प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग

प्रकरण ५ वें.
वेदकालांतील शब्दसृष्टि. 

उदक
उदकनामें [ॠग्वेद]

 उदकनामें [ॠग्वेद]

तूर्णाश.- ॠग्वेदांत त्याचा अर्थ पर्वतांतील प्रवाह असा आहेसें वाटतें.

वार्.-ॠग्वेद व मागाहून झालेले ग्रंथ ह्यांत 'पाणी' ह्या अर्थानें हा शब्द आलेला आहे. कांही ठिकाणीं 'सांचलेलें पाणी' 'तळें' असाहि ह्याचा अर्थ होतो.

शाप.-ॠग्वेद व मागाहून झालेले ग्रंथ ह्यांत ह्याचा अर्थ पाण्याच्या प्रवाहाबरोबर वहात आलेली वस्तु म्हणजे बहुतकरुन पाण्याचा 'शाप' असा आहे. ॠ.१०.२८,४ या ठिकाणीं सायण शाप याचा अर्थ उदक असा करतात.

सरस् -ॠग्वेद, मागाहून झालेले संहिताग्रंथ व ब्राह्मणग्रंथ ह्यांमध्यें सरोवर अशा अर्थानें हा शब्द आलेला आहे.