प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग (उत्तर भाग)

परिशिष्ट.

पैण्ण. - या नावाचीं दहा पुस्तकें वैदिक परिशिष्ट ग्रंथासारखीं पद्यरूपात रचलेलीं असून जैन संप्रदायासंबंधीं उपासनापद्धति, अर्हत् सिद्ध, साधु व धर्म यांनां शरण जाणें, साधु परुषाचा मृत्यु, गर्भावस्था, गुरुशिष्यगुणदोष, अनेक देव इत्यादि माहिती त्यांत दिली आहे.