प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग

प्रकरण ५ वें.
वेदकालांतील शब्दसृष्टि. 

सामनामें ( तै. सं. )

सामनामें ( तै. सं.) स्तुति करणें (ऋग्वेद) /
स्तुतिनामें (ऋग्वेद) / स्तोमनामें

धी -- धी म्हणजे विचार. ऋग्वेदांमध्यें बरेच वेळा गायकाची प्रार्थना अथवा स्तुतिसूक्त असा अर्थ दर्शविण्याकरितां या शब्द आलेला आहे. एक कवि आपण एक अशी प्रार्थना विणतो असें स्वत:विषयीं म्हणतो व दुसरा एक कवि आपल्या प्राचीन व पूर्वजकृत सूक्ताचा उल्लेख करतो व त्या सूक्ताचा उपयोग व्हावा म्हणून त्यावर मखलाशी करतो.
धीति -- ऋग्वेदांत अनेक ठिकाणीं याचा अर्थ धी प्रमाणें जवळ जवळ प्रार्थना किंवा स्तुतिसूक्त असा आलेला आहे.
नीथ -- हा नपुंसकलिंगी शब्द असून ह्याचा अर्थ गाण्याची त-हा व नंतर स्तुति सूक्त असा आहे. नीथा हें स्त्रीलिंगी रूप ऋग्वेदांत आलेंलें असून त्याचा अर्थ शक्कल किंवा कसब असा आहे.
मंत्र -- ( मन् म्हणजे विचार करणें या धातूपासून ) याचा ऋग्वेदांत व उत्तरकालीन ग्रंथांत असा अर्थ आहे की ऋचा ही गाणाराच्या कल्पक अथवा उत्पादक बिचाराचा परिणाम होंय. ब्राह्मण ग्रंथांतून याचा अर्थ गद्यांत किंवा पद्यांत ऋषींचे उद्गार असा आहे. यांत नुसत्या काव्य भागाचाच समावेश केला नसून अगदीं जुनाट अशा लेखनपद्धतींने युक्त अशा गद्य भागाचाहि समावेश केला आहे.
स्तुति -- ऋग्वेद व तदुत्तर झालेलें ग्रंथ ह्यामध्यें 'स्तुतिपर गाणें' अशा अर्थानें हा शब्द आहे.
स्तोम -- ऋग्वेदामध्यें स्तुतियुक्त गाणें अशा अर्थानें हा शब्द आलेला आहे. उत्तरकालीन ग्रंथांत ज्या स्वरूपांत स्तोत्रें गाइलीं जातात तें स्वरूप् असा ह्याचा विशिष्ट अर्थ झाला.
नाराशंसी -- ( नर-स्तुतीपर मंत्र ) हा शब्द ऋग्वेदापासूनच आलेला आहे व मागाहून झालेल्या वाङमयात गाथाहून निराळा आहे असें अनेक ठिकाणच्या उल्लेखावरून दिसतें. काठक संहितेंमध्यें हे जरी निराळे शब्द आले आहेत असें म्हटलें आहे, तरी हे दोन्ही शब्द अगदीं खोटे आहेत. (अनृतं) असें म्हटलें आहे. हे शब्द निराळें असणें हें शक्य नाहीं. कारण तैत्तिरीय ब्राह्मणांत 'नाराशंसी गाथा' असे शब्द आलेलें आहेत. हें गाथा श्लोक कसे होते हें शांखायन श्रौतसूत्रावरून दिसून येईल. कारण जे पुरूषमेधाच्या वेळचे नाराशंसी श्लोक सांगितलेलें आहेत तेच श्लोक महाभारताचें मूलभूत गणतां येतील. नाराशंसी शब्द कांहीं ठिकाणीं अथर्ववेदांतील तीन श्लोकानांच लाविलेला आहे. पण हा संकुचित अर्थ ऋग्वेदांत स्वीकारण्याचें कारण नाहीं असें जें ओल्डेनबर्ग म्हणतो तें रास्त दिसतें. तैत्तिरीय संहितेंत सुद्धां हा संकुचित अर्थ निश्चित नाहीं, व वृहद्देवतेंत तर ह्या शब्दाला सामान्य अर्थच आहे.
शतरूद्रिय अथवा शतरूद्रीय -- शतरूद्रासंबंधीं असलेंलें सूक्त. हें यजुर्वेदांतील एका भागांचे नांव आहे. ह्यांत रूद्र देवतेची शंभर प्रकारांनी त्याचें अनेक गुण वर्णन करून स्तुति केलेली आहे.
शस्त्र -- उद्रात्याच्या स्तोत्राच्या नंतर होत्याच्या पाठ म्हणण्याला हा विशिष्ट शब्द लावलेला आहे. देवतेला सकाळीं दिल्या जाणा-या उपायनाचें वेळीं जीं शस्त्रें म्हणावयाची त्यानां आज्य व प्रउग असें म्हणतात. दुपारच्या वेळीं म्हणावयाच्या शस्त्रांस मरूत्वतीय व निष्केवल्य असें आणि संध्याकाळच्या वेळीं म्हणावयाच्या शस्त्रांनां वैश्वदेव व आग्नि मारूत अशीं नांवे आलेंली आहेत.
१०सूक्त -- ( चांगले बोललेंलें ) उत्तरकालीन संहिता ग्रंथ व ब्राह्मण ग्रंथ ह्यांमध्ये शस्त्राचा भाग म्हणून सूक्त ह्या अर्थी हा शब्द आलेला आहे. ऋग्वेदांमध्यें अनेक ठिकाणीं याचा सूक्त हाच अर्थ अभिप्रेत आहे.
११स्तोत्र -- याज्येप्रमाणें शस्त्र ह्याचा अर्थ होता, व त्याचे मदतगार यांनी गावयाचे मंत्र असा होतो, त्याचप्रमाणें स्तोत्र याचा अर्थ उद्राता व ऋत्विज ह्यांची गाणीं असा आहे. ह्या शब्दाचा विशिष्ट अर्थ मागाहून झालेलें संहिता व ब्राह्मण ग्रंथ हयांमध्ये आलेला आहें.