें वर्णन आहे. संघांतील लोकांत पतिपत्नीचीं भांडणें तोडण्याचा अधिकर संघांतल्या पंचांचा असे. संघासंघांत भांडणें उत्पन्न झालीं तर या संघांच्या प्रमुखांवर एक महाप्रमुख असे, त्यानें हीं भांडणें तोडावयाचीं असत. हा महाप्रमुख उत्तरकालीन नगरश्रेष्ठी होय.