प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग

प्रकरण ५ वें.
वेदकालांतील शब्दसृष्टि. 

स्तोतृनामें [ ऋग्वेद ]

 अर्किन्  धियंधस्  रध्र
 आभु  धियायु  रूद्र
 आसाव  धीरण  रेभ
 उक्थशंसिन्  धीवत्    वक्मराजसत्य
 ऋक्काण   नग्न  वनद
 कारू  नद  विनद
 कीरि  नाद  विनंगृस
 कीस्त  नामन्   विप्र
 कुभन्यु  निवचन  विवक्कत्
 कृपण्यु  पनितृ  वृषस्तुप्
 क्रवण   पृच    वेधस्
 गातु  ब्रह्मा   
 गायत्रिन्  भंदिष्ट  शशमान
 गीर  मनान  सूरि
 गृणत्  मनायु  स्तवान
 गो  मंद्र  स्तामु
 छंदस्  मेधिर  स्तुप्
 छंदस्तुभ   येमान  स्तोतृ
 जरितृ  रण्यवाच्  होतृ
   अथर्ववेद
  अर्क  जरितृ  
  कीरि    देवयु     रेभ

                                                 
कारू ( कवि ) -- कारू हा शब्द बहुतेक ऋग्वेदांतच आहें. कारू हा वैद्यासारखा धंदेवाला ( भिषज् ) असे अशाबद्दल आधार आहें. कवी हें श्रीमंत व्यापा-यांची स्तुति करीत असत तरी ते राजे लोकांच्या आश्रितांमध्येंच मुख्यत्वेंकरून रहात असत. उपाध्याय आणि कारू यांच्यात विशेष संबंध कांहीच नव्हता. उपाध्याय हा जरी बहुधा कवि असें तरी कविता करणें उपाध्यायमंडळाकडेच असें नाहीं अश्वमेधाचें वेळी स्तुतिपाठकांपैकी एक गाणारा राजन्य असला पाहिजें आणि दुसरा ब्राह्मण असून त्यानें (स्वत:ला विहित असलेंलें ) स्वकवन म्हटलें पाहीजे असें शतपथ ब्राह्मणांत स्पष्ट लिहिलें आहें. पुष्कळ ठिकाणीं ऋग्वेद अनुक्रमणी ऋग्वेदांतील ऋचाचें कतृत्व राजांकडे देते; आणि ज्या पद्धतीने किंवा रीतींने शूद्रक मृच्छकटिकाचा कर्ता झाला आहे, अथवा हर्ष रत्नावलीचा झाला आहे, आणि कोठे ब्राह्मणांचे गुरू राजेहि आहेत तीच रीत अनुक्रमणीत चालू असली तरी हिंदी अब्राह्म कवी होते यांत काहींच आश्चर्य वाटत नाहीं.
जरितृ -- सीगच्या मतानें ऋग्वेदांच्या एका सुक्तांत जरितृचा उल्लेख शार्ड्गापैकी एक म्हणून आलेला आहें; व त्याची हें सूक्त व महाभारतांतील कथा यांची सांगड घालण्याची खटपट आहें. महाभारतांत अशी कथा आहें की, मंदपाल ऋषीने शार्ड्ग पक्षिणींशीं-कटकाशीं-लग्न लाविलें व इच्यापासून त्याला चार मुलें झाली. हीं मुलें जेव्हा त्यानें टाकून दिलीं व अरण्यांत अग्नीने भस्म होऊन जाण्याचा जेव्हां त्या मुलांनां प्रसंग आला तेव्हां त्यांनी ऋग्वेदांत दिलेल्या ( १०.१४२ ) स्तोत्राने अग्नीची स्तुति केली. हा अर्थ बराच संशयास्पद आहे पण तो सायणाचार्यास संमत आहें.
विप्र -- ऋग्वेद व उत्तरकालीन ग्रंथ यांमध्यें विप्=कांपणे या धातूपासून हा शब्द निघालेला असून त्याचा अर्थ प्रेरणा झालेला गवई असा आहे. उत्तरकालीन ग्रंथांत याचा अर्थ विशेषत: विद्वान् ब्राह्मण असा आहे. महाभारतांत याचा अर्थ नुसता ब्राह्मण असा आहें.
सूरि -- ऋग्वेदांमध्यें हा शब्द यज्ञ करणारा मनुष्य या अर्थी नेहमीचं उपयोगांत आणला आहे व यालाच पुढें यजमान म्हणजे यज्ञ करणा-या उपाध्यायाला दक्षिणा देऊन त्या यज्ञाचें पुण्य संपादन करणारा असा गृहस्थ म्हणूं लागलें. सूरि याचें नांव मघवन् बरोबर योध्दा या नात्यानें आलेलें आहे व त्याचा संबंध उपध्यायाचा आश्रयदाता किंवा मित्र म्हणून वर्णिलेला आहें.
स्तोतृ -- ऋग्वेदांमध्यें व उत्तरकालीन ग्रंथांत स्तुति करणारा असा याचा अर्थ आहें. मघवन् किंवा सूरि या आश्रयदात्यांच्या नांवासंबंधानें हा शब्द वारंवार आलेला आहें. कांही ठिकाणी याचा अर्थ ' स्तोतृभ्य:- ऋत्विगुभ्य: ' 'स्तोता-यजमान' असाहि घेतलेला आहें.