प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग (उत्तर भाग)
परिशिष्ट.
क र्म कां ड.
ॠग्वेद
संहिता (शाकल: बाष्कलसंहिता उपलब्ध नाहीं) - ॠक्संहिता म्ह. शाकलसंहिता प्रथम पूर्णपणें प्रसिद्ध करण्याचें श्रेय ईस्ट इंडिया कंपनी व मॅक्समुल्लर यांजकडे आहे. मॅक्समूलरसंपादित ॠग्वेदसंहिता, १ ली आवृति १८४९-७४; दुसरी १८९०-९५० याशिवाय रोसेन यांचीहि आवृत्ति आहे. देशी आवृत्ति:-(१) ॠग्वेदसंहिता अजमीर १९००. (२) बनारस चौखंबा संस्कृत सीरीजमध्यें. (३) ॠग्वेदसंहिता, मुद्रक गणपत कृष्णाजी, संपादक राजारामशास्त्री बोडस व शिवराम शात्री गोरे, मुंबई शके १८११. श्रुतिबोध-ॠग्वेद (अपूर्ण), मुंबई १९१२
ब्राह्मणें व आरण्यकें. - ऐतरयेब्राह्मण (आनंदाश्रम संस्कृतग्रंथावलि) पुणें १८९६. बनारस (चौखंबा) संस्कृत सीरीजमध्यें ऐतरेयब्राह्मण व आरण्यक प्रसिद्ध झाले आहे. पंडित सत्यव्रत सामाश्रमी-ऐतरेयब्राह्मण, कलकत्ता १८९५. शांखायनब्राह्मण (आनंदाश्रम), पुणें १९११.
महत्त्वाची भाषांतरें. - संहितांची. ग्रासमनचें छंदोबद्ध जर्मन भाषांतर, लाइप्झिंग, १८७६-७७. लुडविग्चें गद्य जर्मन भाषांतर, प्राग १८७६-८८ मॅक्समुल्लर व ओल्ड नबर्ग यांनी सेक्रेड बुक्स ऑफ दिईस्ट भाग ३२ व ४६ मध्यें प्रसिद्ध केलेंली भाषांतरें (कांहीं सुक्तांची). विलसनचें इंग्रजी भाषांतर, सायणानुयायी; ग्रिफिथ-इंग्रजी भाषांतर, काशी १८ ९६-९७. वेदार्थयत्न; इंग्रजी व मराठी भाषांतर (अपूर्ण). मुंबई १८७६. रोशेन-लाटिन भाषांतर. श्रुतिबोध-ॠग्वेद. मराठी भाषांतर अपूर्ण. रा. काशीनाथ वामन लेले यांनींहि ॠग्वेदाचा बराच भाग भाषांतरिला आहे; तसेंच, रा. घुलेशास्त्री, नागपूर यानींहि भाषांतरास सुरुवात केली होती पण तें काम फारच थोडें झालें.
ब्राह्मणांचीं - ऐतरेय ब्राह्मण. हागचें इंग्रजी भाषांतर, मुंबई १८६३. कथिचे इंग्रजी भाषांतर. धुंडिराजशास्त्री बापट पांचवड यांनीं ऐतरेय ब्राह्मणाच्या एका पंचकाचें मराठी सटीक भाषांतर केलें आहे. (स्वाध्याय मासिक वर्ष १ ले). शांखायन ब्राह्मण व ऐतरेयआरण्यक-कीथचें इंग्रजी भाषांतर लंडन १९०८).
टीका. - सर्व वेदांवर सायणभाष्य आहे. अर्वाचीन टीका यामध्यें दयावेदी टीका येतें; पण तिचें अर्थबोधाच्या दृष्टीनें महत्त्व नाहीं.