प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग (उत्तर भाग)

परिशिष्ट.

चवथें अंग, समवायांग.र्‍यानंतरचें चौथे अंग समवायांग हें असून ह्याच्या दोनतृतीयांश भागात ठाणांगा' प्रमाणेंच विषयवारी आली आहे. फक्त भेद इतकाच कीं ह्या विषयवारीची संख्या १०० वर नेली आहे. या ग्रंथाचा शेवटचा एक तृतीयांश भाग मागाहून जोडलेला दिसत असून त्यामध्ये सर्व बारा अंगांचे विषय व विस्तार ह्याबद्दल बिनचूक माहिती आढळतें. तथापि ह्यामध्यें उल्लेखिलेल्या १८ प्रकारच्या ब्राह्मी लेखनावरून, त्याचप्रमाणें ''उत्तरझ्झयण'' या ग्रंथाच्या ३६ प्रकरणांच्या व अशाच इतर उल्लेखांवरून हें अंग उत्तरकालीन असल्याचें नि:संशय सिद्ध होतें.