प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ३ रें.
इराणचें सत्तावर्धन

अकिमेनिड घराण्याचा इतिहास - या घराण्याची राजावली येणेंप्रमाणें देतां येईल.

सायरस (५५८-५२८); ५५० मध्यें मीड लोकांना जिंकलें;
५३८ पासून बाबिलोनचा राजा.
कंबायसिस (५२८-५२१).
स्मेर्डिस (५२१).
पहिला दरायस. (५२१-४८५).
पहिला क्सर्क्सीझ. (४८५-४६५).
पहिला आर्टाक्सर्क्सीझ. (४६५-४२५).
दुसरा क्सर्क्सीझ, व सेसिडियानस अथवा सोग्डियानस, (४२५-४२४).
दुसरा दरायस. नोथस (४२४-४०४).
दुसरा आर्टाक्सर्क्सीझ (४०४-३५९).
तिसरा आर्टाक्सर्क्सीझ (३५९-३३८).
आर्सेसीझ (३३८-३३६).
तिसरा दरायस (३३६-३३०).

वरील सनावळी बाबिलोनी व कांहीं मिसरी लेखांतील माहितीशीं तसेंच ग्रीक ग्रंथांतील पुराव्याशीं बरोबर मिळते.