प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण १६ वें.
रोमन-ग्रीक साम्राज्याचा इतिहास व पश्चिमेकडील साम्राज्याची स्थापना.

कोरोलिंगियन घराणें :- टूर्सच्या लढाईमुळें चार्लस मार्टेलची कीर्ति वाढली. वस्तुतः हाच आतां फ्रँक लोकांचा राजा होता. त्याच्या मरणानंतर मेरोव्हेक घराण्याचा शेवटला पुरूष पदच्युत झाला व त्याची गादी चार्लसच्या मुलाला मिळाली. त्यांच्या घराण्याला कोरोलिंगियन घराणें म्हणतात. हें घराणें पुढें फार प्रसिद्धीस आलें.