प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग

प्रकरण ५ वें.
वेदकालांतील शब्दसृष्टि.     

उष्णता.
किरणनामें [ॠग्वेद]

 अक्षिति (सूर्यरश्मि)  १तेजस्  वसु
 अभीषु *   दीधिति  शव
 असिर  द्योतन  सप्तर्षि
 उस्त्र  भानु  साध्य
 किरण *  मयूख  सुवर्ण
 खेदि *   २मरीचिप  स्वयुग्वन् (स्वयं- युक्त)
 गभस्ति o  ३रश्मि *
 गो *o  वन  स्वर्द्दश
 * ही खूण असलेलीं नांवे घोडयाच्या लगामाचींहि आहेत.
 o ही खूण असलेले शब्द वेदांत आहेत कीं नाहींत याबद्ल देवराज यज्वा ह्यांनीं संशय प्रदर्शित केला आहे.

                                
तेजस्.-श्रोडरच्या मतें ॠग्वेदांत याचा विशिष्ट अर्थ कु-हाड असा आहे, पण सर्व ठिकाणीं देवाचें वज्र असा अर्थ ठीक जुळतो. ॠ.६.१५,९९ या ठिकाणीं तेजस् या शब्दाचा 'तेजोयुक्तता' असा सायणांनीं अर्थ केला आहे व तो ग्रिफिथलाहि मान्य आहे.

मरीचिप.- वेबरच्या मतें याचा अर्थ तेज:परमाणु किंवा चकाकणारे अणुरेणु असा आहे. मरीचीचा त्याच्यामतें प्रकाशकिरणाच्या उलटहि अर्थ आहे. हा अर्थ ॠग्वेदांत आधींच्या उता-यांतून चांगला लागू पडतो. परंतु प्रकाशकिरण हा अर्थ उपनिषदांत अगदी स्पष्टपणें आढळतो. अर्थात् तेथें जुना अर्थहि कांही ठिकाणीं अभिप्रेत आहे.

रश्मि.-ॠग्वेदांत आणि नंतरच्या ग्रंथांत सूर्याचे किरण या अर्थानें हा शब्द आला आहे.

 तेजोवाचक [ॠग्वेद]
 तेजोविशेषणें [अथर्ववेद] /  (तेजस्वी) कियापदें [अथर्ववेद] / 
 ज्वालानामें [ॠग्वेद] / जाळणें (कियापदें) [ॠग्वेद]