प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण ६ वें
यावद्वीप संस्कृति.
छंदःशास्त्र.- जावा येथील वाङ्मयाचें भारतीयत्व दाखविणारी एक गोष्ट म्हटली म्हणजे त्यांचें छंदःशास्त्र होय. त्यांच्या वाङ्मयामध्यें अनेक महत्त्वाच्या कल्पनांस व्यक्त करण्यासाठीं संस्कृत शब्द शिरले आणि संस्कृत ग्रंथांचीं भाषांतरें व संस्कृत धर्तीवर वाङ्मय करावयाच्या प्रयत्नाबरोबर भारतीय वृत्तें देखील जावामध्यें जाणें अगदीं साहजिकच होतें. छंदःशास्त्रावर त्यांच्यांत ग्रंथ झाले आहेत. त्यांच्या छंदःशास्त्रावरील ग्रंथामध्यें अजरपिकतन्, अजिकेनांग इत्यादि प्रमुख आहेत. यांपैकीं पहिल्या ग्रंथांत जुरंगदनु, मनुक, अभ, वसि, तमतम, कदिरि, पंजीमार्ग, देमुंग, वसेंग, पांकुर, सिमोम, इस्वि, तंजुंग इत्यादि उत्तरकालीन वृत्तांचें विवेचन केलें आहे. याशिवाय गिनाद इत्यादि वृत्तांत अनेक ग्रंथ आहेत. नागरकृतागम काव्यांत अनेक वृत्तें आलीं आहेत त्या वृत्तांच्या नांवावरून आणि लक्षणांवरून त्यांत भारतीय वृत्तें किती आहेत आणि नवीन वृत्तें तेथें कशीं तयार झालीं याची कल्पना येईल. नागरकृतागमांतील (३.१) एका शार्दूलविक्रीडिताचें उदाहरण घेऊं.
तिक्वन् भक्ति सिरान् मकेबु रिसिला श्रीराजपत्नीश्वरी।
सत्यानूतब्रत पक्ष सोगत ससंस्कारे दगन्संग्पिजाः||
तंसाः श्रीकृतवर्धनेश्वरपिता दे श्रीनरेंद्राधिप ।
सेदंपत्यपगेः सिरेंग्सुगतमार्ग्गांग्देसुकानिंग्जगत् || १ ||
शार्दूलविक्रीडित - म, स, ज, स, त, त, ग. {kosh अन्त्य वर्ण गुरू किंवा लघु कोणताहि असला तरी चालतो.}*{/kosh}
कृतिसूर्त - म, स, ज, स, त, त, ग ग.
अत्यष्टिसूर्त - म, स, ज, स, य, ल, ग.
धृतिसूर्त - म, स, ज, स, ज, ल, ल, ग.
अतिधृतिसूर्त - म, स, ज, स, न, न, ग.
जगद्धित - म, स, ज, स, न, न, र, ल, ग.
अभिकृतिसूर्त - म, स, ज, स, न, न, र, न, ग.
सुवदना - म, र, भ, न, य, भ, ल, ग.
स्त्रग्धरा - म, र, भ, न, य, य, य.
अतिजगतीसूर्त - म, भ, न, म, ग.
मन्दाक्रान्ता - म, भ, न, त, त, ग, ग.
वसन्ततिलका - त, भ, ज, ज, ग, ग.
कृतिसूर्त - त, भ, ज, भ, ज, भ, ल, ग.
संकृतिसूर्त - ज, स, ज, स, ज, स, ज, स.
पृथ्वी - ज, स, ज, स, य, ल, ग.
विकृतिसूर्त - ज, स, ज, स, न, न, र, ल, ग.
विकृतिसूर्त - त, न, स, ज, स, न, न, ग.
कृतिसूर्त - त, न, त, न, त, न, ग, ग.
प्रहर्षिणी - म, न, ज, र, ग.
स्वागता - र, न, भ, ग, ग.
वंशपत्रपतित - भ, र, न, भ, न, ल, ग.
मद्रक - भ, ज, न, र, न, र, न, ग.
कृतिसूर्त - भ, भ, भ, न, ज, ज, ल, ग.
शिखरिणी - य, म, न, स, भ, ल, ग.
भुजंगप्रयात - य, य, य, य.
वंशस्थ - ज, त, ज, र.
तोटक - स, स, स, स.
आर्यगतीसूर्त - स, स, न, न, ग.
कृतिसूर्त - स, न, ज, न, भ, स.
विलासिनी- न, ज, भ, ज, भ, ल, ग.
आकृतिसूर्त - न, ज, भ, ज, भ, ज, त, ग.
अश्वललित - न, ज, भ, ज, भ, ज, भ, ल, ग.
धृतिसूर्त - न, ज, भ, ज, न, स.
संस्कृतिसूर्त - न, ज, भ, ज, न, स, ज, स.
नर्कुटक, रजनी - न, ज, भ, ज, ज, ल, ग.
अभिनवतामरस - न, ज, ज, य.
हरिणी - न, स, म, र, स, ल, ग.
महामालिका - न, न, र, र, र, र.
विपुलवक्त्रा - य, स, ग, ग। ग्ल, ल्ग, ग, ग, ल, ग, ल, ग.
विपुलवक्त्रा - स, स, ग, ल । ग्ल, ग, ग, ल, ल, न, ल, ल.
जावा येथें आपलें वैद्यक कितपत प्रसार पावलें हें कळत नाहीं. तेथील वैद्यकांसंबंधानें फारच थोडी माहिती मिळते. ब्रँडीसच्या यादीमध्यें ‘अंदा’ नांवाच्या देवीच्या उपचारासंबंधीं ग्रंथ सांपडतो.
भारतीय कामशास्त्राचा थोडाबहुत प्रसार तेथें झालासें दिसतें. “अंगुलिप्रवेश” नांवाचा एक अश्लील ग्रंथ ऋषि संबिन्न याच्या नांवानें प्रसिद्ध आहे. स्त्रियांशीं प्रेम करण्यास सुरवात कशी करावी हें यांत सांगितलें आहे.
कलाकौशल्यावर ग्रंथ निरनिराळे असतील असें दिसतें. अजिअष्टकोशली नांवाचा अनेक कौशल्यशिल्पांवर ग्रंथ यादींत सांपडतो. मुलगेलढाऊपणावर देखील वाङ्मय जावांत अवतीर्ण झालें आहे. ‘अविगाविग’ नांवाच्या गद्य ग्रंथांत वीरसिंग नामक देशांत चालू असलेले मुरगे लढविण्यासंबंधाचे नियम दिले आहेत. याच विषयावर दुसरें एक पुस्तक पस्वर या नांवाचें आहे. शिवाय हत्यारें, आउतें यांचा उपयोग सांगणार्या ग्रंथाचें अस्तित्वहि दिसून येतें. अशा एका ग्रंथाचें नांव ‘पंगे लिंगे लिंग पदर्तन इ तरू’ असें आहे.
यवद्वीपाच्या इतिहासास सुरुवात करण्यापूर्वीं तेथील कांहीं स्थलनामांची ओळख करून घेणें अवश्य आहे ; आणि ती करून घेतल्यास जावांतील सध्यांच्या मुसुलमानांच्या पूर्वजांविषयीं आपणांस आपलेपण खास अधिक वाटेल म्हणून तीं येथें देतों.
अन्तःपुर, अन्तरशशी, अन्यवसुधा, अमृतवर्द्धनी, अमृतसभा, अयोद्यापुर, आधिराज्य, आर्य्य, ईशानबज्र, ईश्वरगृह, कण्डववन (खाण्डववन), कण्डिः, कमलपण्डक, कमलसन, कर्णातक, कविरि, कांचि, कांचीपुरी, काम्पर, काम्पुद, कांपे, काम्बोज, कुटराज, कुटिजाती, कुटिपंकज, कुटिरत्नपंकज, कुटिसंग्ग्रह, कुमुद, कुलनन्दन, कुलुर, कुवराह, केट, केतकी, गुन्तुर, गुरुंग्गुरुंग, गुहा, गृहस्थधर, चण्डिलिम, चण्डिबुङ्कल, चम्पा, जग, जगद्धित, जंग्गाल, जम्बल, जम्बुद्वीप, जय, जयकृत, जयमनलु, जयमुक, जयशिका, जलगिरि, जवजब, जाति, जातिगुम्लर, जाम्बि, जालधिप, जीवन, जोयानबज्र, डुरी, तजुंगा नगर, तण्डर, तथागतपुर-(गृहस्थधर), तरुण, तलध्वज, ताम्पकडुरी, ताल, तिक्तबिल्व, तिक्तमालूर, तिक्तश्रीफल, तिमूर, तीर, त्वस वासिष्ठ, दह, देवरमे, धर्म्मनगरी, नदी, नन्दनवन, नन्दिनगर, नशोर, नीलकुसुम, नैरंजना, न्युदन्त, पंकज, पंचर, पंचासर, पडलि, पलब्धि, पाण्डकन, पाण्डवाद्रि, पूर्वनागर, प्रज्ञापारमितापुरी, बकुलपुर, बज्रक, बज्रपुर, बज्रलक्ष्मी, बज्रासन, बलितर, बालि, बुडुर, बुद्धाधिष्ठान, बुद्धिकुञ्चिर, बोधिमूल, भीम, मयपहित, मदकरीपुर, मधुर, मन्दर, मरूत्म, मेरु, यवन, यानत्रयराजधान्य, रंग्गपुर, रतिमन्मथाश्रम, रत्न, रत्नपंकज, राजपुर, लोचनपुर, वत्सरि, वनाश्रम जेनर, विजयवक्र, विपुलाराम, विल्वतिक्त, विशेषपुर विष्णुवाल, विहार, विहारबाहु, वृषभपुर, वेशपुरी, वैशपुरी, व्वतन, शिलापेटक, शिलाभंगो, शिलाहृत्, शुचि, शूरबाण (शूरभाण), शोभ, श्रीफलतिक्त, श्रीरंग्गपुर, षड्-विहार, सगडा, सगल, समीची, समुद्र, समुद्रवेला, साक्षक, सागर, साम्बक, सिंधनगरी, सिद्ध, सिद्धयात्र, सीम, सुकलील, सुकविजय, सुगतासन, सुष्ट, सुरभ, सुरभय, सुरयश, सूंब, हरशालन, हरिनन्दन, हरिभवन, हिमवान्, हुजुंग् मेदिनी इ.