प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग

प्रकरण ५ वें.
वेदकालांतील शब्दसृष्टि.  

रज्जुनामें (ॠग्वेद)

 कक्ष्य (अश्वोदर बंधन रज्जु)  दामन्  रज्या
 निष्षिध  ५रशना
 ज्याका  ३पाश  रश्मि
 १तन्ति (दीर्घप्रसाद रिता रज्जु)  मुक्षीजा (जाळे)  वयस्र्
 योक्त्र  ६वरत्रा
 त्रिविष्टिधातु  योग्या  संदान
 (तिपेडी दोरी)  रज्जु  स्यूमन्
(तै.सं.)
 मेखला  १०रास्ना

तन्ति- ॠग्वेदामध्यें एके ठिकाणीं हा शब्द आलेला आहे. व त्याचा अर्थ रॉथ हा अनेकवचनी प्रयोगी ‘वासरांच्या रांगा’ असा करतो. पण ह्या शब्दाचा पुढें झालेल्या ग्रंथांत ज्या अर्थानें उपयोग केलेला आहे तो अर्थ म्हणजे   दो-या किंवा वासरांस बांधण्याकरितां दावी हा ॠग्वेदांत सुध्दां घेणें बरें.
दामन्- ह्याचा अर्थ दोर किंवा मेखला असा आहे व हा शब्द ॠग्वेद व पुढील ग्रंथ ह्यांत अनेकदां आलेला आहे. यज्ञांतल्या घोडयाच्या दो-याविषयी त्याचप्रमाणें वासरांनां दोरीने बांधण्याच्या प्रघातांविषयी उल्लेख आलेला आहे. शतपथ ब्राह्मणांत घोडयाच्या केसांचा झुबका अशा अर्थानें हा शब्द आलेला आहे.
पाश- ॠग्वेद व तदुत्तर ग्रंथ यांत बांधून आवळण्याकरितां उपयोगी पडणारा दोर असा ह्याचा अर्थ आहे. दोर व ग्रंथि ह्यांचा एकत्र संबंध अथर्ववेदामध्यें आलेला आहे. शतपथ ब्राह्मणांत पाश हा शब्द ज्याच्या योगानें मनुच्या जहाजाला पर्वताशीं बांधिलें होते त्या दोराला लाविला आहे. लक्षणेनें वरुणाच्या पाशाला हा शब्द वारंवार लावलेला आढळून येतो.
योक्त्र- ॠग्वेदांत आणि नंतर गाडीला किंवा रथाला जुंपण्याच्या चमडयाच्या वाद्या असा याचा अर्थ आहे.
रशना- दोर किंवा दोरी या अर्थी ॠग्वेदांत घोडे बांधण्याकरितां म्हणून याचा उपयोग केला जात असे म्हणून लिहिलें आहे. पण एका उता-यांत ‘शीर्षण्या रशना’ लगाम असे अर्थ होत नाहीं. कांही उता-यांत पट्टे असा अर्थ ध्वनित होतो. कांही मध्यें पट्टे आणि लगान हे दोन्हीहि अर्थ ध्वनित होतात. इतरत्र साधारण दोर हा अर्थ निघतो.
वरत्रा- ॠग्वेदामध्यें व पुढें ह्याचा अर्थ वादी किंवा दोरी असा आहे. ह्याचा उपयोग बैल जुंला बांधावयांस किंवा कदाचित जूं दांडयाला बांधावयास होत होता. किंवा विहिरींतून (अवत) पाणी काढण्याकरितां उपयोगांत आणलेली दोरी असाहि ह्याचा अर्थ होतो.
संदान- ॠग्वेदांत व मागाहून झालेले ग्रंथ ह्यांमध्यें दोर, काढणी किंवा  बेडी या अर्थानें ह शब्द आलेला आहे.
स्यूमन्- ॠग्वेदामध्यें एके ठिकाणीं रॉथच्या मतानें घराचा दरवाजा घट्ट आवळणारी दोरी असा आहे.
मेखला- नंतरच्या संहितेंत आणि ब्राह्मणांत कंबरेचा पट्टा या अर्थी, अथवा ब्रह्मचा-यानें कमरेस बांधावयाची दोरी अशा अर्थी हा शब्द आला आहे.
१०रास्ना- यजुर्वेद संहितेंत आणि शतपथ ब्राह्मणांत कम्मरपट्टा किंवा दोरी या अर्थी; रशना आणि रश्मीप्रमाणें हा शब्द येतो.