प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ८ वें.
बुद्धाचें चरित्र.

-हास - इसवी सनाच्या आठव्या शतकापासून हिंदुस्थानांतील बौद्ध संप्रदायाच्या -हासास प्रारंभ झाला, व हळू हळू त्याचें विशिष्ट स्वरूप नष्ट होऊन तो प्रचलित विचारांत पूर्णपणें मिसळून गेला. बंगालांत व इतर अनेक ठिकाणीं उत्पन्नावर तगलेले मठ मुसुलमानी विजयानंतर नष्ट झाले आणि सामान्य जनता ब्राह्मणाश्रयी बनली.