प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग
प्रकरण ५ वें.
वेदकालांतील शब्दसृष्टि.
स्वर्गविषयक
स्वर्गनामें [ॠग्वेद]
आमेन्य (चोहोंकडून मोजण्यास योग्य; अंतरिक्ष वि. |
त्रिविष्टि | पृश्नि |
१दिव् | लोक | |
दिवावसु (द्यु) | विष्टप् | |
दिवोजस् | साप्त्य | |
गो | द्यवि | ३स्वर् |
जीवलोक तुग्र (आदित्य) | द्यु | स्वर्णर (सूर्यलोक) |
त्रिदिव | नभस् | स्वर्पति |
त्रिनाक | २नाक | स्वर्मीह्ळ |
[तै.सं.] | ||
दिव् | नभस् | लोक |
द्यवि | नाक | सुवर्ग |
द्यु | पृश्नि | स्वर् |
[अथर्व] |
४ पीलुमती
१दिव् :- याचा अर्थ आकाश असा आहे. सर्व विश्वाची विभागणी करुन त्याचे पृथ्वी, अंतरिक्ष व स्वर्ग किंवा दिव असे तीन भाग ॠग्वेदांत कल्पिले आहेत. किंवा विकल्पानें द्यावापृथिवी (स्वर्ग व मृत्युलोक) म्हणजे सर्व विश्व अशीहि वांटणी केलेली आढळते. कारण अंतरिक्षाचा अंतर्भाव आकाशांत झालेला आहे. विद्युत् पवन व पर्जन्य यांचा संबंध अंतरिक्षाशीं येतो, व सूर्यचंद्रांचें परिभ्रमण वगैरे चमत्कार आकाशांत समाविष्ट होतात. अथर्ववेद व वाजसनेयी संहिता यांमध्यें आकाशाची कमान (नाक) पृथ्वि, अंतरिक्ष व दिव या तिन्ही नंतर व 'स्व:' 'ज्योति:' च्या पूर्वी चवथा भाग म्हणून धरली आहे. या विश्वाची तीन त-हेची विभागणी पृथ्वी, वायू व आकाश हीं जी तीन महातत्वें आहेत त्यांत प्रतिबिंबित झाली आहे. उदाहरणार्थ सर्वांत श्रेष्ठ (उत्तम) मध्यम (उत्तर) व सर्वांत कमी प्रतीचा (पार्थ) अशी स्वर्गाची वांटणी ॠग्वेदांत (५.६०,६;४.२६,६;६.४०,५.) केलेली आढळतें. अथर्ववेदांत तीन त-हेचे स्वर्ग आहेत. उदन्वती, पीलुमती (याचा अर्थ अनिश्चित आहे) व प्रद्यौस् (या ठिकाणीं पितर राहतात). स्वर्गाला वारंवार व्योमन् व रोचन (तेज: पुंज आकाश) अशीं नांवे दिलेली आहेत. उत्तम स्वर्ग व दृश्य स्वर्ग यांनां विभागणा-या आकाशाला 'नाक' या शब्दाशिवाय 'सानु' विष्टप, पृष्ठ, नाकपृष्ठ, किंवा नाकसानु हीं नावें ॠग्वेदांत आलेलीं आहेत. कधीं तीन आकाशांचा (रजस्) व कधी दोहोंचाहि उल्लेख आला आहे. परंतु ही विभागणी कृत्रिम वाटते. एके ठिकाणी 'षड्रजांसि' असा उल्लेख आला आहे व त्याचा अर्थ स्वर्ग व पृथ्वी मिळून असा आहे. आकाशाला नेहमीचें नांव अंतरिक्ष असें आहे. पृथ्वीचे जे तीन प्रकार कल्पिले आहेत ते सुद्धां कृत्रिम आहेत. व या तिघांचें मूळ ज्याप्रमाणें पितरौ हा शब्द आई व बाप दर्शवितो त्याप्रमाणें सर्व विश्वाचे तीन विभाग दर्शविण्याकरितां पृथिवीचा जो अनेकवचनीं प्रयोग करण्यांत येतो त्या प्रयोगांत बहुत करुन असावें. पृथिवीला क्षा, ग्मा अशीं नांवें आहेत व तिला मही, पृथिवी, उर्वी, उत्तमा अशीं विशेषणेंहि आहेत. त्याचप्रमाणें 'इदं' -हें जग, अशा अर्थानें स्वर्गाशी नेहमी तुलना केलेली आढळते. पृथ्वीच्या आकाराची तुलना ॠग्वेदांत चकाशीं केलेली आहे व ती वाटोळी आहे असें शतपथ ब्राह्मणांत स्पष्ट म्हटलें आहे. पृथ्वी व स्वर्ग जर एकत्र जोडली तर ती दोन पेले (चम्पा) एकावर एक ठेवल्याप्रमाणें दिसतील अशी कल्पना ॠग्वेदांत आढळते. ऐतरेथ आरण्यकांत (३.१,२) पृथ्वी व स्वर्ग हीं अर्ध्या अंडयाप्रमाणें आहेत असें म्हटलें आहे. स्वर्गापासून पृथ्वीचें अंतर किती आहे हें दाखविण्यासाठीं अथर्ववेदांत 'सूर्यपक्ष्याला पृथ्वीपासून स्वर्गाला जाण्यास एक हजार दिवस लागतात असा उल्लेख आहे. ऐतरेय ब्राह्मणांत (२.१७) 'एका घोडयाला एक हजार दिवस लागतील, असें म्हटले असून पंचविशब्राह्मणांत (१६.८,६) 'एकीवर एक अशा हजार गाई उभ्या केल्या असतां जितकी उंची होईल, तितकें अंतर पृथ्वी व स्वर्ग यांमध्यें आहे' असा उल्लेख आहे. झिमरच्या मतें वैदिक ॠषींनां 'पृथ्वीच्यावर आकाशाचा एकच भाग आहे व पृथ्वीच्या खालीं एकच भाग आहे' अशी कल्पना होती. पण झिमरची दुसरी जी कल्पना आहे तिजबद्ल बळकट पुरावा नाहीं. ऐतरेय ब्राह्मणांत (३.४४) असें तत्व प्रतिपादन केलें आहे कीं सूर्य आपलें प्रकाशमय अंग रात्रीं फक्त उलट बाजूला फिरवितो व त्यामुळें त्याचा प्रकाश चंद्र व तारे यांच्यावर पडतो व हें करीत असतांना तो आपला पूर्वेकडील भाग पुन: आक्रमीत असतो. ॠग्वेदांतहि (१.११५,५) हेंच मत प्रतिपादिलें आहे. वैदिक वाङ्मयांत पृथ्वीची भूगोलदृष्टया विभागणी केलेली नाही. जैमिनीय उपनिषद् ब्राह्मणांत 'पृथ्वीचा मध्यबिंदु प्लक्षप्राश्रवणाच्या उत्तरेस आहे व आकाशाचें केद्र म्हणजे सप्तर्षि (ॠक्ष) नक्षत्र होय' असा उल्लेख आहे.
२नाक.- ॠग्वेदांत व मागाहून झालेल्या अथर्ववेद, वाजसनेयी संहिता वगैरे ग्रंथांत ज्याला नभोमंडल असें म्हणतां येईल अशा अर्थानें हा शब्द आला आहे. हा शब्द नेहमी 'उत्तम' अथवा 'तृतीय' या शब्दाबरोबर येतो. यावरुन असें अनुमान निघतें कीं ज्याप्रमाणें दिव्, पृथिवी व अंतरिक्ष अशी विभागणी आहे त्याच प्रमाणें स्वर्गाचीही तीन विभागांत वाटणी केलेली आहे. नाक हें आकाशाच्या रोचनावर व तिस-या पृष्ठावर आहे. इतर ठिकाणीं पृथ्वी, अंतरिक्ष, आकाश, नाक, स्वर्, ज्योतिस् असा क्रम आलेला आहे. ब्राह्मण ग्रंथांत (पं. विं.ब्र्रा. १०.१,१८) नाक याचें 'न + अक= जेथें दु.ख नाही तें स्थान' असें सपष्टीकरण केलें आहे. कारण अशी कल्पना आहे की तेथें जे लोक जातात त्यांनां तेथें दु:खाचा त्रास पोचत नाही.
३स्वर.- ॠग्वेद व मागाहून झालेल्या ग्रंथांत सूर्य व प्रकाशमय स्वर्ग असा याचा अर्थ आहे.
४पीलुमती.- अथर्ववेदांत उदन्वती व प्रद्यौ: यांच्यामधील स्वर्ग या अर्थानें हा शब्द आला आहे. याचा अर्थ ज्यांत 'पीलु (परमाणु) भरपूर आहेत' असा आहे.