प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग
प्रकरण ६ वें
ब्राह्मण्याचा इतिहास
प्रवरांची निवड करण्याचें स्वातंत्र्य कमी करण्याचा प्रयत्न - प्रवर ऊर्फ आर्पेय ही संस्था विशिष्ट ॠषींच्या स्थानी स्थित केली. ही क्रिया आपणांस सूत्रात दिसते. प्रथमतः प्रवरण वाटेल त्यानें करूं नये म्हणून मान्य झालेल्या व्यक्तींनींच प्रवरण करावें आणि तेंच उत्तर कालीनानी स्वीकारावे असा प्रयत्न झाला. म्हणजे व्यक्तीच्या इच्छेनुसार प्रवराची निवड होण्याची क्रिया बंद पडली असें झाले. न दैवःमनुष्यः आर्पेयं वृणे ते ॠषिभिरेव आर्पेयंवृणीते हें वाक्य सूत्रकार श्रृति म्हणून सांगतात. पण कोठल्या श्रृतीतील असेल ते असो ॠषींसच आर्पेय वरणाचा मक्ता कां द्यांवा तर देवांनां यजमान ॠषीमार्फतच ओळखतो म्हणून (आर्पेयम अन्याचटे ॠपिगा हि देवाः पुरुपमनुवुव्यन्त इति)
येणें प्रमाणें व्यक्तीचें वरणस्वातंत्र्य नष्ट करण्याची खटपट झाली तिची स्मारकें आपणांस दिसतात.
एकानें उत्पादिलेला संप्रदाय दुस-यानें घेतल्यामुळें घेणाराहि प्रवरात मोडे ही गोष्ट बरेच काल लोक विसरले नव्हतें. प्रवरामध्यें अनेक ॠषींची नांवे येतात. त्यांचे महत्त्व कात्यायन व लौणाक्षि येणेप्रमाणें सांगतात.
‘पूर्वःप्रवरःउत्पादांयतुःउत्तरःप्रतिग्रहीतुः॥ म्हणजे पहिला प्रवर उत्पादकाचा होय आणि दुसरा क्रियेचें अगर धर्माचे प्रतिग्रहण करणा-याचा होय.
या वाक्यावरून कात्यायन व लौणाक्षि यांची प्रवर हे संप्रदाय होते अशीच कल्पना दिसते.
क्षत्रियांनां हा यज्ञधर्म द्यावयाचा तर त्यांनां देखील प्रवरसंस्था पाहिजे. ते यज्ञ कसे करणार तर जसे जुने राजे करीत त्या संप्रदायाप्रमाणेंच आम्हां करतां असें त्यांनीं म्हणावे किंवा त्यांनी पुरोहिताचेच प्रवर घ्यावे. कारण राजा पुरोहीत सांगेल तसे करणार. आणि पुरोहित आपल्या प्रवरांप्रमाणे करणार. काय करणार यांत पुढें तरी फारसा फरक नाही पण आपल्या जुन्या संप्रदायाचा अभिमान म्हणून आपल्या पूर्वपरंपरेतील लोकांची नांवे घ्यावयाची एवढेंच. क्षत्रियांना प्रवर दिले ते मनु. ऐल, पुरूरवा हे होत (अथ क्षत्रिपाणां व्यार्पेयो मानपैड फैरूरवसेति) ज्यांना आपली परंपरा माहीत नाहीं त्यांनी (म्हणजे यज्ञ धर्म सामान्य झाल्यानंतर जे कोणत्याहि संप्रदायांत नसतील त्यांनी) पुरोहिताचे किंवा आचार्याचे प्रवर घ्यावे.