प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग

प्रकरण २ रें.
विश्वोत्पत्तीपासून असुरराष्ट्रसंस्थापनकालापर्यन्त.

अमेरिकन महावंश.- हा मांगोलियन वंशाचाच एक भाग आहे असें कित्येक धरतात आणि कित्येंक संशोधक यास स्वतंत्र अस्तित्व देतात. त्यांच्या विस्ताराशीं आपणांस सध्यां कर्तव्य नाहीं.