प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण ५ वें,
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-छंद व संगीत.            
 
शहाजहानच्या कारकीर्दीतील संगीताची चहा.- शहाजहान बादशहाच्या ( १६२८-६६ ) दरबारी जे अनेक चांगले चांगले गवई होते त्यात जगन्नाथ हा एक होता.  त्याला कविराज ही पदवी मिळाली होती.  त्याच दरबारात दुसरा एक गवई तानसेनाचा वंशज लालखान हा होता.  अशी एक गोष्ट सांगतात की, एकदा जगन्नाथ व दुसरा एक गवई दिरंगखान यांजवर खुष होऊन बादशहानें त्यांना त्यांची रौप्यतुला करुन तिची किंमत म्हणून ४५०० रुपये दिले.