प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण १३ वें.
सेमेटिक संस्कृतीची जगदव्यापकता

न्यायाधीश, शमुवेल व राजे.- पहिल्या सहा पुस्तकांपेक्षां या पुस्तकांची रचना अधिक सोपी आहे. न्यायाधिशासंबंधाचें पुस्तक जुन्या कथा घेऊन व त्यांनां प्रास्ताविक व उपसंहारात्मक मजकूर जोडून तयार केलेलें आहे. शमुवेल या पुस्तकांत शमुवेल, साउल आणि दावीद या तीन व्यक्तीसंबंधाची माहिती मुख्यतः आहे. 'राजे' या पुस्तकाची रचना 'न्यायाधीश' या पुस्तकाच्या रचनेसारखीच आहे. या दोन्ही पुस्तकांच्या लेखकावर 'अनुवाद' या पुस्तकाचा फार परिणाम झाला असल्याचें स्पष्ट दिसतें. यांतील बहुतेक भाग हद्दपाररी (एक्झाइल) च्या पूर्वी लिहिलेला आहे.