प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग (उत्तर भाग)
परिशिष्ट.
तिसरें अंग, ठाणांग. - ह्यांपैकीं ''ठाणांग'' हें तिसरें अंग होय. बौद्ध ''अंगुत्तर निकाय'' या ग्रंथांतल्याप्रमाणें ह्या जैन ग्रंथांतहि दहा ह्या जैन ग्रंथांतहि दहा ह्या संख्याक्रमाने पुष्कळसे धार्मिक विषय विवेचिले गेले आहेत. ह्या यादींत कित्येक ठिकाणीं गूढ अशा उपमा आढळून येतात. उदाहरणार्थ, 'पाटक (पेटी) किंवा उपदेशक याचे चार प्रकार असतात; मत्स्य किंवा याचक यांचेहि चारच प्रकार असतात; त्याचप्रमाणें कदुक व मनुष्यांचेहि चार असतात. '' ही उपमा पहा ह्या अंगामध्यें एके ठिकाणी ''दिठ्ठिबाय'' नामक नष्टप्राय झालेल्या धर्मांगाची विषयवार यादी आली आहे. ती फार महत्त्वाची आहे.