प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग

प्रकरण ५ वें.
वेदकालांतील शब्दसृष्टि.

युद्धवस्तु

 कवचनामें ( ऋग्वेद )
 अंसत्र ( खांद्याचें रक्षण करणारें )  अय:शीर्षन्  ३द्रापि ( चिलखत, झगा )
 अयोहनु
 अंसत्रकोश  खादि  बिल्म ( शिरस्त्राण )
 १अत्क   ( हस्तत्राण )   ४वर्मन्
 अयोदंष्ट्र  खृगल
 अय:शिप्र  ( तनुत्राण )

  वरील शब्द कांहीं विशेष अर्थाचा बोध करणारे असावेत असें समजून येथें घेतलें आहेत. टीकाकारांच्या मते यांतील कांही देवतांची विशेषणें असून त्यांनी लाक्षणिक अर्थानें तीं घेतलीं आहेत.

अत्क -- ऋग्वेदांतील दोन उता-यांवरून रॉथ, ग्रासमन व लुडविग हे हा शब्द विशेषनाम आहे असें समजतात. परंतु झिमर हा ह्या उता-यांत योघ्याचें चिलखत असा अर्थ करितो. पिशेल म्हणतो दोनहि ठिकाणीं त्याचा कु-हाड हाच अर्थ आहे.
खादि -- ऋग्वेदांत हा शब्द फार वेळ आढळतो. सायणभाष्यांत याचा बाहुसंरक्षण ( खादि: = हस्तत्राण: ) असा अर्थ आहे. मॅकडोनेल्च्या मतानें याचा बाहुसंरक्षण, बाहुभूषण, आंगठीं, पैंजण असा अर्थ होतो.
द्रापि -- ऋग्वेद व पुढील ग्रंथांत येणा-या या शब्दाचा मॅकडोनेल्च्या मतें झगा असा अर्थ आहे. सायणाचार्य याचा कवच ( चिलखत ) असा अर्थ करितात. परंतु दोहोंपैकीं निश्चित अर्थ कोणता हें सांगतां येत नाहीं.
वर्मन् -- ऋग्वेद व मागाहूनचें ग्रंथ यांत चिखलत अशा अर्थानें हा शब्द आला आहे. हें चिलखत कोणत्या वस्तूचें करीत असत हें अनिश्चित आहे. स्यूत या शब्दाबद्दल अनेक वेळां उल्लेख आला आहे. त्यावरून हिरोडॉटसनें म्हटलप्रमाणें तागाच्या कापडांची बनविलेलीं चिलखतें लोक वापरीत असत असें वाटतें. पण पुढें अयस्, लोह, किंवा रजत यांच्या चिलखताचाहि उल्लेख आहे. परंतु त्यावर विश्वास किती ठेवावा हा प्रश्न आहे. तथापि, ती लोखंडाचीं किंवा लोखंडानें आच्छादिलेल्या कातडयाची असावीत असें वाटतें.