प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
परिशिष्ट.
तुर्कांबरोबर दोस्तांचा तह. {kosh ‘लोकसंग्रहां’तील अनुवाद}*{/kosh}
संक्षिप्त गोषवारा.
[तुर्कांबरोबर झालेल्या तहांत समाविष्ट झालेलीं राष्ट्रें-नूतन तुर्कस्तानच्या सीमा-कान्स्टांटिनोपलवरील तुर्कांची सत्ता-दार्दानेल्स, मार्मोराचा समुद्र व बास्फोरस या भागांवर सार्वराष्ट्रीय सत्तेची स्थापना-जलमार्गांवरील सत्ताधिकारी सामुद्रधुनी-कमिशनचें अधिकारक्षेत्र-कमिशनच्या खर्चाची तरतूद व अंमलबजावणीचीं साधनें-कुर्दिस्तानच्या सीमा व त्याला टर्कीनें आज स्थानिक स्वराज्य व पुढें राष्ट्रसंघानें ठरविल्यास पूर्ण स्वातंत्र्य द्यावें अशी अट-ग्रीसला स्मर्ना शहर व त्याच्या भोंवतालचा टापू यांजवर पांच वर्षेंपर्यंत टर्कींच्या नांवानें व त्यानंतर लोकांची तशी इच्छा दिसून आल्यास स्वतःच्या नांवानें राज्य करण्याची परवानगी-जुन्या यूरोपीय टर्कींतील प्रस्तुत तहान्वयें ग्रीसला दिलेला भाग- आर्मिनियास स्वातंत्र्य-सीरिया व मेसापोटेमिया यांस तुर्कांखालून काढून राष्ट्रसंघनियुक्त राष्ट्राच्या पालकत्वाखालीं मर्यादित स्वातंत्र्यदान-पॅलेस्टाइनवरहि तुर्कांच्या ऐवजीं पालकराष्ट्राची सत्ता-हैजाझचें स्वतंत्रीकरण व तेथील राजानें मक्का व मदीना येथें येणार्या मुसुलमान यात्रेकरूंस अडथळा करूं नये अशी अट-टर्कीची इजिप्त, सुएझ कालवा व सायप्रस बेट यांच्यावरील आपल्या हक्कांसंबंधांत सोडचिठ्ठी व ब्रिटिश व इजिप्शन सरकारांमध्यें झालेला ठराव पाळण्याची कबूली-१८८१ पासून ट्यूनिसमध्यें व १९१२ पासून मोरोक्कोमध्यें असलेल्या फ्रेंचांच्या पालकसत्तेस टर्कीची मान्यता-१९१२ च्या तहानें टर्कीकडे राहिल्येल्या लिबियावरील हक्कची सोडचिठ्ठी व यादिकानीज व कास्तेलोरीझो यांवरील हक्कांचें इटलीस दान-टर्कींपासून वियुक्त केलेल्या राष्ट्रांतील प्रजाजनांचें राष्ट्रगोत्र ठरविण्याचे नियम-दोस्तांच्या इतर राष्ट्रांशीं झालेल्या किंवा होणार्या तहांस टर्कीची मान्यता-आपले इतर राष्ट्रांशीं झालेले जुने तह रद्द समजण्याची कबूली-टर्कींतील परकीयविषयक करारबद्ध न्यायपद्धतींत सुधारणा-युद्धांत टर्कीविरुद्ध दोस्तांस ज्यांनीं मदत केली त्या टर्कीं प्रजाजनांस टर्कीकडून माफी-परराष्ट्रांतील मुसुलमानांवरील आपल्या हक्कांची सोडचिठ्ठी-टर्कींकडे ठेवलेल्या मुलखांतील अल्पसंख्याकांच्या जीविताच्या व स्वातंत्र्याच्या संरक्षणाबद्दल टर्कीकडून हमी-युद्धकाळीं झालेल्या टर्कीच्या राज्यांतील अतुर्क लोकांच्या नुकसानीची राष्ट्रसंघनिर्मित पंचमंडळें ठरवितील त्याप्रमाणें टर्कीकडून नुकसानभरपाई-टर्कीस लष्करी पोलीस ३५०००, जादा फौज २०००० व सुलतानाचा लवाजमा ७०० एवढेंच सैन्य ठेवण्याची परवानगी-टर्कीच्या सशस्त्र सैन्यावर दोस्तांच्या कमिशनची हुकमत व लष्करी पोलिसांत तोफखाना वगैरे न ठेवण्याची व परराष्ट्रीय अंमलदार नेमण्याची अट-सशस्त्र सैन्य ५०००० ठेवण्याची परवानगी व दारूगोळा देशांत तयार करण्याची किंवा ठरलेल्या कारखान्यांशिवाय इतर ठिकाणांहून घेण्याची किंवा सांठवून ठेवण्याची बंदी-सामुद्रधुनीच्या किनार्यापासून १२॥ मैलांच्या आंतील किल्ले तटबंदी वगैरेंचा नाश करण्याची अट व या टापूंत कोणत्याहि प्रकारच्या लष्करी कामास बंदी-लढाऊ जहाजें व बिनतारी संदेशवाहक स्टेशनें टर्कीनें दोस्तांच्या हवालीं करणें-स्थलव्यापी अथवा जलगामी आकाशी फौज ठेवण्याची टर्कीस मनाई व दोस्तांच्या अंतरिक्षयानांस टर्कींत हिंडण्याची मुभा- हे ठराव अंमलांत आणण्यासाठीं जीं दोस्तांचीं कमिशनें नेमिलीं जातील त्यांचा खर्च टर्कीनें द्यावयाचा-तुर्कांनीं युद्धकाळांत ज्यांनां कैद केलें त्यांनां स्वखर्चानें ज्याच्या त्याच्या देशीं पोंचवावयाचें व ज्या तुर्क अंमलदारांनीं दोस्त प्रजाजनांस लपवून ठेवल्याचें कमिशन ठरवील त्यांस शिक्षा द्यावयाची-ब्रिटिश, फ्रेंच व इतालियन शिपायांच्या कबरस्थानाच्या जागा कर न घेतां दोस्तांच्या हवालीं करावयाच्या-युद्धाचे कायदे ज्यांनीं मोडले त्यांस दोस्तांचीं लष्करी कोर्टें सांगतील त्या शिक्षा करावयाच्या-टर्कींनें आपल्या राज्यांतील दोस्तांच्या हक्कसंरक्षक मुलुखव्यापी सैन्याचा खर्च व दोस्तांच्या प्रजाजनांची झालेली नुकसानी द्यावयाची, तहांत त्याजकडून काढलेल्या मुलुखांतील तुर्क साम्राज्याच्या किंवा सुलतानाच्या खाजकी मालमत्तेवरील हक्क सोडावयाचा आणि तर्क साम्राज्याचें मागील कर्ज द्यावयाचें-टर्कींच्या जमाबंदीची व्यवस्था दोस्तराष्ट्रांचें जमाबंदी कमिशन लावणार-आयात करांत फेरबद्दल करणें, उपभोगकर बसविणें, जर्मन रेल्वेकंपन्यांची मालमत्ता हस्तगत करणें, इत्यादि जमाबंदीकमिशनचे अधिकार-दोस्तांच्या आकाशयानांस टर्कीच्या जलस्थलप्रदेशावर वाटेल तिकडे जाण्यायेण्याची मुभा व दोस्तांविरुद्ध लढलेल्या राष्ट्रांस त्या गोष्टीची बंदी-दोस्त देशांतून येणार्या व दोस्त देशांत जाणार्या माणसांस, मालास, जहाजांस व आगगाड्यांस तुर्क मुलुखांतून जाण्यायेण्याची पूर्ण मुभा तुर्क राज्यांतून परमुलखांत जाणार्या येणार्या मालावर दोस्तांची देखरेख-कान्स्टांटिनोपलचा कांहीं भाग व हैदरपाशा, स्मर्ना वगैरे सहा बंदरें सार्वराष्ट्रीय समजणें- आगगाडीनें जाणार्या दोस्तांच्या मालास व उतारूंस सवलती-टर्कीपासून विभक्त केलेल्या मुलखांतील लोहमार्गावर चालविण्यास आगगाड्या वगैरे चालता माल ठराविक प्रमाणांत टर्कीच्या संग्रहांतून घ्यावयाचा-दोस्तांच्या टेलिफोन व टेलिग्राफ तारायंत्र व्यवहारास टर्कीच्या राज्यांत मोकळीक-जेद्दा-स्वाकिन व सायप्रस-लाटाकीया या जलगामी तारायंत्रांच्या स्वामित्वाची सोडचिठ्ठी-सदरील कोणत्याहि बाबतींत मतभेद झाल्यास त्याच्या निर्णयाचा हक्क राष्ट्रसंघाकडे-तहावर सही करणार्या राष्ट्रांकडे असलेलें आपलें मागील सर्व घेणें टर्कीनें सोडून द्यावयाचें.]