प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग (उत्तर भाग)

परिशिष्ट.

अथर्ववेद.
संहिता. - अथर्ववेदसंहितामूल, चोखंबासंस्कृत सीरीज काशीं. अथर्ववेदसंहिता (निर्णयसागर) शंकर पांडुरंग पंडित यांना संशोधलेली, मुंबई १८९५. अथ विदसंहिता अजमेर, संवत १९५७. रॉथ आणि व्हिटने-अथर्वसंहिता व्हिटने आणि लानमन-अथर्वसंहिता (काश्मिरी आवृत्ति)

ब्राह्मणें व आरण्यकें. - गोपथब्राह्मण, चौखंबा सीरीज काशीं; बिल्बिओथिका इंडिका. कलकत्ता १८७२.

महत्त्वाचीं भाषांतरें. - ग्रिलनें कांहीं सूक्तांचें छंदोबद्ध जर्मन भाषांतर केले आहे. स्टटगार्ट. १८८८. इंडिस्वे स्टुडियन मध्यें (४, ५, १३, १७, १८) वेबरनें १-५ आणि १४ या कांडांचे भाषांतर केलें आहें. ग्रिफियनें संपूर्ण भाषांतर काशीं येथें १८९५-९६ मध्यें प्रसिद्ध केलें आहे. दुसरी आवृत्ति १९१६. व्हिटने व लानमन-इंग्रजी भाषांतर काश्मिरी आवृत्तीचें (हार्वर्ड) ब्ल्यूमफील्ड. अथर्ववेदांतील मुख्य सूक्तांचे भाषांतर.