प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग

प्रकरण २ रें.
विश्वोत्पत्तीपासून असुरराष्ट्रसंस्थापनकालापर्यन्त.

 सचेतन जीव व स्फटिक यांची तुलना:- आतां सचेतन एकपेशीमय जीव याच्यामधील सजीवत्व म्हणून समजले जाणारे विशेष गुणधर्म स्फटिकासारख्या निर्जीव वस्तूमध्यें असतात किंवा नाहीं हे दोघांची तुलना करुन पाहूं. सेंद्रिय निरिंद्रियांची अशी तुलना सर्व बाबतींत करतां येण्यासारखी नसली तरी स्फटिक हा निरिंद्रिय पदार्थापैकीं एक अंत्यंत पूर्णत्वास पोहोचलेला पदार्थ असल्यामुळें ही तुलना महत्वाची आहे. सजीव गोलकांतले महत्वाचे गुणधर्म येणेंप्रमाणें असतात: (१) त्यांचा आरंभ सजातीय जीवापासूनच होतो. (२) त्यांना विशिष्ट आकार असून तो कमी अधिक वाटोळा असतो व सरळ सपाट पृष्ठभाग असा नसतो, (३) अनेक पदार्थाच्या - मिश्रणांतून स्वत:ला योग्य असें अन्न निवडून घेण्याची त्यांच्या अंगी शक्ति असते, (४) त्यांना वाढ असते (५) त्याचें नवें द्रव्य स्वत:मध्यें घेऊन जुनें टाकून देण्याचें कार्य चालू असतें, (६) त्यांना गति व संवेदनाशीलता असते, (७) अपत्योत्पादन म्हणजे स्वत:सारखे दुसरे जीव त्यांना निर्माण करतां येतात, (८) पुष्कळ उष्णता लावल्यानें शक्ति नष्ट होते असे बीजकण ते बनवितात, व हे सर्व गुणधर्म लहानमोठया प्रमाणांत स्फटिकामध्येंहि दिसून येतात.

१ एका लहान स्फटिक बिंदूपासून

७ अत्यंत क्षारयुक्त (Super-Satatured) द्रवामध्यें प्रत्येक

 सजीव सृष्टि  
  स्फटिक
 १ मूलारंभकारक बिंदु असतो. 
उदा- गोलक, जीवनरस वगैरे.
  १ एका लहान स्फटिक बिंदूपासूनदुसरे तसेच अनेक  तयार होतात
 २ आकार: वाटोळा.  २ आकार: वाटोळा. उ,- पा-याच्या किंवा तेलाच्या बिंदूसारखा.
  स्फटिकाचा बाह्य भाग सरळ पुष्ठभागांचाच बनलेला असतो, परंतु तसलाच बाहय आकार डायटम (diatoms) व राडिऑलॅरिअ. (Radiolaria) यांच्या गारगोटीसारख्या कवचांच्या सांगाडयांनाहि असतो. जीवनरसापासून तयार झालेले सेंद्रिय सचेतन जीव आणि निरिंद्रिय स्फटिक यांच्यामध्यें सजीव स्फटिक (biocrystals) म्हणून जात आहे. ती जीवनरस आणि निर्जीव द्रव्य यांच्या संयुक्त क्रियेनें  विशिष्ट आकार येऊन बनलेली असते; उदा- स्पंज, पोंवळी इत्यादि पदार्थ बनविणा-या प्राण्यांनीं तयार केलेलीं गारेचीं व खडूचीं वेष्टनें, तसेंच बर्फाच्या स्फटिकांचाच परस्पर विशेष व्यवस्थितपणें संयोग होऊन त्यांना झाडासारखे व फुलासारखे आकार येतात.
 ३ पोषक पदार्थांची निवड करणें.  ३ एकाच जातीच्या द्रव्या-पासून जेव्हां स्फटिक बनलेला असतो. तेव्हां एकाच जातीचे परमाणू एकत्र आकर्षण केले जाऊन तो स्फटिक तयार होतो. परंतु जेव्हां अ, व ब अशा दोन निरनिराळया जातीचे क्षार पाण्यामध्यें जितकें विरघळणे शक्य आहे तितके टाकून ते विरघळल्यावर त्यांत अ द्रव्याचा स्फटिक टाकला तर मूळच्या मिश्रणापैकीं अ द्रव्याचेच स्फटिक बनतात. यावरुन अ क्षाराच्या स्फटिकाची सजातीय द्रव्य ओढून घेण्याची शक्ति दिसून येते. निरनिराळया प्रकारचीं द्रव्यें तळाशीं बसून निरनिराळे स्फटिक बनतात यावरुन हेंच सिद्ध होतें. याच क्रियेला स्फटिकाची निवड करण्याची शक्ति असें म्हणतां येईल.
 ४ बाहेरील द्रव्य शरीराच्या आंत घेऊन स्वत:ची वाढ करण्याची शक्ती असते.  ४ मुळ पदार्थाला बाहेरुन सजातीय द्रव्य जोडलें जाऊन वाढ होते.
  हा जो फरक आहे त्याचें स्पष्टीकरण करणें सोपें आहे. तें असें की, या दोहोंची मूळ रचनाच निराळी असते. परंतु हा फरक अनुल्लंघनीय नसतो. या दोन जातींमध्यें मधल्या दर्जाचे पदार्थ असतात. कांही द्रव्यांचे कोलाईड (Colloid) स्थितींतले प्रतिस्फटिकाचे सूक्ष्म गोंल पिंड क्षाराच्या द्रवामध्यें विरघळून न जातील अशा रीतीनें टांगून ठेवल्यास त्यांना बाहेरुन कण जोडले जाऊन त्यांची वाढ होते.
 ५ नवें द्रव्य शरीरांत घेऊन जुनें बाहेर टाकून देणें.  ५ एका क्षाराचे स्फटिक त्याच क्षाराच्या द्रवामध्यें टाकल्यास ही क्रिया होते. उदा- मोर्चूदाचा एकादा स्फटिक वजन करुन मोर्चूदाच्या संपृक्त द्रावामध्यें टाकल्यास त्यांचे वजन कमजास्त न होतां आकार मात्र बदलतो. याचें कारण त्याच्यामधील कण द्रवांत मिसळत असतात व द्रवांतील स्फटिकाला येऊन मिळत असतात.
 ६ गति व संवेदना असते.  ६ योग्य साधन मिळाल्यास स्फटिकाच्या अणूंना गति येते. परमाणू ठराविक नियमांनुसार ठराविक दिशेने हालचाल करतात व एकत्र होतात असें ठरतें. यावरुन त्यांना संवेदना होतात असें ठरतें; नाहींतर सजातीय परमाणू एकत्र ओढले जाणार नाहींत. स्फटिक बनवण्याची क्रिया चालू असतां इतर सर्व रासायनिक क्रियांप्रमाणें, कांही हालचाल झालेली दिसून येते; आणि त्या हालचालींना संवेदनाशीलतेशिवाय दुसरें कांहींच कारण सांगतां येत नाही. या संवेदनाशीलतेच्या प्रश्नाबदल पुढे स्वतंत्र विवेचन करुं.
 ७ अपत्योत्पादन; गोलकांचे पृथकरण होऊन, किंवा शरीराचे विभाग होऊन व्यक्तींची संख्यावृद्धि होते.

अत्यंत साध्या स्थितींत एका व्यक्तीची प्रमाणाबाहेर वाढ होऊन दुसरी व्यक्ति निर्माण होते.
 ७ अत्यंत क्षारयुक्त (Super-Satatured) द्रवामध्यें प्रत्येक स्फटिकाच्या अणूची ठराविक मर्यादेपर्यंत वाढ होते, व ही मर्यादा त्या अणूच्या रासायनिक घटनेवर अवलंबून असते. या मर्यादेपर्यंत वाढ पोहोंचली म्हणजे मूळ स्फटिकावर दुसरे अनेक    भारीक बारीक स्फटिककण दिसूं लागतात. ग्लोबरसॉल्टच्या (Sodium Sulphate) क्षारयुक्त द्रवामध्यें अशी क्रिया होते असें आस्टवॉल्डनें सप्रयाग दाखविलें आहे.
८ बीजकण तयार होणें व ते उष्णता लावल्यानें जीवनशक्तिहीन होणें. ८ याचप्रमाणें ग्लोबरसॉल्टच्या स्फटिककणांतील पाण्याची वाफ झाल्यावर त्यांची कोरडी पूड होते, पण स्फटिक बनविण्याची त्यांची शक्ति नष्ट होत नाहीं. अशी कोरडी पूड पाण्यामध्यें टाकल्यास नवे पाणीदार स्फटिक तयार होतात; परंतु याच पुडीच्या कणांना पुष्कळ उष्णता दिली तर मात्र ही त्यांची शक्ति नाहींशी होते.