प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण ११ वें.
बाह्यांचा हिंदुस्थानावर परिणाम.
वेदकालीन व मूलगृहकालीन नाट्यकला.- लिओपोल्ड फॉन श्रोडर यानें Mesterium und mimus im Rigveda (Leipzic १908) या ग्रंथांत वेदकालीन नाट्यकलेवर विवेचन करून मूलगृहकालीं नाट्यादि मनोरंजन साधनें काय होतीं याविषयीं तौलनिक पद्धति वापरून आपले विचार प्रदर्शित केले आहे. मूलगृहकालीन नाट्यपद्धति शोधण्यासाठीं त्यानें ऋग्वेदांत दिसून येणारे नाट्यविषयक उल्लेख गोळा केले आहेत.
ऋग्वेदांत संभाषणात्मक सूक्तें अनेक आहेत. त्यांपैकीं बर्याच सूक्तांचा संपूर्ण अर्थ समजत नाहीं. या प्रकारच्या सूक्तांबद्दल बर्याच कल्पना प्रगट झाल्या आहेत. ओल्डेनबर्ग म्हणतो कीं, ही सुक्तें म्हणजे मूळ गद्यपद्यात्मक आख्यानें असावींत आणि त्या आख्यानांतून गद्य नष्ट झालें असावें. आज या संभाषणात्मक गाण्यांवर ब्राह्मण ग्रंथावरून प्रकाश पडतो. हीं गाणीं एड्ड {kosh ‘एड’ ह्या संज्ञेबद्दल भाषाशास्त्रज्ञांचा बराच मतभेद आहे. प्राचीन पंरपरेप्रमाणें सदरहु नांव, स्कँडिनेव्हिया देशांतील अतिप्राचीन अशा देवादिकांच्या काव्यमय कथांनां दिलें जातें. मुख्यतः ‘एड्ड’ या संज्ञेनें दर्शविले जाणारे असे सध्यां दोन ग्रंथ आढळतात. यांपैकीं ‘प्राचीन कथासंग्रह’ (Elder Edda) ह्यांतील बर्याच कथा नॉर्वे व स्कँडिनेव्हिया देशांतील अतिप्राचीन परिस्थिति दाखवितांत. खरें पाहतां ‘एड्ड’ हें नांव पूर्वींपासून ‘गद्य कथासंग्रह’ (Prose Edda) या कथासंग्रहास दिलेलें आढळतें.}*{/kosh} {kosh “प्राचीन काव्यकथासंग्रह” (Elder Edda) हा इ.स. १६४३ पर्यंत उपलब्धच नव्हता. ब्रिंजोल्फ् स्विन्सन् (Brynjulf Sweinsson) यास प्रथम हा संग्रह हस्तगत झाला. नॉर्वे देशाच्या राजघराण्यांतील सेमंड् सिग्फ्यूसन् (Saemund Sigfusson) नामक गृहस्थानें सदरहु कथा संकलित केल्या असल्याबद्दल दंतकथा आहे. ह्या संग्रहांतील कित्येक काव्यें फारच प्राचीन असून एकंदर काव्यांची रचना १० व्या ११ व्या शतकाच्या सुमारास झाली असल्याचा फार संभव दिसतो.}*{/kosh} {kosh वरील काव्यसंग्रहांतील विषयांचें वर्गीकरण दोन प्रकारें करता येईलः (१) पौराणिक दंतकथा व (२) शूर पुरूषांच्या आख्यायिका. (Heroic Poems). पैकीं पौराणिक दंतकथांमध्यें मुख्यत्वेंकरून ओडीन् (Odin) व थॉर (Thor) या दोन देवतांची अचाट कृत्यें वर्णन केलीं आहेत-ऋग्वेदांतील ‘बृहस्पति’ अथवा “ब्रह्मणस्पति” या देवतेशीं ‘ओडिन्’ या देवतेचें निकट साम्य आहे. त्याचप्रमाणें थॉर व त्याचा अजस्त्र दैवी हातोडा (Hammer) ऋग्वेदांतील इंद्र व त्याचें वज्र याच्याशीं सदृश दिसतो. याखेरीज वरील देवतेचे कित्येक शत्रू असल्याचें वर्णन आहे त्यांत ‘बाल्डर्’ (Balder) हा सर्व देवांशीं वारंवार युद्ध करणारा व सरतेशेवटीं पराभव पावलेला असा बलाढ्य दैत्य असून त्याचें ऋग्वेदांतील वृत्रासुलाशीं बरेंच साधर्म्य आढळतें. एकंदर सर्व काव्यें अनेक उपदेशपर कथांनीं युक्त आहेत. त्या सर्वांचें तात्पर्य पाहिलें तर वाईट कृत्यें कधींहि परिणामीं सुखदायक न होतां अतिशय नाशकारक होतात हेंच आहे. पौराणिक दंतकथां (Mythical poems) मध्यें पहिली कविता ‘व्होलप्सा’ (Volupsa) नांवाची असून तिच्यांत एकंदर जगाच्या आरंभापासून देव, दैत्य मानव इत्यादिकांचें चटकदार वर्णन आहे. दुसरी कविता ‘हॅवॅमेल्’ नामक असून तींत एकंदर मानवी प्राण्यानीं या जगांत कशा रीतीनें वागावें, कीर्ति कशी मिळवावी, तरुणांनीं कसें वागावें, इत्यादि विविध विषयांवर काव्यमय चुटके आहेत. तिसर्या कवितेंत ‘ओडिन्’ देवाचें एका दैत्याबरोबर मानसिक शक्तीबद्दल युद्ध होऊन दैत्याचा पराभव झाल्याबद्दलचें वर्णन आहे. नंतरच्या काव्यांत ‘ओडिन्’ व थॉर् यांचें ज्ञान व अचाट शक्ति यांजसाठीं युद्ध झाल्याचें वर्णन आहे. एकंदर कवितांच्या शेवट बाल्डर् (Balder) याच्या स्वप्नमय जीविताच्या वर्णनानें झाला आहे. (२) ‘शूरांच्या कथा’ (Heroic Poems) यांमध्यें इतिहास व त्या वेळची परिस्थिति यांबद्दल बरेच उल्लेख आढळतात.}*{/kosh} {kosh “गद्यकथासंग्रह” (Younger or Prose Edda) हाच एका ग्रंथ लोकांस कांहीं दिवस ‘एड्ड’ या नांवानें माहीत होता. कारण ‘काव्यकथासंग्रह’ (Elder Edda) हा बरेच दिवस म्हणजे सुमारें १७ व्या शतकापर्यंत उपलब्धच नव्हता. गद्यकथासंग्रह हा ग्रंथ आयस्लंड (Iceland) मधील ‘स्नोरी स्टर्लसन्’ या प्रसिद्ध पुरुषानें लिहिला. सदरहू गाथांची काव्यमय भाषा जरी जुनी असली तरी तीमध्यें एक प्रकारचें गांभीर्य व प्रसाद हे गुण असून वाचकाच्या मनावर तेव्हांच परिणाम करितात. या संग्रहांतील एकंदर विषयांचे तीन भाग पाडले तर पहिला व दुसरा भाग हे पुढील भागाची प्रस्तावनाच आहेत असें म्हणण्यास हरकत नाहीं. सदरहू ग्रंथांत प्रथम जगाची उत्पत्ति, नंतर देवांचें सुवर्णयुग, व नंतर ‘प्रपंचवृक्ष’ (Yggdrasil) ह्या सर्वांचें उत्तम वर्णन आहे. यानंतर नरकाचें व दैत्यांचें वर्णन असून पुढें बाल्डरचा (Balder) मृत्यू, ‘लॉकी’ (Loki) देवतेचें कारागृहांत पतन व सरतेशेवटीं देवांचें युद्ध व विश्वाची पुनश्च उभारणी असें वर्णन आहे. हें सर्व वर्णन संवादरूपानें केलेलें आहे. सदरहु ग्रंथ कर्त्यानें इ. स. १२२० चे सुमारास लिहिला असल्याचें निश्चित आहे.}*{/kosh} * (Edda) नामक नॉर्स गाण्यासारखीं आहेत. यांस ओल्डेनबर्ग आख्यानें समजतो. त्याप्रमाणें कार्ल गेल्डनर आणि रिचर्ड पिशल हेही समजतात. फरक एवढाच कीं, गेल्डनर आणि रिचर्ड पिशल हेहि समजतात. फरक एवढाच कीं, गेल्डनर इतिहास हें नांव आख्यान याऐवजीं पसंत करतो. श्रोडर संवादात्मक गाणीं हीं आख्यानावशेष न समजतां नाटकावशेष समजतो. सिल्व्हँ लेवी हा भारतीय नाट्यचा आरंभ हींच संवादात्मक गाणीं होत असें म्हणतो. वेदकालीं नाट्यकलाच लोकपरिचित होती असें श्रोडर समजतो. ओल्डेनबर्गचें स्पष्टीकरण चुकीचें आहे असें योहन्नेस हेरटल (Johnnes Hertel) यानें आपल्या ‘भारतीय नाट्यकलेचा इतिहास’ {kosh Der Ursprung des Indischen Dramas und Espos. Wiener Zeitschrift für die Kunde des Morgenlandes, Vol. XVIII (१904) Heft १-2, p. 59-83, १37-१68}*{/kosh} या महत्त्वाच्या निबंधांत दाखविलें आहे. ब्यूलर असें म्हणतो कीं, हे संवाद अनेक लोक मिळून गात असत.