प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग (उत्तर भाग)
परिशिष्ट.
जैन सिद्धान्त - इ. सनानंतर पहिल्या शतकांत जैन संप्रदायांत एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट घडून आली ती ही कीं, त्यामध्यें श्वेतांबर व दिगंबर असे दोन पंथ उत्पन्न झाले. ह्या सर्व धर्मग्रंथांस दोन्ही पंथाचे जैन लोक' सिद्धात अथवा 'आगम' असें म्हणतात. ह्या मूळ धर्मग्रंथातील पहिला महत्त्वाचा भाग म्हटला म्हणजे ब.रा ''अंगे'' होत, असें श्वेतांबर व दिगंबर पंथानुयायांचे म्हणणें आहे. परंतु आतांपर्यंत फक्त श्वेतांबरपंथातील 'सिद्धंत' उपलब्ध झाला असून त्यामध्यें पुढील 'सुत्त' ग्रंथाचा समावेश होतो. या धर्मग्रंथांची भाषा 'आर्ष' किंवा 'अर्धमागधी' या नांवानें संबोधली जाणारी प्राकृत होय. महावीरानें ह्या भाषेंत धर्मोपदेश केला असें म्हणतात; परंतु ह्या ग्रथांपैकीं गद्यभाग व पद्यभाग यांच्या भाषते पुष्कळ अंतर आहे. प्राकृत पद्य भागांत बौद्ध ग्रंथांतील पाली गाथांप्रमाणे बरीच जुनी शब्दांची रूपें सांपडतात. अत्यंत प्राचीन अर्धमागधीचें स्वरूप ''आयारंगसुत्त'' (आचारांगसूत्र) ''सूयगदांग'', (सूत्रकृतांग) व ''उत्तरझ्झगणसुत्त'' (उत्तराध्ययन सूत्र) या तीन ग्रंथांत पहावयास सांपडतें. धर्मग्रंथाखेरीज इतर वाङ्मयाची भाषा 'अर्धमागधी' किंवा जैन महाराष्ट्री ही असून देखील वरील धर्मग्रंथांच्या भाषेपेक्षां अगदीं भिन्न आहे.