प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग

प्रकरण ५ वें.
वेदकालांतील शब्दसृष्टि.              

शत्रु

शत्रुनामें (ॠग्वेद)

दुःशासु- हा शब्द बहुतेककरून ॠग्वेदांत विशेषनाम म्हणून आला असावा व नंतर त्याचा कुरुश्रवणाचा शत्रु असा अर्थ होत असावा. लुडविगचे असें मत आहे कीं तो परशु किंवा पर्शियन असावा परंतु हें अगदी अशक्य आहे. या शब्दाचा अर्थ दुस-याचें वाईट पाहणारा  व वाईट करणारा असा असावा.
निगुत- ॠग्वेदांत दोन वेळ हा शब्द आला असून सायणमतानें त्याचा अर्थ शत्रु असा आहे व तो संभवनीय आहे. लुडविग म्हणतो कीं हे शत्रू अनार्य लोक असावेत.
३सपत्न- ॠग्वेदांतील दहाव्या मण्डलांत हा शब्द आहे आणि तो सापत्नी (सवत) या पासून झाला असून पुढील वाङ्मयांत तो पुल्लिंगी (सपत्नी) जास्त आढळतो.