प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग (उत्तर भाग)
परिशिष्ट.
प्राचीन-अभ्यास.
वेदांच्या प्राचीन अभ्यासामध्यें पदपाठ, अनुक्रमणी बृहद्देवतासारखें ग्रंथ, व वेदांगें म्हणजे, शिक्षा, कल्प, व्याकरण , निरुक्त, च्छंद, ज्योतिष, हीं होत. कल्पामध्यें श्रौतसूत्रें, गृह्यसूत्रें व धर्मसूत्रें हीं येतात. आपस्तंब यांत शुल्वसूत्रहि घेतो. या शिवाय ॠग्बिधानासारखे ग्रंथ पुढें निर्माण झाले यांस वेदाभ्यासांत जाता देतां येणार नाहीं. चरणव्यूहामध्यें ज्या अनेक शाखा व सूत्रे दिली आहेत त्या सर्वांचा शोध लागला नाहीं.
कल्पसूत्रें-श्रौतसूत्रें.-१ॠग्वेद: - शांखायन; आश्वलायन २ कृष्ण यजुर्वोद:-आपस्तंब; हिरण्यकेशिन्; बौधायन; भारद्वाज; मानव ३ शुक्लयजुर्वेद-कात्यायन. ४ सामवेद-मशक; लाट्यायन; द्राह्यायण; जैमिनी. ५. अथर्व वेद-वैतान. गृह्यसूत्रें-(मुख्य ग्रंथ)-१ ॠग्वेद-शांखायनशांबव्य; आश्वालायन. २ कृष्णयजु र्वेद-आपस्तंब हिरण्यकेशिन्; बौधायन; भारद्वाज; मानव; वैखानस. ३ शुक्लयजुर्वेद-पारस्कर. ४ सामवेदे-गांभिल; खादिर; जैमिनि. ५ अथर्ववेद-कौशिक. धर्मसूत्रे-१ विशिष्ट शाखीय-(कृष्णयजुर्वेद)-आपस्तंब; हिरण्यकेशिन्; बौधायन. २ स र्व शा खी य गौतम; वासिष्ठ. शुल्बसूत्रें-बौधायनशुल्बसूत्र; आपस्तंबशुल्बसूत्र. कात्यायनशुल्बसूत्र.
फुल्लसूत्र अथवा पुष्पसूत्र - (सामवेदीय) गायन विषयक. याची एक प्रत भांडारकर इस्टिटयूटमध्ये आहे.
शिक्षा - शिक्षावेदषडंग (पोथी, निर्णयसागर १९१४) या शिवाय खालील शिक्षा आऊफ्रेक्टच्या क्याटालागमध्यें आहेत. अथर्वशिक्षा अमोघनंदिनी, आत्रेयशिक्षा, आपिशलीं, आरण्यकशिक्षा, कात्यायनशिक्षा किंवा याज्ञवल्यशिक्षा, कालनिर्णयशिक्षा, काहलशिक्षा, केशवशिक्षा. कौशिकीशिक्षा, गौतमशिक्षा, चारायणीशिक्षा, तैत्तिरांयशिक्षा, नारदपाणिनीयशिक्षा, पाराशरशिक्षा, पाराशर, बौधायन, भारद्वाज, मांडवी, मांढूकी, माध्यंदिनी, याज्ञवल्क्य, लक्ष्मीकांत, लोमश, वाजसनेय, वाल्मीकि, वासिष्ट, व्याडि, व्यास, शंकर, शंभु, शिक्षासमुच्चय, सर्वसम्मतशिक्षा, सामवेदशिक्षा, सिद्धांतशिक्षा, हारांतशिक्षा, शिक्षासूत्राणि. याज्ञबल्क्यशिक्षा शुक्लयजुर्वेद संहितेच्या निर्णयसागर आवृत्तीत दिली आहे.
निरुक्त - हे रॉथने प्रथम प्रसिद्ध केले (गॉटिनजेन), बिब्लिइंडिकामध्येंहि निरुक्तटीका व सूचीसह छापिले(१८८२-९१).
पिंगलाचा छंद:शास्त्रावरील ग्रंथ - छंदोविवृति अथवा छंद:सूत्र याच्या अनेक आवृत्या आहेत. त्यांत बंगालच्या एशियाटिक सोसायटीचें संवत १९३० मध्यें प्रसिद्ध केलेली चांगली आहे. पिंगलाचा हा जुना ग्रंथ नसावा. यांत अनेक लौकिक वृत्तांचा संग्रह आहे. याचे वर्णन विज्ञानेतिहासांत दिलें आहे.
वेदांग ज्योतिष - गर्गाचार्यांचें धरले जातें. ॠक यजुस व अथर्व अशीं तीन वेदांगज्योतिषें प्रसिद्ध आहेत. याजुष ज्योतिष आणि आर्च ज्योतिष हे सोमाकरसुधाकरभाष्यसहित पंडित मासिकाच्या २९व्या ग्रंथांत आहे.
व्याकरण. - प्राणिनीकृत अष्टाध्यायी, कात्यायनाचें यावर वार्तिक व पतंजलीचें महाभाष्य.
प्रातिशाख्यें - ॠग्वेदप्रातिशाख्य-माक्समुलरची प्रत, लाइप्झिंग् १८५६-६९. तैत्तिरीयप्रातिशाख्य-व्हिटनेची प्रत, न्यूहवेन १८८१. शुक्लयजुर्वेदीय कात्यायनप्रातिशाख्य पी. वाय. पाठक यांनीं संपादिलें. काशी १८८३ -८८. अथर्ववेदप्रातिशाख्य-व्हिटनें यांनीं प्रसिद्ध केलेलें. सूचकवेदाभ्यास-सर्वानुक्रमणी-मॅकडोनेल संपादित (अनुवावानुक्रमणीसह), ऑक्सफोर्ड १८८६, आर्षानुक्रमणी, छंदोनुक्रमणी, बृहद्देवता-(बिल्बि.इंडिका), शुक्लयजुर्वेदाचीं सर्वानुक्रमणीसूत्रे-वेबरसंपादित (शुक्लयजुर्वेदसंहितेसह); बनारससंस्कृतसीरीज १८९२-९४. चरणव्यूह-वेबरसंपादित (इंडि. स्टु. पु. ३) बृहद्देवता हा १९०४. ॠग्वेदापदानुक्रमणिका, निर्णयसागर, मुंबई १९०८. ॠचावर्णानुक्रमसूची, गणपत कृष्णाजी प्रेस, मुंबई १८९०. तैत्तिरीयसंहिता-विषयानुक्रमणिका, आनंदाश्रम ग्रं. पुणें. यजुर्वेदपदानुक्रमणिका, सामवेदपदानुक्रमणिका, अथर्ववेदपदानुक्रमणिका, निर्णयसागर या प्रकारच्या अभ्यासामध्येंच वेदिक कंकार्डन्स याचा उल्लेख केला पाहिजे. हा ग्रंथ प्रो. ब्लूमफील्ड यांनीं तयार करून हार्वर्ड ओरिएंटल सीरीजमध्ये प्रसिद्ध केला. यात सर्व वैदिक वाङ्मयातील ओळींचीं वर्णानुक्रमानें मांडणी केली आहे.
अर्वाचीन वेदाभ्यास.
यावर अनेक ग्रंथ आहेत. यांची यादी द्यावी तेवढी थोडकीच आहे. जर्मन ग्रंथाचाच भरणा यात फार आहे.