प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ८ वें.
बुद्धाचें चरित्र.

आसामांतील बौद्ध संप्रदाय.- आसामांत बौद्ध संप्रदायाचा झपाट्यानें -हास होत चालला आहे. इ. स. १९११ मधील खानेसुमारींत फक्त ८,९११ बौद्ध लोकच त्या ठिकाणीं होते; परंतु एके काळीं त्यांनीं सर्व आसाम प्रांत व्यापून टाकिला होता. ते लोकांनीं तेराव्या शतकांत या देशावर स्वारी करून तेथें बौद्ध संप्रदायाचा प्रसार केला. ४०० वर्षेंपर्यंत या ठिकाणीं बौद्ध संप्रदायाचें वास्तव्य होतें. परंतु इ. स. १६११ त चु-चेंग-पा नांवाच्या राजानें हिंदु धर्माचा स्वीकार केला, व मागून त्याच्या प्रजेनेंहि त्याचेंच अनुकरण केलें. येथील भिक्षूंस कलित असें म्हणतात.