प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग

प्रकरण ५ वें.
वेदकालांतील शब्दसृष्टि. 

दळणवळण किरकोळ (तै.सं.)

 अनोवाह्य  आत (सतत  वाहून नेले
  (गाडयातून  गमन साधन)  जाणारें धान्य)
 वाहून नेलें  शीर्षहार्य  सेतु
 जाणारें धान्य)  (डोक्यावर

वाद्यें

 वाद्यें (ॠग्वेद)

आघाटि- ‘करताळ, झांज’ या वाद्यांचा उपयोग नृत्याच्या वेळीं करीत. ॠग्वेद आणि अथर्ववेद यांतहि ह्यांचा उल्लेख आहे. सायणमतानें आघाटि याचा कांडवीणा असा अर्थ होतो.
कर्करि- ॠग्वेदांत व अंतर हा शब्द ‘वीणा’ ह्या अर्थी उपयोगांत आणिला आहे. मैत्रायणी संहितेंत गुरांच्या कानावर वीण्यासारख्या खुणा केल्या असत असें उल्लेखलें आहे. असें मॅकडोनेल म्हणतो. परंतु मूळांत खुणांचा उल्लेख आहे वीणेच्या आकाराचा नाही.
गर्गर- ॠग्वेदात हें एका वाद्याचें नांव आहे.
गोधा - ‘धनुर्ज्या’ असा ॠग्वेदांत एका ठिकाणीं याचा अर्थ आहे परंतु दुसरीकडेहि असावा असें मॅकडोनेल म्हणतो. रॉथ देखील अथर्व वेदातील ह्या शब्दाचा अर्थ तोच करितो. ॠ. १०. २८, १० व १०.२८ ११ या दोन ठिकाणीं येणा-या “गोधा” शब्दाचा अर्थ सायणानें आपल्या भाष्यांत “गायत्री” असा दिला आहे. ग्रिफिथ व आधुनिक अनेक पंडित यांनी वरील ॠचाचा केलेला अर्थ व सायणाने केलेला अर्थ यांत जमीन अस्मानाचे अंतर आहे. ग्रिफिथ, वादी असा अर्थ करितो. ॠ.८.६९.९ या ठिकाणी गोधा शब्दाचा अर्थ हस्तघ्नः म्हणजे हातानें वाजविण्याचें वा असा (सायणमतें) अर्थ आहे. अथर्ववेद ४.३, ६या ठिकाणीं गोधा याचा एक प्रकारचा प्राणी (घोरपड, पाल यासारख्या) असा दिसतो. गोधा यांचा धनुर्ज्या असा अर्थ मुळीच निघत नाहीं.  ॠग्वेदांत एका ठिकाणी (८.६९,८) रॉथ आणि हिलेब्रँट यांनी वाद्य असा अर्थ केला आहे. गोधा शब्दाचा मूळ अर्थ धनुष्याच्या दोरी पासून हातास इजा होऊ नये म्हणून डाव्या हातास बाधलेलें कातडी वेष्टन. सायणवरील अर्थ घेतो (गोधा हस्तघ्नः) याचा अर्थ मागाहून एक प्रकारचें वाद्य असाहि रूढ दिसतो.
दुंदुभि - हा ध्वन्यनुकारी शब्द असून याचा अर्थ पडघम असा आहे. व त्याचा उपयोग लढाईचे व शांतेतेचे वेळी करावयाचा असे. हा शब्द ॠग्वेद व तदुत्तर ग्रंथांत आलेला आहे. भूमिदुंदुभि नावाचा एक विशिष्ट प्रकारचा पडघम पूर्वी होता. तो असा कीं, जमीनींत एक खड्डा करून त्यावर एक कातडें पसरावयाचें. अशा त-हेचा पडघम महाव्रत नावाच्या एका यागाचे वेळीं दक्षिणायनात सूर्य परत फिरण्याच्या समयास जीं विघ्नें येतील तीं निवारण्यास उपयोगात आणिला जात असे. पुरुषमेधाचे वेळीं जे बळी दिले जात असत त्यापैकी पडघम वाजविणारा हा एक आहे. (महाव्रतातील दुंदुभिवादन सूर्याच्या परत फिरण्यांस बंधी आहे हा अर्थ सायणसंमत नव्हे नाही) शांखायन सूत्रांत १७१४,११) दुंदुभि बैलाच्या शेपटीनें वाजवीत असतसें दिसतें. त्याठिकाणीं भूमिदुंदुभि असें म्हटले आहे. ऐतरेय आरण्यकातल्या (५,१,५) भाष्यात सायणाचार्य आपस्तम्ब श्रौतसूत्रांतील दुंदुभिवरील उतारा देतात तो असा अंतर्वेदि व बहिर्वेदी याच्या मय, एक खड्डा खणून, त्यावर ओले कातडें, केसाळ बाजू वर करून खुंट्यानी बसवितात, त्याजवळ मारण्या (वाजविण्या)करिता पुच्छकाड ठेवितात. अथर्व ५-२०, १ यात दुंदुभि लाकडाच असून तो कातडयाच्या पटयांनी बांधलेला असे असें वर्णन आहे.
नाळी- ह्याचा अर्थ ॠग्वेदामध्यें त्याच प्रमाणें काठक संहितेमध्यें वेताची बनवलेली तुतारी असा आहे. काठक संहितेमध्यें एका ठिकाणीं तूणव ह्या शब्दाबरोबर हा शब्द आलेला सायणभाष्यात याठिकाणी नाळी  च अर्थ वाद्यवीणा, वेणु किंवा स्तुतिरूप वाणी असा केला आहे.
बकुर- हा शब्द ॠग्वेदाच्या एका ॠचेंत आला आहे. तेथे अश्विनांनी दरयूंविरुद्ध आर्यासाठी बकुर वाजवून उजेड पाडला असा उल्लेख येतो, निरुक्ताप्रमाणें याचा अर्थ वज्र. परंतु रॉथ प्रमाणें वाजविलेली वस्तू; एखादे वाद्य असावे. व हा अर्थ बराचसा बरोबर वाटतो. सायणाचार्य या ठिकाणी बकुर याचा अर्थ वज्र असा घेतात पण ग्रिफिथ तुतारी असा अर्थ करतो.
यास्क बकुर याचा अर्थ ‘ज्योति’ किंवा ‘उदक’ असा करतो, वज्र असा अर्थ करीत नाहीं.
बाकुर- दृतीचे हें विशेषण ॠग्वेदाच्या एका वनचांत आले आहे. या शब्दाचा सामासिक अर्थ “एक प्रकारचें वाद्य” असा होतो. ॠग्वेद  ९.१,८ या ठिकाणी सायणाचार्य बाकुरं दृति म्हणजे तेजस्वी (बाकुर) व ढगाच्या रंगाचा (सोम) असा अर्थ करितात.
वाण- ॠग्वेद व अथर्ववेद ह्यामध्यें सें.पी. कोशांत दिलेल्या अर्थाप्रमाणे वाद्यावरचे गाणे असा याचा अर्थ होतो. पण मागाहून झालेल्या संहिता व ब्राह्मण ग्रंथांत शंभर तारा असलेलें (शततंतु) व महाव्रताचे वेळीं वाजविले जाणारें तंतुवाद्य किंवा सारंगी असा अर्थ आहे. ॠग्वेदामध्यें (१०.३२,४) या सारंगीच्या सप्त स्वराचा (धातूंचा) उल्लेख आलेला आहे. ह्या सप्त स्वरांना (आपण जर वृत्तासंबंधी अर्थ न घेतला तर) इतर ठिकाणीं वाणीं असें म्हटलें आहे सायणाचार्य वाण याचा अर्थ ‘शंभर ताराची एक प्रकारची वीणा’ असा करितात. याला भरद्वीणा असेही म्हटलेले आहे. सप्तधातुः वाणस्य या ठिकाणी सप्तधातूचा अर्थ सात स्वर, सात छंद, सात ऋतू किंवा सात होते असा घेतला आहे. व वाण चा अर्थ स्तुति किंवा वाद्य असा घेतात. अथर्व(१०,२,१७) याला सायणाचे भाष्य नाही. पंडिताच्या प्रतीत वाण असा शब्द आहे. वाण याचा अर्थ ते वाणी असा घेतात. ऐतरेय ब्राह्मणांत वाणमौदुम्बरं शततन्तुम् असें म्हटले आहे. म्हणजे वाण हे उदुंबराच्या झाडाचें बनवीत असावेत.
१०वाणीची- ॠग्वेदांत एका ॠचेंत हा शब्द आलेला आहे. सें.पी. कोशामध्ये ह्याचा अर्थ वाद्य असा आहे.
११तुणव- ॠग्वेदोत्तर संहिता व ब्राह्मण ग्रंथांत ह्याचा अर्थ वाजविण्याचें लाकडी वाद्य, बहुतकरून मुरली असा आहे. पुरुषमेधामध्यें जे बळी दिले जातात त्यामध्यें मुरली वाजविणारा हाहि एक आहे. तैत्तिरीयसंहितेत ‘तूणव’ याचा अर्थ वेणु असा सायणानें केला आहे. कीथ याचा अर्थ मुरली असा करतो. तैत्तिरीय ब्राह्मण (३.४,१५,१) यांत ‘तूणवध्म’ म्हणजे वाद्य वाजविणारा किंवा तोंडानें शीळ वाजविणारा असा अर्थ केला आहे. निरुक्तात ‘तूणव’ म्हणजे मृग असा अर्थ घेतला आहे.
१२भूमिदुंदुभि- जमीनीचा नगारा- महाव्रतविधीच्या वेळीं एक खाच चामडयाने बंद करीत व त्याचा नगारा करीत. हा शब्द संहिता व ब्राह्मणग्रंथांतून आला आहे.
१३वीणा- ॠग्वेदोत्तर संहिता ग्रंथ व ब्राह्मण ग्रंथ ह्यांत याचा अर्थ वीणा असा आहे. यजुर्वेदामध्यें पुरुषमेधाच्या वेळी बळी दिले जाणा-याच्या यादींत वीणा-वाद (वीणा वाजविणारा) ह्याचें नांव आलेले आहे. वीणा शब्दाचा इतरत्रहि उल्लेख आलेला आहे. ऐतरेय आरण्यकांत ह्या वाद्यावर केसाळ कातडे (एकेकाळी) पसरले जात असे असें म्हटलें असून ह्याचे निरनिराळे भाग वर्णिले आहेत. उदाहरणार्थ, शिरस् उदर, अंभृण, तंत्र (तार) वादन वगैरे. शतपथ ब्राह्मणात उत्तरमंद्रा ह्याचा अर्थ एक प्रकारचा स्वर किंवा वीणा असा आहे. शांखायन श्रौतसूत्रांत (१७.३,१) शततंतु वीणेचे वर्णन आहे तें असेः- त्या वीणेला पलाशाची मूना (खुंटी) असते, उदुंबराचा दाडा असतो, बैलाचें कातडें केंसासहित गुंडाळतात, दाडयाला दहा भोकें पाडून प्रत्येक भोकांतून दहा दहा तारा ओंवतात व त्या तारा वेगवेगळया ठिकाणी बसवितात, पानासहित वेतसाची शाखा वाजविण्याकरिता ठेवतात. ऐतरेय आरण्यक ३.२५ या ठिकाणीं मनुष्याचें शरीर हें वीणा कल्पून त्याची व वीणेची तुलना दाखविली आहे.
१४वेणु- तैत्तिरीय संहिता, अथर्ववेद व उत्तरकालीन ग्रंथ ह्यांत वेत किंवा बांबू अशा अर्थानें हा शब्द आलेला आहे. तैत्तिरीय संहितेमध्ये तो पोकळ (सुपिर) आहे असें वर्णन आहे. ॠग्वेदांत दानस्तुतीमध्ये वालखिल्य सूक्तात एकदा हा शब्द आलेला आहे. रॉथ ह्या ठिकाणीं त्याचा अर्थ वेताची बासरी असा करतो. हाच अर्थ पुढील ग्रंथांत वेणूचा आला आहे.  कौषीतकी ब्राह्मणात वेणु व सस्य यांना एके ठिकाणीं उल्लेखिलें आहे व ते वसंत ॠतूंत पक्व होतात असें म्हटलें आहे. बहुतकरून बांबूंची झाडे असा याचा अर्थ असावा.
१५द्रुवय- ‘लांकडाचें वाद्य’ अशा अर्थानें अथर्ववेदांत पडघमाचे विशेषण म्हणून हा शब्द आलेला आहे.
१६नाडीका- अथर्ववेदामध्ये एकदां हा शब्द आलेला असून ह्याचा अर्थ अलगुज असा स्पष्ट आहे व त्या वेदांत वेताच्या बनविलेल्या बाणाच्या टोकाचाहि संबंध आहे.
१७आडम्बर- एक प्रकारचे ढोलकें. वाजसनेयि संहितेंत पुरुषमेधाचे बळींची जी यादी आहे त्यांत आडम्बराघात याचा उल्लेख आहे.
१८काण्डवीणा- काठक संहिताते महाव्रताच्या वेळीं उपयोग करीत असलेलें वेतस पर्वन्पासून केलेले वीणेसारखें तंतुवाद्य अस लिहिलें आहे. काडवीणा वेतसशाखेनें वाजवावयाची असते. या वाणेला वादनकार टरी असें म्हणतात (शाखायन त्रौतसूत्र १७.३,१४-१५)
१९बेकुरा- हा शब्द पंचविश ब्राह्मणांत येतो. व तेथे यांचा अर्थ ‘आवाज’ किंवा ‘ध्वनि’ असा होतो. हाच अर्थ मैघंटुकांत दिला आहे. हा बहुधा बकुराप्रमाणें एकाद्या वाद्याचा द्योतक शब्द असावा. तैत्तिरीय आणि काटक संहितातून बेकुरि आणि वेकुरि हे शब्द स्वर्गीय वारांगना किंवा अप्सरा यांनां मंजुळ या अर्थी विशेषणें म्हणून वापरलें आहेत. वाजसनेयि संहिता आणि शतपथ ब्राह्मण यांत भाकुरि आणि भकुरि असे शब्द आढळतात. निरुक्तांत (२.२३) वाङ्नामांच्या यादींत हा शब्द आलेला आहे. बेकुरयः म्हणजे चंद्रमा गंधर्वाच्या भार्याचीं नांवे, असा तैत्तिरीय संहितेंत भाष्यांत अर्थ घेतला आहे. त्याचा तेथे सायण ध्वनीशीं संबंध लावीत नाहीं. त्याचप्रमाणें शतपथ ब्राह्मणात चन्द्रमा गंधर्वाच्या स्त्रिया जीं नक्षत्रें त्यांनां भेकुरी किंवा भाकुरी (प्रकाशमान्) असें नांव आहे.
२०लंबन- कण्वशाखीय बृहदारण्यकोपनिषदामध्यें हा पाठ आहे व तो पाठ माध्यंदिन शास्त्रीय आडंबर (डमरू) बद्दल आलेला आहे. कांही प्रतींत या ठिकाणीं लंबन असा शब्द नसून लंबर असा आहे.
२१वादन- ऐतरेय आरण्यकांत एका तंतुवाद्यचा एक भाग असा अर्थ होतो. ‘वादन’ हा तंतुवाद्यचा भाग नसून वादन म्हणजे ‘वाजविण्याची क्रिया’ असा अर्थ सायण करतो.
२२वादित- छांदोग्यउपनिषदामध्यें हा गीतवाटित गाणेंबजावणें ह्या समासांत व कौषीतकी ब्राह्मणांत नृत्य ह्या शब्दाबरोबर (एकटाच) गाणे व नाच या अर्थी आला आहे.